22 November 2024 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

जगभरात लष्कराचा वापर मेडिकल मदतीसाठी; भारतात कोरोना वॅरियर्सला सलामीसाठी होणार

Corona Crisis, Corona Warriors, Indian Air Force, Indian Navy, Indian Army

मुंबई, ३ मे: कोरोना साथीच्या या संकटकाळात आपले जीवन पणाला लावल्याबद्दल उद्या रविवारी भारतीय सशस्त्र सैन्याने त्यांच्या शैलीत आभार मानण्याची योजना आखली आहे. यासाठी भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलाने जोरदार सराव केल्याचं वृत्त आहे. शनिवारी भारतीय नौदलाच्या जवानांनी मुंबईच्या किनाऱ्यावर कोरोना वॉरियर्सचे आभार मानण्यासाठी सराव केला आहे. विशेष म्हणजे कोणतीही घोषणा न करता मोदी सरकारच्या आदेशाने रचलेला हा तिसरा टास्क आहे जो लष्कराला दिला गेल्याच म्हटलं जातं आहे. परदेशात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कराची मदत घेतली जातं असताना मोदी सरकार गरज नसताना हे नेमकं कशासाठी करत आहे ते कळू शकलेलं नाही. त्यात हे खर्चिक असल्याचं देखील म्हटलं गेलं आहे.

हवाई दलातर्फे दोन फ्लाय पास्ट केल्या जातील. सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांनी शुक्रवारी सांगितले की यापूर्वी कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव केला जाईल. दोन फ्लाय पास्ट पैकी एक श्रीनगर ते त्रिवेंद्रम आणि दुसरा डिब्रूगड ते कच्छ दरम्यान असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

तर भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्य दलाची तब्बल ४६ जहाज लाईट्सने प्रकाशित केली जातील. तब्बल ७५१६ किलोमीटर किनाऱ्यावर पसरलेल्या २५ ठिकाणी ग्रीन लाईट्सची उधळण होईल आणि जहाजांचे सायरन वाजवले जातील. यासह कोविड १९ संबंधित सेवा देणाऱ्या ५ इस्पितळांवर सुमारे १० हेलिकॉप्टरने फुलांची वर्षाव करण्यात येईल. कोरोना वॉरियर्सच्या सन्मानार्थ, तटरक्षक दलातर्फे त्रिवेंद्रमसह संपूर्ण किनारपट्टीवरील दिवे लावले जातील. गांधीनगरमधील आर्मी बँड कोरोना वॉरियर्सचे आभार मानतील. पोरबंदरमध्येही नौदलाने आपले जहाज सकाळी ७.३० ते दुपारी १२ या वेळेत लाईटसह प्रकाशमय करतील. विशेष म्हणजे सन्मान सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी नौदलाने शनिवारी सराव केल्याचं वृत्त आहे.

दिल्ली येथे एम्स इस्पितळाबाहेर रविवारी सकाळी १० वाजता, कॅन्ट बोर्ड हॉस्पिटल, नरेलाच्या हॉस्पिटलबाहेर, बेस हॉस्पिटल सकाळी १०.३० वाजता आणि गंगाराम हॉस्पिटल सकाळी ११ वाजता आणि आर अँड आर हॉस्पिटलच्या बाहेर आर्मी बँड सादर करतील. दिल्लीमध्ये सामान्य लोकं एअरफोर्सच्या लढाऊ विमानांचे उड्डाण पाहू शकतील.

 

News English Summary: The Indian Armed Forces will thank the Indian Armed Forces on Sunday, May 3 in their style for putting their lives at stake in this crisis period of the Corona epidemic. The Indian Army, Navy and Air Force also rehearsed it on Saturday. On Saturday, Indian Navy officers and Jawans held a special exercise to thank the Corona Warriors off the coast of Mumbai.

News English Title: Story Indian Navy Indian Army and Indian Air Force exercises to thank corona warriors News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x