22 November 2024 8:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

दिल्लीत एकाच इमारतीत राहणाऱ्या ४१ जणांना कोरोनाची बाधा

Corona Crisis, Covid 19, Delhi Kapashera Area Building

दिल्ली, २ मे:  दक्षिण-उत्तर दिल्लीतील डीएम ऑफीसकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ एप्रिल रोजी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने ही इमारत सील करण्यात आली होती. सर्वसाधारणपणे तीनपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यावर परिसर सील करण्यात येतो. मात्र येथे असलेल्या दाट लोकवस्तीमुळे एक रुग्ण सापडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला होता.

येथील सर्व लोकांचा कोरोना चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून, त्यामध्ये या इमारतीत राहणाऱ्या ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एकूण ३ हजार ७३८ कोरोनाबाधित आहेत. तसेच दिल्लीमध्ये आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मात्र समाधानाची बाब म्हणजे दिल्लीत आतापर्यंत ११६७ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिल्लीला लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाधिक कोरोना चाचण्या घेण्यावर भर दिला आहे.

देशभरातील एकूण करोना रुग्णांची संख्या पोहोचली ३७,३३६ वर, त्यांपैकी एकूण ९,९५० रुग्ण बरे झाले. तसेच करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली १,२१८ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारी दोन आठवडय़ांसाठी टाळेबंदी वाढवितानाच आरोग्य मंत्रालयाने देशभरातील करोनाबाधित लाल, नारंगी आणि हिरव्या श्रेणी (झोन) जाहीर केल्या आहेत. देशभरातून १३० जिल्हे हे लाल श्रेणीत आहेत, तर २८४ जिल्हे हे नारंगी श्रेणीत आणि ३१९ जिल्हे हे हिरव्या श्रेणीत आहेत.

 

News English Summary: The building was sealed on April 19 after a corona-positive patient was found here, according to information received from the DM’s office in south-north Delhi. The premises are usually sealed when more than three patients are found. However, due to the dense population, the area was sealed off as a precaution after a patient was found.

News English Title: Story shocking 41 test corona Covid 19 positive from same building in Delhis Kapashera News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x