24 November 2024 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

उद्याचा महाराष्ट्र दिनी इतिहासाचं स्मरण करून कामाला लागू - शरद पवार

Sharad Pawar, Facebook LIVE, Corona Crisis

मुंबई, ३० एप्रिल : ‘कोरोनाच्या रूपानं आज राज्यावर संकट आलंय. मात्र, संकटांवर धैर्यानं मात करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. उद्याचा महाराष्ट्र दिन साजरा करताना या इतिहासाचं स्मरण करून कामाला लागू या. यश नक्कीच मिळेल,’ असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला.

लॉकडाउनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभं राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे असं आवाहनही केलं. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असल्याने संख्या वाढत असल्याचं सांगितलं.

तसेच कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर हजारो लोक बेरोजगार होतील याची चिंता आहे. अनेकांना नोकरीवरुन काढण्यात येईल असं दिसतं. महामारीतून बाहेर पडल्यानंतर मनुष्यबळ लागेल त्याचाही विचार करावा लागेल. परराज्यातील लोक पुन्हा त्यांच्या राज्यात परतले आहेत. अनेक राज्यात कामगारांनी स्थलांतरण केलं आहे त्यामुळे बेरोजगारी आणि मनुष्यबळ ही समस्या उद्भावण्याची शक्यता असल्याचं शरद पवारांनी सांगितले.

 

News English Summary: Today, the state is in crisis in the form of Corona. However, Maharashtra has a history of overcoming adversity with courage. Let’s commemorate this history while celebrating tomorrow’s Maharashtra Day. Success will surely come, ‘said NCP President Sharad Pawar with great confidence.

News English Title: NCP President Sharad Pawar communicate on Facebook LIVE during corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x