22 November 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी आपल्या नावाआधी ‘गुजरात का चौकीदार’ असं लिहावं

IFSC, Raju Parulekar, Devendra Fadnavis

मुंबई, ४ मे: देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी (IFSC) भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आपलं आपयश लपवण्यासाठी तसंच एकही दमडीचं काम केलं नाही हे लपवण्यासाठी मोदी सरकारवर आरोप केले जात असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

एकूण राज्यातील सर्व भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचा विचार न करता गुजरातची बाजू भक्कम पणे उचलून धरल्यावर राज्यातून सर्वच थरातून संताप व्यक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. याच विषयावरून पत्रकार राजू परुळेकर यांनी देखील महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. राजू परुळेकर यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्व भाजपा नेत्यांनी आपल्या नावाअगोदर नुसतं ‘चौकीदार’ लिहिलं होतं ते आता कायम ‘गुजरात का चौकीदार’ असं लिहावं. पाहिजे तर हातावर गोंदुन घ्यावं.’

 

News English Summary: Journalist Raju Parulekar has also lashed out at BJP leaders in Maharashtra over the same issue. Raju Parulekar tweeted, “All BJP leaders in Maharashtra used to write ‘Chowkidar’ before their names, but now it should be written ‘Gujarat Ka Chowkidar’.” If you want, you can get it on your hands. ‘

News English Title: Story Journalist Raju Parulekar criticized Maharashtra BJP leaders over IFSC issue News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x