22 November 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना सोबतच जगायला शिकावे लागेल; अन्यथा लोकं उपासमार होऊन मरतील

Infosys Founder Narayan Murthy, CM Arvind Kejriwal, lockdown, Covid 19

बंंगळुरू, ३ मे: भारताला कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावे लागेल आणि लॉकडाऊन हटवावा लागेल. याचे कारण लॉकडाऊन हटवला नाही तर कोरोनामुळे जेवढे मृत्यू होतील, त्यापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणामुळे मरतील, असे स्पष्ट प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी केले आहे. ते एका उद्योगपतींच्या वेबिनारला मुख्य अतिथी म्हणून संबोधित करत होते.

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मृत्युदर केवळ ०.२५ ते ०.५० टक्के इतका अल्प आहे. विकसित देशांच्या तुलनेत करोनाचा मृत्युदर खूपच कमी आहे. ३ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवल्याले कोरोनाची साथ रोखण्यास भारत आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे, असे मूर्ती यांनी सांगितले. ३० जानेवारीला देशात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तेव्हापासून देशात ३१ हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १००८ जणांचा मृत्यु झाला आहे.

देशात दरवर्षी ९० लाख लोकांचा विविध कारणांमुळे मृत्यु होतो. यातील एक तृतीयांश लोक प्रदूषणामुळे आपला जीव गमावतात. जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांपैकी भारत एक आहे. जर ९० लाख लोकांचा जर नैसर्गिकपणे मृत्यु होत असतील आणि त्याची तुलना मागील दोन महिन्यातील १००० लोकांच्या मृत्युशी केली तर ही संख्या खूपच कमी आहे. आपण जितके घाबरतो आहोत तितकी परिस्थिती गंभीर नाही, असे मूर्ती यांनी स्पष्ट केले.

केवळ ६.६० कोटी लोकसंखा असलेल्या इंग्लंडसारख्या देशात १४,००० बळी कोरोनाने घेतले आहेत, असे मूर्ती यांनी सांगितले. लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढला असला तरी आतापर्यंत भारताने कोरोना संक्रमितांची संख्या मर्यादित ठेवली आहे व कोरोनाचा आलेख वर जाऊ दिलेला नाही. ३० जानेवारीला कोरोनाच्या पहिला रुग्ण आढळल्यापासून आजवर फक्त ३१ हजार लोक संक्रमित झाले व त्यापैकी १००७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, याकडेही मूर्ती यांनी लक्ष वेधले.

दुसरीकडे, एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केजरीवाल यांनी कोरोना, लॉकडाऊन आणि या परिस्थितीचा सामाना करणारा आपला देश या विषयांवर त्यांची मतं मांडली. कोरोना व्हायरसवर ल़ॉकडाऊन हा काही उपाय नाही. पण, या मार्गाने कोरोनाला आळा घालण्यास मदत होऊ शकते, असं ते म्हणाले. शिवाय केंद्र सरकार आणि पंतप्रधानांकडून वेळीच घोण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केलं.

मुळात कोरोना विषाणूवर अद्यापही कोणत्याही प्रकारची प्रभावी लस सापडलेली नाही. या परिस्थिती विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी म्हणून लॉकडाऊनचा पर्याय निवडला गेला. पण, त्यामुळे काही या विषाणूचा खात्मा होणार नाही. असं असलं तरीही वाढत्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यास नक्कीच मदत होईल, असं ते म्हणाले.

 

News English Summary: India will have to learn to live with the corona virus and remove the lockdown. The reason for this is that if the lockdown is not removed, more people will die of starvation and malnutrition than coronas, says Infosys founder N.R. Narayanamurthy has done. He was addressing an industrialist’s webinar as the chief guest.

News English Title: Story Infosys Founder Narayan Murthy and Delhi CM Arvind Kejriwal urge to remove lockdown Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x