22 November 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

LA-४'मधील अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे मरोळ पोलीस वसाहतीत लहान मुलांचा जीव टांगणीला

Corona Crisis, Covid 19, Marol Police Camp, PTS

मुंबई, ६ मे: मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६३२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ९ हजार ७५८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाची लागण होऊन ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यानुसार मुंबईत सध्या कोरोना मोठ्याप्रमाणावर पसरत आहे आणि त्यात अनेक पोलिसांना देखील लागण झाली आहे.

मुंबईतील वरळी आणि बीडीडी चाळीतही मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळल्याने येथे कंटेन्मेंट झोनची संख्या वाढत आहे. मात्र आता कोरोनाने अनेक पोलीस वसाहतींमध्ये प्रवेश केल्याने पोलिसांसोबत त्यांचे कुटुंबीय देखील धास्तावले आहेत. अगदी वरळी पोलीस वसाहतीनंतर कोरोनाचे ३ पॉझिटिव्ह रुग्ण मरोळ येथील पोलीस वसाहतीत आढळले आहेत. मात्र याच मरोळ पोलीस वसाहतीतील LA-४ मधील पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःच घेतलेले निर्णय उद्या सरकारच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. किंबहुना या अधिकाऱ्यांच्या एकूण निर्णयावरून त्यांना कंटेन्मेंट झोनचा शास्त्रीय अर्थ तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

कारण मरोळ पोलीस वसाहतीतील ज्या इमारतीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्याच इमारतीला लागून असलेल्या इमारतीत, मुंबईच्या अनेक कंटेन्मेंट झोनमध्ये बंदोबस्ताला जाणाऱ्या बॅचलर पोलिसांना समूहाने खाली असलेल्या घरांमध्ये ठेवत आहेत. विशेष म्हणजे या सर्व चाळी असून त्यात अनेक पोलीस कुटुंबीय आणि त्यांची लहान मुलं असल्याने स्थानिक पोलीस कुटुंबीय संताप व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे याच मरोळ पोलीस वसाहतीत असलेलं ट्रेनिंग सेंटर पूर्णपने खाली असून तेथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची पूर्ण सोय असताना देखील त्यांना पोलीस कुटुंबीय राहत असलेल्या खाली घरांमध्ये कोणताही विचार न करता घुसवत आहेत. याच कॉलनीत पॉझिटिव्ह केसेस असून, येथे पोलीस अश्वाची (घोडा) देखरेख करणाऱ्या व्यक्तीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, इथले LA-४ मधील बेजवाबदार अधिकारी PTS (पोलीस ट्रेनिंग स्कूल) संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्याऐवजी स्थानिकांना उडवा उडवीची उत्तर देत आहेत. उद्या येथे कोणत्याही लहान मुलांना आणि महिलांना संसर्ग झाल्यास स्थानिकांमध्ये उद्रेक होऊन त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असंच चित्र आहे. “LA-४’चा कारभार” हा शब्द पोलीस खात्यात प्रचलित असून त्यांचा प्रत्यय कोरोना आपत्तीत देखील येतं आहे.

उद्या इकडे संसर्ग वाढल्यास याच LA-४’च्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जवाबदार धरले जावे, ज्यांनी मरोळ पोलीस वसाहतीतील पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या इमारतींना लागून असलेल्या चाळींमध्येच मोठ्या प्रमाणावर आणि समूहाने कर्मचारी भरण्यास सुरुवात केली आहे, जे शहरातील इतर कंटेनमेंट झोनमध्ये बंदोबस्त करून येत आहेत. त्यात संपूर्ण PTS (पोलीस ट्रेनिंग स्कूल) खाली असून तिकडे दुर्लक्ष करत आहेत आणि PTS (पोलीस ट्रेनिंग स्कूल) च्या अधिकाऱ्यांशी कोणताही संपर्क करण्याची तसदी घेताना दिसत नाही. प्रसार माध्यमांच्या मार्फत या संबंधित अधिकाऱ्यांची माहित लवकरच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे दिली जाईल.

 

News English Summary: In a building adjacent to the same building where the positive patients were found in the Marol police colony, the bachelor police, who are on patrol in several containment zones in Mumbai, are keeping the police in the houses downstairs. What is special is that all these scams involve many police families and their young children and the local police are expressing their family anger.

News English Title: Story Mumbai Police Family insecure in Marol Police Training center due to covid 19 News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x