वाईन शॉप खुले; सरकारने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवलंय - डॉ. अभय बंग

गडचिरोली, ४ मे : देशभरात लॉकडाउनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. आजपासून रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. याबरोबरच आजपासून देशभरात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दारूपासून दूर असलेल्या लोकांनी सूट मिळताच आज सकाळपासूनच दारूच्या दुकानांपुढे रांगा लावल्या. काही ठिकाणी तर सकाळी दुकाने उघडण्याच्या दोन तास आधीपासूनच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली दिसली.
एकीकडे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच ग्रीन आणि ऑरेंज झोनसह रेड झोनमधील काही उद्योग, व्यवसासांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरुवात झाल्यापासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली असून, १ मे ते ३ मे या अवघ्या तीन दिवसांच्या काळात देशात कोरोनाचे तब्बल साडे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४२ हजारांच्या वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांत पंजाब आणि दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे तळीरामांची संख्या पाहता कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरून डॉ. अभय बंग यांनी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
‘मोदी सरकार आणि महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रसार थांबविण्यासाठी अतिशय स्तुत्य पावले आतापर्यंत उचलली. पण रविवारी लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपता संपता देशातील रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्वच ठिकाणी दारूबंदी उठवली. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोक्याचा’, असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. तसंच, ‘कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवले आहे. त्यामुळेच हे अतर्क्य पाऊल’ असल्याचे डॉ. बंग म्हणाले.
‘कोरोनामुळे आजच्या तारखेपर्यंत भारतात ४२ हजारावर लोकांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला आहे तर १३०० च्या पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाले आहे. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्याच वेळी भारतात दर वर्षी दारूमुळे 5 लक्षं मृत्यू होतात. भारतातील ५ कोटी लोकं दारूच्या व्यसनाने ग्रासित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे. म्हणजे कोरोना संसर्ग आणि होणार्या मृत्यूपेक्षा दारूचे व्यसन आणि त्यामुळे भारतात होणारे मृत्यू हजार पटीने जास्त आहे’, अशी माहिती बंग यांनी दिली.
News English Summary: The third phase of lockdown across the country has started from today. Starting today, Red, Orange and Green zones have been given some discounts. In addition, liquor shops have been allowed to open across the country from today. People who have been away from liquor for the last one and a half months have been queuing in front of liquor shops since this morning to get relief. In some places, people started queuing up two hours before the shops opened in the morning.
News English Title: Story during lockdown decision to lift the alcohol ban is dangerous say Dr Abhya Bang News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB