GK - भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना
स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर भारतात मुस्लिम सत्तेची स्थापनेबद्दलची सविस्तर माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.
भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना:
महंमद गझनवी:
- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्या करून पंजापर्यंत प्रांत आपल्या राज्याला जोडला होता.
- सन 998 मध्ये त्याचा मुलगा महंमद हा गझनचा सुलतान झाला.
- त्याने सन 1001 ते 1027 पर्यंत भारतावर सतरा स्वार्या केल्या. या स्वार्या करतांना राज्य स्थापनेऐवजी भारतातील संपत्ती लुटून नेणे हा त्यांचा मुख्य हेतु होता.
- त्याने मथुरा व सोमनाथचे मंदिर लुटून अमाप संपत्ती गझनीला नेली.
महंमद घुरी:
- महंमद घुरी हा अफगाणिस्तानमधील एक सुलतान होता. महंमद गझनवी स्वार्यानंतर दीडशे वर्षांनी त्याने भारतावर आक्रमण केले.
- सन 1992 मध्ये तराईनच्या सुद्धा दिल्लीचा राजा पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली त्यानंतर कनोजचा राजा जयचंदचा पराभव करून त्याचे राज्य आपल्या ताब्यात घेतले पुढे त्याने बंगाल व बिहारवर आक्रमण करून सत्ता स्थापित केली.
- त्याने जिंकलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार बघण्याकरिता आपला विश्वासू सरदार कुतूबुद्दीन ऐबकची नियुक्ती केली.
- अशाप्रकारे भारतात मुस्लिम साम्राज्य प्रस्तापित झाले. त्यानंतरच्या काळात दिल्लीच्या गादिवर खालील सत्ताधीश आले.
कुतूबुद्दीन ऐबक (सन 1206 ते 1210)
- सन 1206 मध्ये महंमद घुरी मरण पावला. त्यानंतर कुतूबुद्दीन ऐबकने स्वत:ला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले.
- याच काळात ऐबकने दिल्लीच्या कुतुबमिनारच्या बांधकामास सुरवात केली.
- सन 1210 मध्ये तो मरण पावला.
- त्याच्या ठिकाणी त्याचा बदायुनचा सुभेदार आणि कुतूबुद्दीन ऐबकचा जावई अल्तमश सत्तेत आला.
शमशूद्दीन अल्तमश (सन 1210 ते 1226)
- कुतूबुद्दीन ऐबकच्या मुत्यूनंतर काही सरदारांनी अल्तमशविरुद्ध बंडखोरी केली होती. ती ऐबकने मोडून काढली आणि स्थिरता प्रस्थापित केली.
- बगदादच्या खलीपाने त्यास भारताचा सुलतान म्हणून मान्यता दिली.
- अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो.
- अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याने टका नावाचे नाणे सुरू केले होते. त्याने आपल्या हयातीमध्ये कुतूबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.
रझिया सुलतान (सन 1226 ते 1240)
- अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रझिया सुलतान दिल्लीच्या राजगादिवर आली. ती प्रजादक्ष आणि कर्तबगार स्त्री होती.
- परंतु, दिल्लीच्या सिंहासनावर एक स्त्री असने हे सरदारांना खपत नव्हते.
- दिल्लीचे सुलतान पद भूषविणारी ती एकमेव पहिली महिला होती.
- सन 1240 मध्ये तिचा वध करण्यात आला.
गियासुद्दून बल्बन (सन 1266 ते 1287)
- रझिया सुलतानच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर काही प्रमाणात अस्थिरता आली होती. सन 1266 मध्ये गियासुद्दीन बल्बन हा दिल्लीचा सुलतान झाला.
- त्याने आपल्या विरोधकाचा बंदोबस्त करून आपली सत्ता मजबूत केली.
- तात्काळ युद्ध करता यावे म्हणून त्याने खडे सैन्य ठेवण्याची प्रथा सुरू केली. यामुळे तास वायव्य सीमेवर मंगोलाचा बंदोबस्त करता आला.
- उर्दू भाषेचा रचयिता आणि प्रसिद्ध कवि या राजाचा दरबारी होता.
जलालूद्दीन खिलजी (सन 1290 ते 1296)
- गियासुद्दीन बल्बनच्या मृत्यूनंतर त्याचे वारस कमकुवत निघाले. याचा फायदा घेवून पंजाबचा प्रांधिकारी जलालूद्दीन खिलजीने दिल्लीच्या गादीवर आपला हक्क प्रस्तापित करून खिलजी वंशाची स्थापना केली.
- त्याचा पुतण्या अल्लाऊद्दीन खिलजी हा पराक्रमी आणि महत्वाकांक्षी होता.
- त्याने सन 1296 मध्ये देवगिरीवर आक्रमण करून अमाप संपत्ती लुटली.
- ही बातमी ऐकून जलालूद्दीन खिलजी आपल्या पुतण्याला भेटावयास कडा येथे गेला असता.
- अल्लाऊद्दीनने त्याचा वध केला आणि दिल्लीची सत्ता हस्तगत केली.
अल्लाऊदीन खिलजी (सन 1296 ते 1316)
- अल्लाऊद्दीन खिलजी हा महत्वाकांक्षी होता. त्याने अल्पावधीतच संपूर्ण भारत आपल्या नियंत्रणाखाली आणला.
- सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्तापित करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा दूसरा राजा होय.
अल्लाउद्दीन खिळजीचा साम्राज्य विस्तार
- सन 1299 मध्ये त्याने गुजरातवर आक्रमण करून गुजरातवर सत्ता प्रस्तापित केली.
- त्यानंतरच्या काळात राजपुताना, मेवाड, माळवा व राजस्थानवर ताबा मिळविला.
- सन 1306 मध्ये त्याचा सेनापती मलिक कफुरने दक्षिणेकडे मोहीम काढून दिवगिरी, तेलंगणा, मुदराईवर ताबा मिळविला.
- अशाप्रकारे अल्पावधीतच संपूर्ण भारत नियंत्रणाखाली आणला.
अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील सुधारणा
महसूल व्यवस्थेत सुधारणा:
- अल्लाउद्दीन खिलजीने जमिनीची मोजणी करून जमिनीच्या उत्पादकेनुसार शेतसारा निश्चित केला.
बाजार नियंत्रण व्यवस्था:
- सैन्यास खाद्यन्न आणि आवश्यक गरजेच्या वस्तु योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याने नियंत्रित बाजार व्यवस्था सुरू केली.
- या मालाचे भाव सरकारमार्फत निश्चित केले जात असे.
- त्याकरिता त्याने स्वतंत्र विभाग सुरू केला होता.
गियासुद्दीन तूघलक (सन 1320 ते 1325)
- अल्लाउद्दीन खिलजीच्या मुत्यूनंतर त्याचा मुलगा ख्रुस्त्रो खान सत्तेत आला.
- वायव्य सरहद्द प्रांताचा प्रांधिकारी गियासुद्दीन तुघलकने ख्रुस्त्रोखानचा खून करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली आणि तुघलक वंशाची स्थापना केली.
- हे सुख त्याला फार दिवस उपभोगता आले नाही.
- त्याचा मुलगा महंमदबिन तुघलकने कपटाने त्याला ठार करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली.
महंमदबिन तुघलक (सन 1325 ते 1351)
- महंमदबिन तुघलक हा उतावीळ्या स्वभावाचा आणि व्याहारकी दृष्टीकोणाच्या अभावामुळे त्या राबवितांना त्यास अपयश आले.
दूआबमध्ये करवृद्धी (सन1326)
- दूआब भारतातील सर्वात सुपीक प्रदेश आहे. या प्रांतातील शेतकर्यांवर कराची वाढ केली.
- ही योजना लागू करतांना दूआबमध्ये दुष्काळ पडला आणि अधिकार्यांनी जबरदस्तीने कराची वसूली केली. यामुळे दूआबमध्ये बंड झाले.
देवगिरी भारताची राजधानी (1326)
- दिल्लीचा बादशहा महंमदबिन तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवरती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली.
- सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह दिवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले.
- परंतु, दौलताबाद येथे साधंनाचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले.
- या काळात देवगिरीला भारताच्या राजधानीच सन्मान प्राप्त झाला होता.
चलन व्यवस्थेत सुधारणा (सन 1329)
- महंमदबिन तुघलकने मुद्रापद्धतीत सुधारणा करून तांब्याची मुद्रा प्रचारात आणली आणि सोन्याच्या मुद्रेच्या मोबदल्यात तांब्याची नाणे चलनात आली.
- लोकांनी घरीच टाकसाळ सुरू केला.
- बाजारात तांब्याच्या चलनाचा सुळसूळाट होवून सोन्याची नाणी गायब झाली.
फिरोझशहा तुघलक (सन 1351 ते 1388)
- महंमदबिन तुघलक नंतर त्याचा मुलगा फिरोझशहा तुघलक सुलतान झाला. हा उत्तमप्रशासक होता. त्याने लोककल्याणाची काम सुरू केली यामुळे तो विशेष प्रसिद्धीला आला होता.
- त्याने लोकांना जाचक असलेले कर रद्द करून फिरोझपूर, जौनपूर, हिस्सार व फिरोझाबाद ही नवीन शहरे बसविली सतलज आणि यमुना नदीवर कालवे काढले.
- फिरोजशहा तुघलक नंतर सत्तेत आलेले तुघलक घराण्याचे वारस कमकुवत निघाले.
- सन 1398 मध्ये मध्य आशियाचा सरदार तैमुलंगने भारतावर स्वारी करून प्रचंड लूट केली. या लुटीमधून दिल्ली महंमदबिन तूघलकने सुद्धा सुटली नाही.
- त्यानंतर सन 1414 मध्ये तूघलक घराण्याची सत्ता संपूष्ठात आली.
Subject English Summary: The important information in the competitive examinations is the establishment of Muslim power in India. If you have detailed information on this topic, it will be easier to answer the related questions. If you are sincerely preparing for the competitive exams, then you must know and remember the details of the establishment of Muslim rule in India.
Subject English Searching Title: Bharatat Muslim Sattechis Sthapana study of competitive exams in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL