24 November 2024 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

सरकारच्या नोकरभरती रद्द करण्याच्या निर्णयामुळे तरुणांमध्ये नैराश्य येईल - विनोद पाटील

Maratha Kranti Morcha, Corona Crisis, Vinod Patil

मुंबई, ५ मे: कोरोनामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडाच बिघडल्याने राज्यरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. कोरोनाचं संकट दीर्घकाळ चालणारं असल्याने भविष्यातली तरतूद लक्षात घेऊन अर्थमंत्रालयाने सर्व विभागांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यात फक्त आरोग्य, औषधी आणि अन्न पुरवढा विभागाला सुट देण्यात आली आहे.

या निर्बंधांमध्ये सर्व विभागाला कळविण्यात आलं की त्यांनी कुठलीही नवी नोकरभरती करू नये. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या प्रकल्पांची गरज नाही ते प्रकल्प रद्द करण्यास आणि जे पुढे ढकलता येणं शक्य आहे असे प्रकल्प पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आर्थिक स्थिती नीट ठेवण्यासाठी ही कडक पावलं उचलण्यात आली आहेत. प्रत्येक विभागाला फक्त ३३ टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार. सध्याची सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश, नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, तरुण वर्गासाठी राज्य सरकारने दुर्देवी निर्णय घेतला असल्याचं मराठा क्रांची मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. नोकरभरती रद्द करणे याचा अर्थ एक पिढी उद्धवस्त करणे. जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत आम्ही मोफत काम करण्यासाठी तयार आहोत, पण नोकरभरती करा”, अशी मागणी मराठा क्रांची मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे. विनोद पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. हे पत्र त्यांनी फेसबुकवर शेअर केलं आहे.

“राज्य सरकारच्या नोकरभरती रद्द करण्याच्या निर्णयामुळे तरुण पिढीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नैराश्य येईल. राज्यासमोर आर्थिक संकंट आहे. परंतु, याचा अर्थ असा तर नाही की, नोकरभरतीच रद्द करावी. सरकार जास्तीत जास्त उप जिल्हाधिकारी आणि कमीत कमी शिपाई या पदाची भरती करु शकते. अशा परिस्थितीत हे सर्व नवीन उमेदीचे अधिकारी राज्याचे सेवा करतील”, असा दावा विनोद पाटील यांनी केला आहे.

 

News English Summary: Vinod Patil, coordinator of Maratha Crunchy Morcha, has said that the state government has taken an unfortunate decision for the youth. Canceling a recruitment means destroying a generation. As long as the economic situation of the state does not improve, we are ready to work for free, but recruit, ”demanded Vinod Patil, coordinator of Maratha Crunchy Morcha. Vinod Patil has sent a letter to Chief Minister Uddhav Thackeray in this regard. He has shared this letter on Facebook.

News English Title: Story maratha kranti morcha on recruitment cancelled decision coordinator Vinod Patil send letter to Chief Minister Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x