न पाठवलेलं पत्र..!
मला माहीत होतं तुझ्या पत्रात असाच काहीसा मजकूर असेल… म्हणून पत्र उघडून वाचावे असे मनात येऊ दिलेच नाही… मनावर जरी नियंत्रण असले तरी हृदयावर कुठं नियंत्रण मिळवता येते? पाण्याला बांध घालून निश्चित अडवता येत असतं पण आठवणींच्या उधाणलेल्या लाटांना काही करुन थोपवता येत नसतं…ओझं बननं आणि ते पेलनं दोन्ही दुय्यम गोष्टी आहेत.
आपण कुणावर ओझं बनत आहोत अशी आपली वैचारिकताही एक ओझंच आहे. मुळात जबाबदारी व आयुष्याच्या प्रवास सुखकर होण्यासाठी बांधली गेलेली गाठ ही ओझं वाहून घेण्यासाठी पडत नसते..
समजनं, स्वीकारनं आणि आपलं करणं या प्रेमाच्या हळव्या व्यवहारात आपलं ओझं-मन वाटून घेणं असतं. जेणेकरुन आयुष्याच्या प्रवास हसत खेळत पूर्ण होईल… गालावर ओघळलेल्या अश्रुमधुन तुला मोकळं आणि व्यक्त होता येतं..पण माझं काय? हताश, आधार आणि ढासळनं काही केल्या तुला रुचणारं नसतं…
स्वतःबद्दल तुझ्याकडूनच माझ्या एवढ्या चांगल्या कल्पना असल्यावर तुझं सात्वन आणि तुझ्या व्यक्त होण्याच्या वाटेवर अडगळ म्हणून मी माझं अस्तित्व का ठेवावं? गालावर ओघळलेल्या आसवांना ओठांनी टिपतांना समाधान मिळत नाही. उलट मनात पडलेल्या कोरडला थोडा ओलावा मिळतो…
खरंच शोधायचे असेल तुला तर समाधान हे ओठांवरच्या आणि नजरेच्या हसण्यात शोधून बघ! बंधारा भरला म्हणून धरणाची दारं ही उघडाविच लागतात कारण साठवणुकीची मर्यादा ही ठरलेली असते. वाहत जाणाऱ्या पाण्याकडून आपण फक्त प्रत्येक क्षणाला आणि घटकाला स्वीकारायचे कसे? हे शिकायचे असते..!
लेखक: पियुष खांडेकर
Marathi Love Letter English Title: Marathi Love Letter Na Pathavalela Patra written by Piyush Khandekar.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL