22 November 2024 5:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुंबईतील चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा वाढता आलेख

Mumbai Slum, Corona Crisis

मुंबई, ६ मे : महाराष्ट्रात कोरोनाचे ८४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या १५ हजार ५२५ इतकी झाली आहे. मुंबईची रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे तर महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही १५ हजार ५०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६३२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ९ हजार ७५८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाची लागण होऊन ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

त्यातही मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झाली असून झोपडपट्ट्यांमधील कोरोनामुळे दगावणाऱ्यांचं प्रमाण ६० टक्के असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे नवे करोना रुग्ण वाढू नये आणि उपचार घेत असलेले रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी, प्रयत्न करतानाच झोपडपट्ट्यांमध्ये वाढणारं मृत्यूचं प्रमाण रोखण्याची कसरत आरोग्य यंत्रणेला करावी लागत आहे.

वरळी, धारावी, गोवंडीच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडत असतानाच दोन दिवसांपूर्वी मुलुंडच्या झोपडपट्टीत एका दिवसात ५० रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मुलुंडमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणावर रुग्ण सापडणं हे सौम्य ट्रान्समिशनचं लक्षण असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत १९२७ कंटेन्मेंट झोन होते. त्यातील ८० टक्के कंटेन्मेंट झोन हे झोपडपट्ट्या आणि चाळीत आहेत. पालिकेने गेल्या आठवड्यात केलेल्या एका सर्व्हेनुसार मुंबईतील करोनाचे ६० टक्के मृत्यू हे झोपडपट्ट्या आणि झोपडपट्टी सदृश्य परिसरातील आहेत.

वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ वरळीच्या बीडीडी चाळीतही मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे वरळी बीडीडी चाळीत करोनाचा धोका वाढू लागला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून बीडीडीतील रहिवाशांना विनाकारण घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. बीडीडी चाळीत बुधवारपासून सात दिवस सक्तीने टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

 

News English Summary: Eighty percent of the containment zones are slums and huts. According to a survey conducted by the municipality last week, 60 per cent of corona deaths in Mumbai are in slums and slum-like areas.

News English Title: Story hit hard by corona virus slums see 60 of covid 19 deaths in Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x