16 November 2024 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

GK - ब्रिटिश सत्ता व तिचे एकत्रीकरण

स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे ब्रिटिश सत्ता व तिचे एकत्रीकरण. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर ब्रिटिश सत्ता व तिचे एकत्रीकरणबद्दलची सविस्तर माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.

ब्रिटिश सत्ता तिचे एकत्रीकरण:

  • पेशवाईचा 1818 मध्ये अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला.
  • आता पंजाबमधील शीख साम्राज्य संधि व बलुचिस्तानचे अमीर ही राज्येच जिंकावयाची राहिली होती.
  • बाकीच्या संपूर्ण भारतीय प्रदेशावर आता कंपनीचा ताबा प्रस्थापित झाला होता अ‍ॅक्हर्स्टच्या कारकिर्दीतचपासून कंपनीचे लक्ष सर्व बाजूंनी भारताच्या भौगोलिक सीमेपर्यत आपले राज्य वाढविण्याकडे केंद्रित झाले होते.
  • जसजसा साम्राज्याविस्तार वाढला तसतशा या साम्राज्याचे संरक्षण करण्याच्या समस्याही निर्माण झाल्या अ‍ॅम्हर्स्ट ते डलहौसी पर्यतच्या सर्वच गव्हर्नरांना या समस्येची उकल करण्याकडे लक्ष द्यावे लागले.
  • लॉर्ड हेस्टिंग्जनंतर लॉर्ड अ‍ॅक्हर्स्ट भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्याच्या कारकिर्दीतचत पहिले ब्रम्ही युध्द झाले.
  • या युध्दात इंग्रजांनी ब्रम्ही फौजांचा पराभव केला.
  • यांदेबूच्या तहाने ब्रम्ही सरकारने इंग्रजांना आराकान व तेनासरीम हे प्रांत दिले व आपल्या फौजा असामच्या प्रदेशातुन मागे घेतल्या (1826)

सिंधवर विजय:

  • संधि प्रांत पूर्वी मोगल साम्राज्याचा एक विभाग होता.
  • या साम्राज्याच्या पतनानंतर अफगाणांनी संधि काबीज केला.
  • अफगाणिस्तानात जेव्हा यादवी सुरु झाली त्या वेळी 1768 मध्ये बलुचिस्थानातील तालपूर जातीने तेथे आपली सत्ता स्थापन केली.
  • सिंधमध्ये तीन निरनिराळे सरदार मीरपूर व हैद्राबाद येथे राज्य करीत होते.
  • व्यापारी व लष्करीदृष्टया इंग्रजांना संधि महत्वाचा वाटत होता. त्यामुळे बेंटिकने तेथील अमीरांशी घनिष्ठ संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला .
  • त्यासाठी र्बोड ऑफ कंट्रोलचा अध्यक्षा र्लॉड एलेनबरो याने सुचविलेल्या योजनेनूसार कार्य करण्याचे त्याने ठरविले.
  • इ.स. 1830 मध्ये लेफटनंट रॉर्बट बर्न याला काही घोडे व अन्य वस्तू रणजितसिंगला भेट देण्यासाठी सिंधमार्गे पंजाबला पाठविण्यात आले.
  • बर्नला असा गुप्त आदेश देण्यात आला होता, की त्याने प्रवासात सिंधच्या राजकीय व लष्करी स्थितीची पाहाणी करावी. जमल्यास अमीराशी व्यापारी करार करावा आणि आपला अहवाल गव्हर्नर जनरलकडे पाठवावा.
  • बर्नच्या योजनेमूळे रणजितसिंगच्या मनातही इंग्रजांच्या हेतुबदल अमीराप्रमाणेच शंका निर्माण झाली, कारण संधि जिंकून घेण्याची त्याचीही इच्छा होती. पंरतु रणजितसिंगने सिंधवर आपले वर्चस्व प्रस्थापित करावे ही गोष्ट इंग्रजांना मान्य नव्हती संधिी अमीरसुध्दा रणजितसिंगनेच्या संभाव्य आक्रमणाबदल भयभीत होते.
  • बेंटिंकने त्यांच्या भीतीचा फायदा घेऊन कच्छचा इंग्रज रेसिडेंट कर्नल पॉटीजर याला अमीराशी बोलणे करण्यासाठी पाठविले.
  • त्याने इ.स. 1832 मध्ये अमीराला कंपनीशी व्यापारी तह करण्यास भाग पाडले. या तहानुसार इंग्रज संधि मध्ये व्यापार करू शकत होते.

संधि जिंकण्यात यश (1842-1844)

  • वरीलप्रमाणे 1832 मध्ये र्लॉड बेंटिंकने स्ंधी च्या अमीरांशी एक व्यापारी करार केला होता आणि अमीराला कंपनीने असे आश्र्वासन दिले होते, की कंपनी आपल्या फौजा सिंधमधुन कधीही नेणार नाही.
  • इ.स. 1838 मध्ये ऑकलंडने पुन्हा संधी च्या अमीरांशी एक करार केला.
  • या करारानुसार अमीरांनी हैद्राबाद येथे इंग्रज रेसिडेंट ठेवून घेण्याचे मान्य केले.
  • पहिल्या इंग्रज अफगाण युध्दाला सुरुवात झाल्यावर इंग्रज सेनेला रणजितसिंगने आपल्या प्रदेशातून जाऊ दिले नाही.
  • त्यामूळे ऑकलंडने 1832 चा अमीरांशी झालेला करार मोडून इंग्रज सैन्य सिंधमधुन अफगाणिस्तानाकडे पाठविले.
  • एवढेच नव्हे तर युध्दाच्या खर्चासाठी त्याने संधिी अमीरांकडून 21 लक्ष रु वसूल केले.
  • त्यांनंतर 1839 मध्ये ऑकलंडने अमीरांशी पुन्हा एक नवीन तह केला त्यानुसार अमीरांनी इंग्रजांना 3 लक्ष रु वार्षिक खंडणी द्यावी संधि हैद्राबादेस इंग्रज रेसिडेंट होता.
  • त्याने 2 अमीरांबदल तार केल्यामूळे त्यांची चौकशी करण्याकरीता र्लॉड एलेनबरोने सर चार्ल्स नेपियरला सैन्यासह संधिमध्ये पाठवले.
  • 9 सप्टेंबर 1842 रोजी तो कराचीत येऊन दाखल झाला.
  • त्याने अमीराविरुध्द पुरावे गोळा केले व त्याच आधारावर अमीरांनी कंपनीशी केलेला करार पाळला नाही ही सबब पुढे करुन नोव्हेंबर 1842 मध्ये त्यांच्यापूढे नेपियरने एक नवीन करार ठेवला त्यातील प्रमुख कलमे पुढीलप्रमाणे:
  1. अमीरांनी आपली स्वतंत्र नाणी पाडू नयेत.
  2. सिंधमधील शिकारपूर, सख्खर, भक्कर, ही महत्वाची ठिकाणे. कंपनीच्या ताब्यात द्यावीत.
  3. सख्खरच्या उत्तरेकडील प्रदेश बहावलपूरच्या नबाबाला द्यावा.
  4. संधिू नदीतून मुक्त संचार करण्याची इंग्रजांना परवानगी द्यावी.
  5. अमीरांनी कंपनीशी एकनिष्ठ राहावे इ. कलमे त्यात होती या कराराच्या मोबदल्यात अमीरांना तैनाती फौजेच्या खर्चासाठी जे 3 लक्ष रु द्यावे लागत होते ते माफ करण्यात आले.
  • हैद्राबादच्या परिषदेत अमीरांनी इच्छा नव्हती तरी या करारावर सहया केल्या.
  • इंग्रजांपूढे अशी शरणागती पत्करण्यास काही अमीर तयार नव्हते.
  • 15 फेब्रुवारी 1843 राजी सायंकाळी पुष्कळशा बलूची लोकांनी रेसिडेंट आऊटरमच्या बंगल्यावर हल्ला चढवला, पण हल्ला होताच आऊटरम पळून गेल्यामुळे वाचला.
  • हैद्राबादच्या उत्तरेस सुमारे 10 मैलांवर मियानी येथे 20,000 बलूची सैन्य गोळा झाले होते.
  • 17 फेब्रूवारी 1843 रोजी नेपियर हैद्रबादहून सैन्यासह निघाला आणि त्याने बलूची सैन्यावर हल्ला चढवला मियानी येथे घनघोर युध्द होऊन त्यात अमीरांचा पराभव झाला.
  • हैद्राबाद शहर इंग्रजांच्या ताब्यात आले. काही दिवसांनंतर पुन्हा अमीरांनी गडबड केल्याचे नेपियरला कळले अमीर हैद्राबादवर चालून आले.
  • हे वर्तमान कळताच 24 मार्च 1843 रोजी नेपियरने एकदम हल्ला करुन त्यांना पराभूत केले.
  • 27 मार्च 1843 रोजी इंग्रज सेनेने मीरपूर जिंकून घेतले.
  • 14 जून 1843 रोजी अमीरांचा नेता शेर मोहम्मद याचाही पाडाव करुन नेपियरने सर्व संधि इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला ऑगस्ट 1843 मध्ये एलेनबरोने संधिचे विलीनीकरण ब्रिटिश साम्राज्यात झाल्याची घोषणा केली सिंधवर विजय मिळवून देणार्‍या नेपियरलाच तेथे गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.

पंजाबवर विजय:

  • रणजितसिंगचया वाढत्या सत्तेमूळे इंग्रज जेवढे भयभीत होत, तेवढेच ते रशियाच्या संभाव्य आक्रमणला घाबरत होते.
  • या चिंतेतून मुक्त होण्यासाठी त्यांनी रणजितसिंगशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे ठरविले.
  • या उद्देशाने प्रेरित होऊनच इंग्रजांनी रॉर्बट बर्न याला रणतिजसिगला काही वस्तू भेट देण्यासाठी लाहोरला पाठविण्यात आले.
  • एवढयाने संतुष्ट न होता गव्हर्नर जनरल र्लॉड बेंटिक याने स्वत: रणजितसिंगची सतलज नदीच्या काठावर रोपड येथे 27 ऑक्टोबर 1831 रोजी भेट घेतली स्नेह संबंध कायम स्वरुपाचे राहवेत हे दोघांनी मान्य केले.
  • याचवेळी रणजितसिंगने रशियन आमणाचे संकट उत्पन्न झाले तर परस्परात मैत्री कायम ठेवण्याचे आश्र्वासन दिले.
  • या भेटीती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रणजितसिंगने कंपनीला आपल्या राज्यात व्यापार करण्याची परवानगी दिली.
  • 1839 मध्ये अचानक रणजितसिह मरण पावला. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दहा वर्षातच इंग्रजांनी त्याचे राज्य खालसा केले.

पहिले इंग्रज शीख युध्द (1845-1846)

  • युध्दाची कारणे रणजितसिंगच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याची सत्ता खालसा सैन्यातील अधिकार्‍यांच्या हाती गेली.
  1. या खालसा सैन्याने रणजितसिंगचा अल्पवयीन मुलगा दिलीपसिंग यास गादीवर बसविले.
  • दिलीपसिंगची आई राणी जिंदनकौर व वजीर लालसिंह यास सैन्याचे वाढते वर्चस्व सहन होत नव्हते.
  1. सतलज नदीच्या पुर्वेकडे फिरोजपूर लुधियाना, अंबाला व मिरत येथे इंग्रज सैन्याच्या छावण्या उभारण्यात आल्या होत्या पंजाबात जी यादवी निर्माण झाली होती.
  • ते लक्षात घेऊन ईस्ट इंडिया कंपनीने आपले सैन्यात वाढ केली येथे त्यांचे 3200 सैनिक व 68 तोफा होत्या.
  1. सिंधमध्येही कंपनीने आपले सैन्य वाढवले होते, त्यामुळे मुलतान मार्गाने केव्हाही आमण करता येणार होते.
  • पंजाबमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे आणि शिखांकडून केव्हाही आमण होऊ शकते, म्हणून आम्हीही तयारी करीत आहोत. हा कंपनीचा दावा म्हणजे शुध्द खोटेपणा व बनवाबनवी होती.
  1. संपूर्ण भारत जिंकण्यास इंग्रज उतावीळ झाले होते. संधि त्यांनी जिंकलाचा होता.
  • आता फक्त त्यांना केवळ पंजाबच जिंकावायचा होता. पंजाबचा समृध्द व मोक्याचा प्रदेश आपल्या ताब्यात यावा अशी त्यांची दृढ इच्छा होती.
  • इंग्रजांनी जी लष्करी तयारी केली होती ती पाहून शिखांनी असा निष्कर्ष काढला की, इंग्रज आपल्यावर निश्चित आमण करणार, त्यामुळे ते पंजाबच्या भूमीवर न होता. त्यांच्याच प्रदेशात लढले जाईल.
  • या विचाराने 11 डिसेंबर 1845 रोजी शीख सैन्याने हरिकी आणि कसूर यांच्यामधून सतलज नदी पार केली आणि हयू गफ यांच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याशी संघर्ष सुरु केला.
  • 13 डिसेंबर 1845 रोजी लॉर्ड हार्डिग या गव्हर्नर जनरलेने युध्द घोषण करून असे जाहीर केले की, दिलीपसिंगच्या राज्याचा सतलजच्या पूर्वेकडील प्रदेश इंग्रज साम्राज्यात विलीन करण्यात येत आहे.
  • या युध्दातील मुदकी, फिरोजशाह, भैरोवाल आणि अलीवाल या लढाया अनिर्णायक ठरल्या पण सुबारावची पाचवी लढाई 10 फेब्रुवारी 1846 निर्णायक ठरली व ती इंग्रजानी सैन्याचा विश्र्वासघात केला.
  • या युध्दात शीख सैन्य मोठया प्रमाणावर मारले गेले.
  • इंग्रजांनी लाहोरवर वर्चस्व प्रस्थापित केले. या वेळी शिखांना लाहोरचा तह 9 मार्च 1846 स्वीकारण्यास इंग्रजांनी भाग पाडले.

या तहाची कलमे

  • सतलजच्या पूर्वेकडील प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला.
  • सतलज व बियास या नद्यांमधील प्रदेशातील सर्व किल्ले इंग्रजांना देण्यात आले.
  • युध्ददंड म्हणून कंपनीने दीड कोटी रुपयांची मागणी केली. पण ती देणे शक्य नसल्यामूळे 50 लक्ष रु रोख देण्यात आले. व संधिू व बियासमधील पहाडी प्रदेश किल्ले, व काश्मीर व हजारा, प्रांत इंग्रजांना देण्यात आला.
  • यापुढे दिलीपसिंग यास 20,000 पायदळ व 12,000 घोडदळ एवढेच सैन्य ठेवता येतील.
  • कंपनीच्या परवानगीशिवाय कोणत्याही युरोपियन किंवा अमेरिकनाला आपल्या सेवेत न ठेवण्याचे दिलीपसिंगने मान्य केले.
  • अल्पवयीन दिलीपसिंगला पंजाबचा राजा म्हणून कंपनीने मान्यता दिली. त्याची संरक्षिका म्हणुन राणी जिंदनकौर व राज्याचा वजीर म्हणून लालसिंह यांच्या नावालीही संमती दर्शविण्यात आली.
  • हेन्री लॅरेन्सला लाहोर येथे इंग्रजांचा रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले. पंजाबच्या अंतर्गत कारभारात कंपनीने हस्तक्षेप न करण्यांचे मान्य केले.

दुसरे इंग्रज शीख युध्द (1848-1849)

  • लाहोरच्या तहानंतर इंग्रजांनी आपल्या धोरणात बदल केल्यामुळे राणी जिंदन व लालसिंह निराश झाले.
  • त्यांना इंग्रज रेसिडेंट नियंत्रण नकोसे झाले. रेसिडेंटने लाहोर दरबारास असा आदेश दिला कि, काश्मीर गूलाबसिंहास देऊन टाकावा या आदेशाने पालन करु नये अशी सुचना लालसिंहिाने काश्मीरचा गव्हर्नर इमामउद्दीन यास दिली.
  • त्यामुळे इंग्रज सैन्याने सरळ सरळ काश्मीरचा ताबा मिळवला.
  • या घटनेची चौकशी करण्यासाठी जी समिती नियुक्त केली होती तिने लालसिंहास दोषी ठरवून त्यास पंजाबमधून हद्दपार करण्यात आले.
  • लाहोरची सत्ता एका प्रतिनिधी मंडळाकडे सोपविण्यात आली.
  • 11 मार्च 1846 च्या तहात ठरल्याप्रमाणे लाहोर येथे कंपनीचे सैन्य 1846 हे वर्ष संपेपर्यत थांबणार होते.
  • ती मुदत संपण्याच्या आधी 22 डिसेंबर 1846 रोजी नवीन असा भैरोवालचा तह करण्यात आला.
  • त्यानुसार राजा सज्ञान होईपर्यत त्याच्या संरक्षणासाठी व शांतता टिकवुन ठेवण्यासाठी इंग्रज सैन्य लाहोर येथे राहू देण्याचे मान्य करण्यात आले.
  • या सैन्याचा खर्च म्हणून दरवर्षी 22 लक्ष रु लाहोर दरबार देणार होते.
  • इंग्रज रेसीडेंटच्या हातात पंजाबच्या सर्व सत्तेचे केंदि्रकरण झाले. त्यास राणी ज्ंदीनकौरने आक्षेप घेतला.
  • त्यामूळे गव्हर्नर जनरलने 2 ऑगस्ट 1847 रोजी घोंषणा केली की अल्पवयीन राजाचे शिक्षण व पालनपोषण पित्याप्रमाणे करण्याची गव्हर्नर जनरलची इच्छा आहे आणि त्या दृष्टीेने राजा आणि त्याची आई यांना एकमेकांपासून वेगळे ठेवण्याची नितांत गरज आहे.
  • या घोषणेनंतर ताबडतोब जदीनला शेखूपुरा येथे पाठविण्यात आले व तिचा वार्षिक भत्ता फक्त 48,000 रु ठेवण्यात आला.

लॉर्ड डलहौसीकडून पंजाबचे विलिनीकरण:

  • लॉर्ड हार्डिगच्या जागेवर जानेवारी 1848 मध्ये डलहौसीची नियुक्ती झाली.
  • मुलतानचा गव्हर्नर मुलराज याच्या बंडामुळे इंग्रजांना पंजाबवर आक्रमण करण्याची संधी मिळाली.
  • 1846 मध्ये इंग्रज रेसिडेंटच्या सूचनेवरुन
  • मुलराजला भेटीदाखल 20 लक्ष रु चा नजराणा देण्यास सांगण्यात आले.
  • रावी नदीच्या उत्तरेकडील प्रदेश लाहोर दरबारला सोपविण्यास सांगण्यात आले.
  • मुलतान प्रांताचा कर तीन वर्षासाठी 33 लाखने वाढविण्याचे ठरविण्यात आले.
  • या गोष्टी मुलराजाला मान्य नव्हत्या, म्हणून त्याने डिसेंबर 1847 मध्ये आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला.
  • त्यामूळे त्याच्या जागेवर 30,000 रु वार्षिक वेतनावर नियूक्त करण्यात आले. त्याला मदत करण्यासाठी जे दोन इंग्रज अधिकारी आले होते.
  • त्यांच्या उद्दाम वर्तनामुळे त्यांना ठार मारण्यात आले. प्रजेने जे बंड केले त्याचे नेतृत्व मुलराजला देण्यात आले. या बंडाचे लोण इतरत्रही पसरले.
  • ऑक्टोबर 1848 मध्ये डलहौसीने घोषणा केली की कोणतीही पूर्वसूचना न देता शिखांनी अकारण युध्द सुरु केले आहे. मी शपथपूर्वक सांगतो की शिखांपासून या युध्दाचा बदला घेतला जाईल.
  • 16 नोव्हेंबर 1848 रोजी हयु गफ याचा शीख सैन्याशी संघर्ष् झाला.
  • त्यांच्यात झालेल्या या रामनगरच्या लढाईत कोणताही निर्णय लागला नाही, तसेच त्यांच्यात जानेवारी 1849 मध्ये झालेल्या चिलियनवाला येथील युध्दातही कोणताच निर्णय लागला नाही. त्यामूळे हयू गफच्या जागेवर चार्ल्स नेपियरची नियुक्ती करण्यात आली.
  • त्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या गुजरात युध्दांत इंग्रजांनी शिखांचा पराभव केला हे युध्द तोफांची लढाई म्हणून प्रसिध्द आहे.
  • संपूर्ण पंजाब इंग्रजांच्या हाती आला डलहौसीने ब्रिटिश साम्राज्यात पंजाबचे विलीनीकरण करुन टाकले.
  • दिलीपसिंगला वार्षिक 50,000 रु पेन्शन देऊन उच्च शिक्षणासाठी इंग्लडला पाठविण्यात आले.
  • आयुक्तांच्या एका समितीकडे पंजाबचे प्रशासन सोपविण्यात आले.

लॉर्ड डलहौसीची कारकिर्द (1848-1856)

  • वेलस्लीनंतर इंग्रज सत्तेची मोठी वाढ र्लॉड डलहौसीने केली. खर्‍या अर्थाने तो इंग्रजांचे साम्राज्याचा निर्माता होता.
  • तो अत्यंत कार्यक्षम व महत्वाकांक्षी गव्हर्नर जनरल होता.
  • इंग्रजांचे राज्य वाढवीत असता त्याने निती अनीतीचा फारसा विचार केला नाही. इंग्रजी साम्राज्यावादाचा तो खराखुरा प्रतिनिधी होता.

विलीनीकरणाचे तत्व:

  • लॉर्ड डलहौसी कर साम्राज्यवादी होता.
  • पंजाब व ब्रहयू युध्दांनतर त्याने आपले लक्ष अंतर भारतीय संस्थानांकडे वळविले. कारण अजूनही देशात अनेक लहान मोठी.
  • विखूरलेली होती ज्यामूळे कंपनीचे राज्य एकसंघ न राहता तुटक दिसत होते.
  • या संस्थानांना या ना त्या कारणांनी नष्ट करून भारतात कंपनीचे सामर्थ्यसंपन्न असे साम्राज्य निर्माण करण्याची डलहौसीची इच्छा होती.

भारतातील विविध राज्ये खालसा करण्यासाठी त्याने पुढील युक्त्या शोधून काढल्या.

  • राजाला प्रत्यक्ष युध्दात जिंकणे
  • दत्ताक वारस नामंजूर करणे
  • कंपनीने पूर्वी दिलेल्या पदव्या व पेन्शन बंद करणे
  • एखाद्या राजयकत्र्यांचा राज्यकारभार अव्यावस्थित असेल तर ते राज्य खालसा करणे
  • तैनाती फौजेची ठरविलेली खंडणी न दिल्यास त्या राज्याचा काही मुलुख ताब्यात घेणे अशा विविध कारणांनी त्याने अनेक राज्ये ब्रिटिश साम्राज्यास जोडली.

दत्ताक वारस नामंजूर करणे:

  • या तत्वानुसार कंपनीची सत्ता भारतात स्थापन होण्यापूर्वी जी अनेक राज्ये अस्तित्वात होती त्यांना दत्ताक वारस नामुंजुरीचे तत्व लावावयाचे नाही परंतु जी राज्ये इंग्रजांनी निर्माण केली त्यांना यात हा नियम लागू करण्याचे ठरविले.
  • पण प्रत्यक्षात र्लॉड डलहौसीने सरसकट जी संस्थाने दत्ताक नामंजुरीच्या तत्वावर खालसा केली त्यावरून असे दिसते की त्याने स्वत: केलेला नियम पाळला नाही हिंदू धर्मशास्त्रानूसार एखाद्या राजास औरस संतती नसल्यास त्याला आपला वंश चालविण्यासाठी व आई वडिलांच्या मृत्यूनंतरचे संस्कार पार पाडण्यासाठी दत्ताक पुत्र घेण्याचा विधी ज्यांना मुलबाळ नसेल असे राजे महाराजे पार पाडीत असत.
  • त्यानंतर या दत्ताक पुत्रास औरस पुत्राचे सर्व अधिकार मिळत असत.
  • पण हे तत्व डालहौसीने मान्य केले नाही तो म्हणतो की वंश चालविण्यासाठी दत्तक घेण्याची गरज असल्यास संस्थानिकांनी खुशाल दत्ताक घ्यावा आणि त्यास आपली वैयक्तीक संपत्ती द्यावी, राज्य नाही जर दत्ताक पुत्रास राज्याचा वारस करण्याचा हेतु असेल तर कंपनी सार्वभौम असल्याकारणाने दत्ताक घेण्यापूर्वी तिची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • तशी परवानगी न घेतल्यास सार्वभौम सत्ता या नात्याने कंपनी त्या दत्ताकाला राज्याचा वारस म्हणून मान्यता देणार नाही. या धोरणानुसार त्याने अनेक भारतीय संस्थाने खालसा केली.
  • दत्ताक नामंजुरीच्या या सिध्दान्तानुसार राज्ये खालसा :

सातारा:

  • इ.स. 1848 साली येथील राजा शहाजी भोसले याचा मृत्यू झाला.
  • त्यापूर्वी त्याचा भाऊ प्रतापसिंह याचाही मृत्यू झाला होता.
  • औरस संतती नसल्यामुळे दोघांनीही इंग्रज रेसिडेंटसमोर विधियुक्त दत्ताक विधान केलेले होते.
  • पण डलहौसीने या दत्ताक विधानास परवानगी न देता राज्य खालसा केले.

नागपूर:

  • इ.स. 1853 मध्ये येथील राजा तिसरा राघोजी भोसले याचा मृत्यू झाला मृत्यूपूर्व त्याने कंपनीकडे राज्यासाठी दत्ताक घेण्याची परवानगी मागितली होती ती न आल्याने राजाने मृत्यूपूर्वी यशवंतराव नावाच्या मुलास दत्ताक घेण्याची माहिती आपल्या पत्नीस कळवली होती.
  • त्यानुसार दत्ताक विधान झाले परंतू डलहौसीने या दत्ताकास परवानगी न देता राज्य लाखसा केले.

झाशी:

  • इ.स. 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य खालसा केल्यानंतर झाशीचा प्रदेश ओघाने इंग्रजाकडे आला.
  • तो प्रदेश इंग्रजांनी वंशपरंपरेने राम चंद्रराव नेवाळकर यास इ.स. 1832 मध्ये बेटिंगने राम चंद्ररावास महाराज ही पदवी दिली.
  • त्यांचा इ.स. 1835 साली मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर चुलता रघुनाथराव यास इंग्रजांनी गव्हर्नर, पण तोही निपुत्रिक मरण पावल्यामुळे गंगाधरराव हा राजा झाला.
  • इ.स. 1853 साली त्याचा मृत्यू झाला त्याने राजाने मृत्यूपूर्वी दामोदरराव नावाच्या मुलास दत्ताक घेतले होते, परंतू उलहौसीने या दतकास नकार देऊन झाशीचे राज्य खालसा केले.
  • ज्या राज्यांना औरस संतती नव्हती आणि ज्यांनी मृत्यूपूर्वी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणालाही दत्ताक घेतले नव्हते अशी अनेक लहान संस्थाने डलहौसीने खालसा केली. उदा. ओर्छा, जेतपूर, संबळपूर, उदयपूर इ.

पदव्या पेन्शन समाप्ती:

पेशवा:

  • इ.स. 1851 साली दुसर्‍या बाजीरावाचा मृत्यू झाला त्याने धोडोपंत र्ऊफ नानासाहेबास दत्ताक घेतले होते.
  • पित्याच्या मृत्यूनंतर आपणास त्यांची जहागीर व पेन्शन मिळावी अशी नानासाहेबांनी कंपनीकडे मागणी केली.
  • पण डलहौसीने ती मागणी अमान्य करुन जहागीर व बाजीरावास दिले जाणारे वार्षिक पेन्शन देणे बंध केले.

कर्नाटक:

  • इ.स. 1853 साली नबाब गाउझखानाचा मृत्यू झाला.
  • त्याला मुलगा नसल्यामुळे मद्रास सरकारने केलेल्या शिफारशीवरून डलहौसीने नबाब पद खालसा केले.

तंजावर:

  • तंजावरच्या शिवाजी राजांना फक्त मुली होत्या मुलगा नव्हता, त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतीर तंजावर खालसा केले.

मोगल सम्राट:

  • मोगल सम्राटाचे नामधारी पद समाप्त करण्याचे डलहौसीने ठरविले.
  • पण कंपनीच्या संचालकांनी या गोष्टीस मान्यता दिली नाही. असे असूनही डलहौसीने सम्राट बहादूरशहाच्या एका मुलास आपल्या बाजूला वळवून घेतले युवराज पद मिळविण्याच्या मोहाने या राजपुत्राने दिल्लीचा लाल किल्ला कंपनीस देण्याचे व कंपनी सांगेल तेथे जाऊन राहण्याचे आश्र्वासन डलहौसीला दिले.

अव्यवस्था अराजकतेमुळे राज्य खालसा:

वऱ्हाड:

  • निजामाकडे तैनाती फौजेच्या खर्चाची बरीच बाकी थकली होती ती त्यास देणे शक्य नसल्यामुळे इंग्रजांनी 1851 मध्ये पैशांच्या मोबदल्यात वर्‍हाड व त्याच्याजवळचा काही प्रदेश निजामाकडून घेतला अशा धोरणामुळे हळूहळू कंपनीच्या राज्यातील तुटकपणा कमी होत जाऊन ते अधिक एकसंघ व एकरुप होऊ लागले.

औंध (अवध):

  • ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्य स्थापनेपासून हे राज्य कंपनीचे मित्र राज्य होते.
  • डलहौसी भारतात येण्याआधीच येथील नवाब उधळे व व्यसनी असल्यामूळे तेथे अराजकता निर्माण झाली होती.
  • डलहौसी आला तेव्हा ती अधिकच वाढली होती.
  • तेथील राज्यकारभारातील अराजकता थांबविण्यासाठी डलहौसीने स्लीमन व आऊटराम या रेसिडेंटांना पाठवले.
  • पण तेथील परिस्थिती नियंत्रबाहेर असल्याचे त्यांनी कळवले स्वत: डलहौसीने औध संस्थान खालसा केले.
  • तेथील नवाब वाजीद अलीशहा यास 12 लक्ष रु पेन्शन दिली.
  • औधचे संस्थान खालसा करणे म्हणजे फार मोठा अन्याय होता.

सिक्कीम:

  • हिमालयाच्या उतारावरील व नेपाळच्या सीमेलगत असलेले हे एक स्वतंत्र राज्य होते सिक्कीमच्या राजाने तेथील इंग्रज वकिलास बंदिवान करुन दोन इंग्रज माणसांचा अपमान केला होता.
  • त्यामूळे डलहौसी चिडला व त्याने या राज्यावर स्वारी करून दार्जिलिंगचा भाग जिंकून घेतला.

 

 

Subject English Summary: Important information in the competitive examinations is the British power and its consolidation. If you have detailed information on this topic, it will be easier to answer the related questions. For that, if you are honestly preparing for the competitive exams, then you must know and remember the details about the British rule and its unification.

Subject English Searching Title: British satta ani Tiche Akatrikaran study for competitive exams in Marathi.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x