6 November 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Budh Purnima: बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल - पंतप्रधान

corona virus, Budh Purnima, Prime Minister Narendra Modi

नवी दिल्ली, ७मे : बुद्धपौर्णिमेनिमित्तानं (Budh Purnima) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधनन केलं आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी बुद्धपौर्णिमेच्या (Budh Purnima)जनतेला शुभेच्छा दिल्या यासोबतच आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाचं कौतुक केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात होणाऱ्या पूजा आणि समारंभांचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहेत त्यामुळे लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या पाहता येणार आहे. वेळ, काळ आणि स्थिती बदलली तरीही गौतम बुद्धांनी दिलेला संदेश कायम प्रवाही आहे. संघटनात्मक भावनेतून आपण या महासंकटावर मात करू शकतो असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

“आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत, जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी काम करत आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी, गरीबांना भोजन देण्यासाठी, रुग्णालयात स्वच्छतेसाठी, रस्त्यावर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास काम करत आहेत. भारतात आणि देशाबाहेर जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात अशी व्यक्ती अभिनंदनास पात्र आहे, त्यांना मी नमन करतो” असे मोदी म्हणाले. मोदींनी आपल्या भाषणातून कोविड वॉरिअर्सचा सन्मान केला. “जगात सध्या सर्वजण चिंतेमध्ये आहेत. काही वेळा दु:ख, निराशा, हताशेचा भाव दिसते. त्यावेळी भगवान बुद्धांची शिकवण अधिक प्रासंगिक ठरते” असे मोदी म्हणाले.

बुद्ध हे कोणत्याही एका परिस्थितीसाठी मर्यादित नाहीत, ते मानवतेच्या अंतर्गत प्रत्येकाला मदत करण्याचा संदेश देतात. आज समाज व्यवस्था बदलली आहे, परंतु भगवान बुद्धाचा संदेश तोच आहे आणि आपल्या जीवनात याला एक विशेष स्थान आहे. आज देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लोक आपापल्या परीनं सेवा करीत आहे. आजारी लोकांवर उपचार करण्यापासून रस्त्यांवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक जण आपल्यासाठी सेवा देत आहे. आज जग अशांत आहे, अशा वेळी बुद्धांची शिकवण महत्त्वाची आहे.

 

News English Summary: On the occasion of Buddha Purnima, Prime Minister Narendra Modi has addressed the nation. While interacting with the people on this occasion, he wished the people of Buddha Purnima and also praised the International Buddhist Association. The corona virus is showing live broadcasts of worship and ceremonies around the world, so people will be able to watch at home during the lockdown.

News English Title: Story corona virus Budh Purnima Prime Minister Narendra Modi speech celebrations News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x