22 April 2025 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

काश्मीरच्या हंदवाडात चकमक; दोन अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद

Indian Army, Jammu Kashmir

जम्मू, ३ मे: भारत-पाकिस्तान सीमेवर शनिवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती. एएआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

शहीद जवानांमध्ये कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक शकील काझी यांचा समावेश आहे. हंदवाडाच्या चंजमुल्ला भागात दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. त्यांची सुखरुप सुटका करण्यासाठीच्या मोहिमेवर असलेल्या पथकाचं कर्नल आशुतोष शर्मा हे नेतृत्व करत होते, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या पाच वर्षांत कर्नल किंवा कमांडिंग ऑफिसर पदावरील अधिकारी दहशतवादी चकमकीत धारातीर्थी पडण्याही ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जानेवारी २०१५ मध्ये कर्नल एम.एन. रॉय तर नोव्हेंबर २०१५मध्ये कर्नल संतोष महाडिक हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. यानंतर आता कर्नल आशुतोष शर्मा यांच्या रुपाने भारतीय सैन्याने आणखी एक वीर गमावला आहे. कर्नल आशुतोष शर्मा हे गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात कार्यरत होते. यादरम्यान त्यांना दोनवेळा शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले होते.

 

News English Summary: Security forces clashed with militants on the Indo-Pakistan border on Saturday night. Three soldiers along with two army officers were killed in the encounter. Soldiers have succeeded in nabbing two terrorists. In Handwada in Kupwada district, the scuffle between the militants and security guards lasted for about eight hours.

News English Title: Story Jammu And Kashmir Five Jawans Martyred Including Two Indian Army Officers Two Terrorists Killed News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या