16 November 2024 3:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

GK - महाराष्ट्रातील समाजसुधारक

स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर महाराष्ट्रातील समाजसुधारकांबद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.

महाराष्ट्रातील  समाजसुधारक

गोपाल गणेश आगरकर:

  • जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.
  • मृत्यू : 17 जून 1895,पुणे
  • 1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.
  • 1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.
  • बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर.

संस्थात्मिक योगदान:

  • 1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .
  • 15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.
  • गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.
  • स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.
  • अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.
  • शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.
  • डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस  हे पुस्तक.
  • हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.

वैशिष्टे:

  • राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.
  • हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.
  • बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.
  • ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.
  • जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

धोंडो केशव कर्वे:

  • जन्म – रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.
  • मृत्यू – 9 नोव्हेंबर 1962.
  • 1942 – बनारस विद्यापीठाची डि. लिटू.
  • 1958 – भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.
  • कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.
  • स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.
  • विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान:

  • 1893 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी.
  • 1 जानेवारी 1899 – अनाथ बालिका आश्रम.
  • 1907 – हिंगणे महिला विद्यालय.
  • 1910 – निष्काम कर्मकठ.
  • 1916 – महिला विद्यापीठ, पुणे.
  • 1916 – महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.
  • 1 जानेवारी 1944 – समता संघ.
  • 1945 – पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.
  • 1948 – जातींनीर्मुलन संघ.
  • 1918 – पुणे – कन्याशाळा.
  • 1960 – सातारा – बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे:

  • मानवी समता – मासिक.
  • 1893 – विधवेशी पुनर्विवाह.
  • 1894 – पुनर्विवाहितांचा मेळावा.
  • 1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.
  • 1928 – आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.
  • जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.
  • ‘अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार’ – आचार्य अत्रे.

आचार्य विनोबा भावे:

  • जन्म – 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).
  • मृत्यू – 11 नोव्हेंबर 1982.
  • आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.
  • भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.

संस्थात्मक योगदान:

  • 1921 – वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.
  • संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.
  • 18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.
  • कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.

आचार्य यांचे लेखन:

  • 1923-महाराष्ट्र धर्म मासिक.
  • गीताई – भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.
  • मधुकर(निबंधसंग्रह)
  • गीता प्रवचने.
  • ‘स्वराज्य शस्त्र‘ हा ग्रंथ.
  • विचर पोथी.
  • जीवनसृष्टी.
  • अभंगव्रते.
  • गीताई शब्दार्थ कोश.
  • गीताई – धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.

वैशिष्टे:

  • वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.
  • गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.
  • चंबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.
  • मंगरौठ – उत्तरप्रदेश येथे ‘सब भूमी गोपाल की’ हा नारा दिला.
  • ‘जय जगत‘ घोषणा

भाऊराव पायगोंडा पाटील

  • जन्म – 22 सप्टेंबर 1887, कुंभोज, जी. कोल्हापूर.
  • मृत्यू – 9 मे 1959.
  • महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे त्यांना म्हटले जात.
  • 22 सप्टेंबर 1887 पहिला श्रमप्रतिष्ठादिन.
  • भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ ही पदवी गाडगे महाराजांनी दिली.
  • 22 सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दी म्हणून साजरा केला जातो.
  • ग्रामीण शिक्षणप्रसारासाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा द्रष्टा समाजसुधारक.
  • रयतेचे बोधचिन्ह : वटवृक्ष.

संस्थात्मक योगदान:

  • 1910 – स्थानिक लोकांच्या मदतीने दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना, (1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)
  • 4 ऑक्टोबर 1919 – काले, ता. कर्‍हाड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना.(1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)
  • 1924 – छत्रपती शाहू बोर्डिंग, सातारा येथे स्थापना (ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी). छत्रपती शाहू बोर्डिंगचे उद्घाटन म. गांधीच्या हस्ते झाले. बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष हमीद आली होते.
  • 1932 – पुणे कराराचे स्मरण म्हणून मुलींसाठी Union Boarding House स्थापन.
  • 1935 – प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणासाठी सातारा येथे Silver Jubilee Rural Training College स्थापले.
  • 1940 – महाराजा सायाजीराव हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू केली (सातारा).
  • 1947 – छत्रपती शिवाजी कॉलेज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे स्थापले.
  • स्वावलंबी शिक्षणासाठी ‘कमवा व शिका योजना‘.
  • गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्यूकेशन फंड स्थापना ही योजना राबवली.

वैशिष्टे:

  • समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक.
  • वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थांच्या मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न.
  • म. फुले, राजर्षी शाहू, म. गांधी यांचा प्रभाव. सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव.
  • स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.
  • श्रमाच्या प्रतिष्ठेला शैक्षणिक तत्वज्ञानात महत्वाचे स्थान.
  • तुम्हास जर एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा ! शंभर वर्षाची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा ! हा संदेश.
  • शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेऊन बहुजन समाजाला समर्थ बनविले.
  • महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन–ह. रा.महाजनी.
  • भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तिस्तंभ है – म. गांधी.
  • ‘जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीर अण्णाना जगातील सर्व विद्यापीठांच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल ‘ डॉ. पंजाबराव देशमुख यांची प्रतिक्रिया.

महादेव गोविंद रानडे:

  • जन्म – 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).
  • मृत्यू – 16 जानेवारी 1901.
  • रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात.
  • तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे.
  • रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.
  • 1886 – भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.
  • रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते.
  • त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .
  • समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.
  • रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .
  • 1887 – सामाजिक परिषद.
  • 1890 – औद्योगिक परिषद.
  • त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान:

  • 1865 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.
  • 1867 – मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.
  • 1870 – सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.
  • उद्दीष्ट – थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.
  • वकृत्वोत्तेजक सभा – पुणे.
  • नगर वचन मंदिर – पुणे.
  • 1875 वसंत व्याख्यान – माला (पुणे).
  • 1882 – हुजूरपागा शाळा (पुणे).
  • 31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.
  • 1896 – हिंदू विडोज होम.
  • इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .
  • मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.
  • पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.
  • 1889 – Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन:

  • इंदु प्रकाश (मासिक).
  • एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.
  • 1874 – जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.
  • 1888 – ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.
  • मराठी सत्तेचा उदय.
  • मराठी पत्रकारितेचा पाया घातला.
  • निबंध – प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.
  • ‘तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य‘ हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये:

  • ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.
  • भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.
  • 1873 – 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.
  • पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.
  • संमतीवय विधेयकास पाठिंबा.
  • इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.
  • दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.
  • ‘महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.’ टिळकांचे मत.

विठ्ठल रामजी शिंदे:

  • जन्म – 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.
  • मृत्यू – 2 जानेवारी 1944.
  • 1932 – 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
  • ‘महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी‘ गं. बा. सरदार.
  • ‘निष्काम कर्मयोगी‘, भाई माधवराव बागल.
  • जनतेकडून ‘महर्षी‘ ही पदवी.
  • अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान:

  • 1905 – मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.
  • 18 ऑक्टोबर 1906 – डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष – न्या. चंदावकर.
  • 1910 – जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.
  • द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने ‘सेवा सदन‘ ही संस्था.
  • अनाथाश्रम – रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
  • ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.
  • 23 मार्च 1918 – अस्पृश्यता निवारक संघ.
  • 1918 – मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.
  • 1920 – पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.
  • 1937 – स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.
  • 1923 – तरुण ब्रहयो संघ.
  • 1937 – बहुजन पक्षाची स्थापना.
  • स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.
  • वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन:

  • प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन
  • 1903 – प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक
  • 1903 – ऍमस्टरडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ हा निबंध वाचला
  • Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला
  • Untouchable India
  • History Of Partha
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र

वैशिष्ट्ये:

  • शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.
  • अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.
  • 1904 – मुंबई धर्म परिषद.
  • 1905 – अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.
  • 1918 – मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.
  • 1924 – वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.
  • 1935 – बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.
  • स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.
  • शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर:

  • जन्म – 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.
  • मृत्यू – 6 डिसेंबर 1956, मुंबई.
  •  त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.
  • तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.
  • 1990 – 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.
  • हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना ‘आधुनिक मनू‘ म्हटले जाते.
  • सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.
  • आंबेडकर हे 1947 – 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.

संस्थात्मक योगदान:

  • 1924 – बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.
  • 1924 – बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.
  • 20 मार्च 1927 – महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.
  • 25 डिसेंबर 1927 – मनुस्मृती दहन.
  • 2 मार्च 1930 – नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)
  • 24 सप्टेंबर 1932 – पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.
  • 1933 – मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.
  • ऑगस्ट 1936 – स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.
  • 1937 – बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.
  • 1942 – नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.
  • मे – 1946 : Peoples Education Society स्थापना.
  • 20 जुलै 1946 – सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.

आंबेडकरांचे लेखन:

  • The Problem Of Rupee
  • 1916 – Cast In India
  • 1930 – जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)
  • 1946 – The Untouchables
  • 1956 – Thoughts on pakisthan.
  • 1957 – बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.
  • ‘मुकनायक‘ ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर ‘बहिकृत भारत‘ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.
  • 1920 – मुकनायक.
  • 1927 – समता.
  • 1946 – Who Were Shudras?

वैशिष्ट्ये :

  • गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.
  • 1920 – च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.
  • 1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.
  • 1935 – येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.
  • शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.
  • 29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.
  • 1948 – हिंदू कोडबिल संसदेत मांडले.
  • 14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

महात्मा ज्योतिबा फुले:

  • मूळ आडनाव – गोह्रे
  • जन्म – 11 एप्रिल 1827
  • मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890
  • 1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.
  • 1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.
  • 21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.
  • युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय:

  • आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्‍यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण:

  • फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

विवाह:

  • महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

संस्थात्मक योगदान:

  • 3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
  • 4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
  • 1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
  • 1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
  • 1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
  • 1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
  • 10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
  • 24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
  • व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
  • 1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
  • महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :
  • 1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).
  • 1868 – ‘ब्राम्हणांचे कसब‘
  • 1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.
  • 1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.
  • 1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.
  • 1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.
  • 1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.
  • 1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.
  • अस्पृश्यांची कैफियत.
  • शिवाजी महाराजांचा पोवाडा.

महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये:

  • थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.
  • 1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
  • 1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.
  • 1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.
  • 2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.
  • ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.
  • उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.
  • सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘
  • सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

राजर्षि शाहू महाराज:

  • जन्म – 16 जुलै 1874.
  • मृत्यू – 6 मे 1922.
  • एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.
  • महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
  • भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

संस्थात्मक योगदान:

  • ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
  • 1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
  • नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
  • 1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
  • 15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
  • 1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
  • 1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
  • 1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
  • 1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
  • 14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
  • लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
  • पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
  • जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
  • 1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
  • 1917 – विधवा विवाहाचा कायदा.
  • 1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
  • 1918 – महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
  • वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
  • 1920 – माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
  • 1895 – गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
  • 1899 – वेदोक्त प्रकरण – सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत. यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
  • 1906 – शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
  • 1907 – सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
  • 1911 – सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
  • 1911 – भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
  • 1912 – कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
  • 1916 – निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
  • 1918 – कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
  • 1918 – आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
  • 1919 – स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
  • 1920 – घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
  • 1920 – हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
  • कोल्हापूर शहरास ‘वस्तीगृहांची जननी‘ म्हटले जाते.
  • ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.

वैशिष्टे:

  • महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.
  • सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.
  • जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.
  • पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.
  • उदार विचार प्रणालीचा राजा.
  • राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.
  • कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King – भाई माधवराव बागल.
  • शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता. – वि. रा. शिंदे.
  • टीकाकारांकडून ‘शुद्रांचा राजा‘ असा उल्लेख.

 

Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.

Subject English Searching Title: Maharashtratil Samajsudharak study for competitive exams in Marathi.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x