22 November 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

मुंबईची चिंता वाढली, धारावीत एकाच दिवसात ३३ नवे रुग्ण

Mumbai Dharavi, Corona Virus, Covid 19

मुंबई, ५ मे: राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत राज्यातील आकडेवारीची माहिती दिली आहे. यानुसार सोमवारी महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण आढळले. तर ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत एकाच दिवसात ३३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे याच झोपडपट्टीतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता ६६५ वर पोहोचला आहे आणि ही मुंबईसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबई महापालिकेने याबाबतीत माहिती दिली आहे.

दरम्यान टाळेबंदीची मुदत वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून टाळेबंदीबाबत सुधारित अधिसूचना जाहीर केली असून, मुंबई महानगर प्रदेश, पुणे-पिंपरी-चिंचवड, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात टाळेबंदी अंशत: शिथिल केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि ठाणे ही प्रमुख शहरे बंदच राहणार आहेत.

महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडू हे कोरोना वेगाने वाढणारं दुसरं राज्य झालं आहे. तिथे एकाच दिवसांत ५०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आता १२दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. तर सोशल डिस्टन्सिंगसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नवे नियम जाहीर केले आहे. त्यात लग्नासाठी फक्त ५० जणांना आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांनाच एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

News English Summary: Dharavi, the largest slum in Mumbai, has seen 33 new patients in a single day. As a result, the total number of corona patients in the slums has now reached 665 and this is worrying news for Mumbai. Mumbai Municipal Corporation has given information in this regard.

News English Title: Story Mumbai Dharavi slum sprawl reports 33 new COVID 19 cases taking the total count to 665 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x