मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; पण राज ठाकरे मास्कशिवाय?
मुंबई, ७ मे : राज्यात कोरोनाचे बुधवारी सर्वाधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत राज्यभरात १,२३३ रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६,७५८ वर पोहोचली. राज्यात बुधवारी कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील २५ जणांचा समावेश आहे. राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ६५१ वर पोहोचली आहे. राज्यातील परिस्थितीवर केंद्रानंही चिंता व्यक्त केली असून, करोनाचा प्रसार थोपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे.
तत्पूर्वी राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मंत्रालयात ही बैठक होणार असून त्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित आहेत. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सगळे नेते मंत्रालयात पोहोचले. त्यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) वगळता सर्वच जणांनी मास्क घातले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मास्क घालणं बंधनकारक आहे. मास्क न घातल्यास १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
परिस्थिती बिकट होतं चालल्याने राज्य सरकारची देखील डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळते. त्यात जर विरोधकांनी टीकेची धार वाढविल्यास सरकारसमोर मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या रूपाने मोठं आवाहन उभं राहणार असल्याने सरकारने विरोधकांना विश्वासात घेण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं आहे.
News English Summary: The meeting is being held at the Ministry and is being attended by Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar and Raj Thackeray. All the leaders reached the ministry to attend the meeting. At that time, everyone except Raj Thackeray was wearing a mask. Wearing a mask is mandatory in view of the increasing prevalence of corona. There is a penalty of Rs 1,000 for not wearing a mask.
News English Title: Story corona virus meet held at Mantralaya MNS Chief Raj Thackeray reaches without face mask News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News