8 September 2024 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

काँग्रेस करणार मजुरांचा तिकीट खर्च, सोनिया गांधींची घोषणा

Sonia Gandhi, Congress, Migrants labours, Corona Crisis, Traveling Cost

नवी दिल्ली: केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा सवाल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. सोनिया गांधी यांनी सोमवारी एक पत्रक जारी केले. या पत्रकात त्यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सरकारने विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली. रेल्वे परिपत्रकानुसार स्थानिक सरकारी अधिकारी सर्व पडताळणी करून मजुरांना तिकिटे देतील आणि त्यांच्याकडून तिकीट भाडे आकारले जाईल. मजूर आणि कामगारांकडून आकारण्यात येणारी तिकिटाच्या स्वरूपातील एकूण रक्कम ते अधिकारी रेल्वेला देणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदी सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच देश १९४७ च्या फाळणीनंतर प्रथमच इतक्या वाईट परिस्थितीला सामोरे जात असल्याचे सोनियांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने केवळ चार तासांची आगाऊ सूचना देऊन देश लॉकडाऊन केला. यामुळे लाखो स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतू शकले नाहीत. आता ते नाईलाजाने शेकडो मैलांची पायपीट करून आपल्या गावी जात आहेत. त्यांच्याकडे अन्नधान्य नाही, औषधे नाहीत, पैसे नाहीत, आहे ती केवळ आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची ओढ. हे सर्व चित्र मन हेलावून टाकणारे आहे.

सोबतच त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘आपण परदेशात अडकलेल्या भारतीयांना आपलं कर्तव्य समजून विमानं पाठवून निशुल्क परत आणू शकतो, गुजरातच्या केवळ एका कार्यक्रमासाठी सरकारी खजान्यातून १०० करोड रुपये ट्रान्सपोर्ट आणि भोजन इत्यादीवर खर्च करू शकतो, जेव्हा रेल्वे मंत्रालय पंतप्रधानांच्या करोना फंडात १५१ कोटी दान करू शकतात, तर केवळ प्रगतीच्या या ध्वजवाहकांना तुम्ही निशुल्क रेल्वे प्रवासाची सुविधा देऊ शकत नाहीत का?’ असा प्रश्नही सोनिया गांधींनी मोदी सरकारला आणि रेल्वे मंत्रालयाला विचारलाय.

 

News English Summary: Sonia Gandhi announced that the Congress would bear the cost of the train journey to send the workers home. The nationwide lockdown has been extended to May 17 to prevent the corona virus. On Friday, the government began releasing special vehicles to transport stranded workers to their homes.

News English Title: Story congress party will bear fare of migrant workers going back to their home Sonia Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x