22 November 2024 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

फेसबुक-ट्विटर 'फेक' अकाउंट्स, खोट्या राजकीय 'हवा' निर्मितीसाठी ?

मुंबई : २०१४ पासून समाजमाध्यमांवरील निरीक्षणातून हे उजेडात येत आहे की, ट्विटर आणि फेसबुकवरील हे ‘फेक फॉलोअर्स’ त्यांच्या राजकीय नेत्याची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच विरोधी नेत्याबद्दल दूषित वातावरण निर्मिती करण्यासाठी शिस्तबद्ध वापरली जात आहेत. काही दिवसांपूवीच ट्विटरने अधिकृत पणे भारतातील तसेच जगातील सर्वच राजकारण्यांचे ‘फेक’ फॉलोअर्सचे आकडे घोषित केले होते.

ट्विटर फेक फॉलोअर्सच्या बाबतीत भारतात टक्केवारीत राहुल गांधी पुढे असले तरी त्यांच्या एकूण फॉलोर्सचा आकडा मोदींपेक्षा फारच कमी आहे. मोदींच्या एकूण ४ कोटी फॉलोअर्स पैकी ६० टक्के म्हणजे चक्क २ कोटी ४० लाख फॉलोअर्स हे फेक अकाउंट्स म्हणजे ‘फेक फॉलोअर्स’ आहेत. फेक फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगातील राजकारण्यांच्या पुढे असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झालं आहे.

फेसबुक ने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात तब्बल २० कोटी फेसबुक फेक अकाउंट्स आहेत. फेसबुकने केलेल्या अधिकृत पाहणीत भारतात सर्वाधिक फेक अकाउंट्स असल्याचे उघड झाले आहे. भारतापाठोपाठ फिलिपाइन्स आणि इंडोनेशिया सारख्या विकसनशील देशांचा क्रमांक लागतो. भारतात फेक फॉलोअर्स आणि त्यांच्या गल्लीच भाषेचं प्रमाण इतक वाढलं आहे की भारतातील फेसबुक वापरणाऱ्या स्त्रियांनी फेसबुकवरून काढता पाय घेतला आहे हे फेसबुकच्याच एका रिसर्च मधून बाहेर आलं आहे. परंतु प्रश्न हाच उरतो की इतके फेक अकाउंट्स म्हणजे ‘फेक फॉलोअर्स’ नेमक करतात काय त्यांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

जर आपण २०१४ पासूनच्या नवीन सरकारचा अभ्यास केला तर असे समजेल की समाज माध्यमांवरील राजकीय रणनीती किती खोलवर पसरली होती.

नेमका काय उद्धेश असतो ‘फेक अकाउंटचा’ समाज माध्यमांवर ?

१. ज्या नेत्याला फॉलो करण्यासाठी ते फेक अकाउंट बनविले असते, त्याने समाज माध्यमांवर कोणतीही प्रतिक्रया नोंदविल्यास त्यावर ‘लाईक्स आणि लव्ह’ चा वर्षाव करणे तसेच होकारात्मक कमेंट्स करणे. तसेच एखाद्याने नकारात्मक प्रतिक्रिया दिलीच तर त्याच्यावर गलिच्छ भाषेत प्रतिक्रिया देणे आणि तुम्हाला या देशाची काहीच पडलेली नाही अशा असभ्य प्रतिक्रिया देऊन त्रस्त करणे.

२. तुम्ही एखाद्या राजकीय विषयावर फेसबुक किंव्हा ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि ती प्रतिक्रिया जर त्या फेक अकाउंट वापरणाऱ्याच्या नेत्याच्या बाजूने असली कि त्यावर ‘लाईक्स आणि लव्ह’ चा वर्षाव करणे. जर नकारात्मक असेल तर तुम्ही कसे चुकीचे आहेत हे दाखवणे. तुमच्या विरुद्ध धार्मिक टिपणी करणे, तुमचा संबंध पाकिस्तानशी किव्हा विरोधी पक्षांशी जोडणे, किंबहुना तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून देश प्रगती करू शकत नाही अशी विकृत प्रतिकिया देणे अशी ‘महान’ कर्तव्य हि फेक अकाउंट्स बजावत असतात.

३. विरोधी नेत्यांचे किंव्हा त्यांच्या नेत्याचे ज्यांना ते फॉलो करत असतात त्याचे एडिटेड फोटो किंव्हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करणे.

४. विरोधी नेत्याला फॉलो करून त्यांच्या विरोधी प्रतिक्रिया देणे तसेच स्वतः फॉलो करत असलेला नेता कसा महान आहे हे पटवून देणे आणि दुसऱ्या विरोधी नेत्याच्या फॉलोअर्समध्ये संभ्रम निर्माण करणे.

५. फेक फॉलोअर्स हा त्या नेत्याचा चाहता असतोच असं नाही, तर तो विरोधी नेत्याच्या अधिकृत अकाउंट वरील केवळ हालचाली टिपण्यासाठी त्याला फॉलो करत असतो.

समाज माध्यमांवरील या फेक अकाउंट्सवरून प्रति मिनिटाला इतके व्हिडीओ आणि फोटो शेअर होत आहेत की एक दिवस फेसबुक हे ‘डिजिटल ग्लोबल डम्पिंग ग्राउंड’ होईल अशीच काहीशी स्थिती निर्माण होत आहे. चीन सारख्या बलाढ्य देशात फेसबुक आणि युट्युबला बंदी असण्याचं सुरक्षेप्रमाणेच ते सुद्धा एक कारण असावं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x