जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा - आयएलओ अहवाल
वॉशिंग्टन, ३० एप्रिल : संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कोरोना विषाणूमुळे लोकांच्या नोकरी जाणार असल्याचा अंदाज पुन्हा एकदा वर्तवला आहे. या संघटनेनुसार एप्रिल ते जून या अवघ्या तीन महिन्यातच सुमारे ३०.५ कोटी लोकांच्या पूर्णवेळ नोकऱ्या जाणार आहेत. यापूर्वी या संघटनेने प्रत्येक आठवड्यातील ४८ तासांची पूर्णकालिक नोकरी असलेल्या १९.५ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या या विषाणूमुळे लॉकडाऊन वाढवला जाणार आहे. त्यामुळे या संघटनेला पुन्हा एकदा आपल्या अहवालात बदल करावा लागला आहे.
🚨Just out, Latest @ILO monitor: Expect 10.5 per cent deterioration, equivalent to 305 million full-time jobs.
1.6 billion workers in the informal economy – nearly half of the global workforce – face the danger of having their livelihoods destroyed.https://t.co/AmF79asqqN— International Labour Organization (@ilo) April 29, 2020
भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनामुळे जीडीपीमध्ये मोठा वाटा असणार्या खाजगी, गुंतवणूक आणि परदेशी व्यापाराला चांगला फटका बसला आहे. यामुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या कहर हा उद्योगधंद्यांवर देखील भारी पडणार आहे.
कोरोनाचा विमान वाहतुकीचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगातील बर्याच देशांमध्ये कोरोनामुळे लॉकडाउन आहे. भारताची उड्डाणे देखील पूर्णपणे बंद आहेत. या क्षेत्रात वेतन कपात व कॉस्ट कटींग सुरू झाली आहे. भारतातच या क्षेत्रातील हजारो नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. जर लॉकडाऊन आणखी वाढला तर अनेक विमान कंपन्यांच्या शटडाउन व्हायला उशीर लागणार नाही. जागतिक व्यापार सल्लागार कंपनी केपीएमजीच्या म्हणण्यानुसार, एविएशनसाठी हे २००८-०९ च्या मंदीपेक्षा मोठे संकट आहे.
दुसरीकडे लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील बेकारीचा दर २६.२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. लॉकडाऊनमुळे देशातीलसुमारे १४ कोटी लोक बेकार झाले आहेत असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयइ) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सांगितले. ते म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात ४० टक्के असलेले देशातील रोजगाराचे प्रमाण आता २६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. देशामध्ये सुमारे १ अब्ज लोक विविध प्रकारची कामे करून आपली रोजीरोटी कमावत असतात.
News English Summary: The United Nations International Labor Organization has once again predicted that people will lose their jobs due to the corona virus. According to the organization, about 30.5 crore people will lose their full-time jobs in just three months from April to June. Earlier, the union had said it would cut the jobs of 19.5 crore people with 48-hour full-time jobs every week. The virus, which has caused havoc around the world, is expected to increase lockdown. So this organization has once again had to change its report.
News English Title: Story Corona virus kill more than 300 million jobs till June 2020 worldwide covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News