22 November 2024 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

देशात लॉकडाउन आणखी दोन आठवड्याने वाढला

India Lockdown, Corona Crisis, Covid 19

नवी दिल्ली, १ मे: देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला होता. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे शुक्रवारी परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असेल आणि ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे.

देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आलंय. ग्रीन झोनमध्ये आर्थिक घडामोडींना सूट देण्यात आलीय. ३ मेनंतर या देशातील ७३९ पैंकी ग्रीन झोनमध्ये असलेल्या ३१९ जिल्ह्यांमध्ये फॅक्टरी, दुकानं, छोटे-मोठे उद्योग यांसहीत ट्रान्सपोर्ट आणि इतर सेवा काही अटींसहीत उघडण्याची परवानगी देण्यात आलीय. या जिल्ह्यांत गेल्या २१ दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

गृह मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशानुसार, ग्रीन झोनमध्ये ३१९ जिल्ह्यांत बस सेवा सुरू केली जाऊ शकेल. परंतु, बसची क्षमता ५० टक्क्यांहून अधिक राहणार नाही. त्यामुळे ५० आसनी बसमध्ये केवळ २५ प्रवासीच प्रवास करू शकतील. त्याच पद्धतीने डेपोमध्येही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत. या जिल्ह्यांत न्हावी, सलून यांसहीत अन्य महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू पुरवणाऱ्या संस्थांनाही ४ मेपासून सूट मिळू शकेल. सिनेमा हॉल, मॉल, जिम, स्पोर्टस कॉम्प्लेक्स इत्यादी बंद राहतील.

रेड झोनमध्ये काय सुरु काय बंद?

  • सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सीवर बंदी
  • दोन जिल्ह्यांमध्ये होणारी बस वाहतूक बंद.
  • केशकर्तनालय दुकाने, स्पा बंद
  • रेड झोनमध्ये परवानगी घेऊन चारचाकीमध्ये दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा असेल.
  • अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने रेड झोनमध्ये बंद राहतील. मात्र कॉलिनीमध्ये असणारी दुकाने उघडी ठेवणाची परवानगी आहे.

 

News English Summary: The central government has announced a two-week lockdown across the country. The Central Government has issued a statement in this regard. The second phase of the lockdown was to be completed on May 3. Earlier, the government had announced to increase the lockdown once again. The government has made it clear that no parts of the red zone will be given concessions during the lockdown.

News English Title: Union Government Increased Lockdown Time By Two Weeks Corona virus covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x