16 November 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

GK - हिंदी राष्ट्रवाद व त्याच्या उदयाची कारणे

स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे हिंदी राष्ट्रवाद व त्याच्या उदयाची कारणे. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर हिंदी राष्ट्रवाद व त्याच्या उदयाची कारणांबद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.

हिंदी राष्ट्रवाद व त्याच्या उदयाची कारणे

  • पाश्चात्य शिक्षणातून हिंदुस्थानात एका सुरक्षित वर्गाचा उदय झाला. या वर्गानेच पुढे आपल्या समाजाचे नेतृत्व केले.
  • विविध प्रांतात राहणारे हिंदू मुसलमान, जैन, पारसी, इ. विविध धर्माचे लोक हे हिंदुस्थान देशाचे नागरिक आहेत.
  • ही राष्ट्रवादी भावना हळूळळू तयार त्यातून पूढे 1885 साली राष्ट्रभाषा (कॉग्रेस) ही राजकीय संघटना स्थापन झाली.
  • त्या राजकीय संघटनेची महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

धर्मसुधारणेचा परिणाम:

  • एकोणिसाव्या शतकात ब्राम्हो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, रामकृष्ण मिशन, थिऑसॉफिकल सोसायटी, . अनेक धर्मसंघटना हिंदुस्थानात तयार झाल्या त्याद्वारे राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, एनी बेझंट यांसारख्या महान सुधारकांनी जी धार्मिक जागृती घडवून आणली त्यातून पुढे राजकीय जागृती घडून आली.
  • ज्या देशात स्वामी विवेकानंदांसारखे थोर विद्वान जन्मास येतात, त्या देशात धर्मप्रसारासाठी ख्रिस्ती मिशनरी पाठविणे म्हणजे शुध्द मूर्खपणा आहे असे पाश्चात्य विचारवंत म्हणू लागले.

समाजसुधारकांनी केलेली जागृती:

  • राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद स्वामी विवेकांनद यांनी समाजात धर्म जागृतीबरोबरच समाज जागृतीही घडवून आणली, समाजात समाजसुधारकांची जी एक पिढी निर्माण झाली.
  • त्यांनी सतीची चाल, अस्पृश्यता, जातिभेद, विधवांचा छळ, बालविवाह, जरठकुमारी विवाह, अंधश्रध्दा, धार्मिक, कर्मकांड या अनिष्ट रुढींवर हल्ले चढवले, त्याचबरोबर त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार केला त्यामुळे हळूहळू हिंदी समाजात जागृती घडून आली.

पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव:

  • पाश्चात्य शिक्षण हि इंग्रजांकडून हिंदी समाजाला मिळालेली फार मोठी देणगी होती.
  • त्यांची संस्कृती कला, विज्ञान, याचे हिंदी लोकांना ज्ञान होऊ लागले. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, इटलीेचे जर्मनीचे एकिकरण, या निमित्ताने तेथील जनतेत निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना त्यातून त्यांना मिळालेले स्वातंत्र्य या गोष्टीमुंळे आपल्या देशातसुध्दा अशी राष्ट्रनिर्मिती का होऊ नये. अशी भावना हिंदी जनतेत निर्माण झाली. त्यामुळे पुढे राष्ट्रसभा स्थापन झाली.

वृत्तपत्रांचे योगदान:

  • हिदुस्थानात प्रथम इंग्रजांनी वृत्तपत्रे सुरु केली. त्यात सरकारच्या धोरणाची फक्त स्तुती केलेली असे.
  • पण या इंग्रजांचे धोरण अन्यायकारक कसे आहे हे दाखवून देण्यासाठी पूढे हिंदी वृत्तपत्रे निघाली. सरकारविरुध्द असंतोष निर्माण करुन राष्ट्रवादाचा प्रसार करण्याचे महान कार्य हिंदी वृत्तपत्रानी केले.

साहित्यातून राष्ट्रीयत्व:

  • बंगालमध्ये बकिमचंद्र चटर्जी रवींद्रथान टागोर आणि महाराष्ट्रात लोकहितवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर अशा अनेक लेखकांनी मातृभाषा समृध्द केली.
  • मातृभाषेविषयीचा त्यांचा अभिमान समाजात राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत झाला.
  • याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बकिमचंद्राचे वंदे मातरम हे गीत होय.
  • हे गीत काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यत पसरलेल्या अफाट हिंदी समाजाचे राष्ट्रगीत बनले.
  • पुढे पुढे नुसते वंदे मातरम हा शब्द उच्चारणेही गुन्हा ठरू लागला.

हिंदुस्थानच्या प्राचीन संस्कृतीचे श्रेष्ठत्व:

  • इंग्रजांनी हिंदुस्थानात साम्राज्य स्थापन केल्यांनतर पाश्चात्य संशोधकांनी येथील प्राचीन साहित्य इतिहास यावर संशोधन केले.
  • या संशोधकांमध्ये कोलब्रुक विल्सन, म्यूलर, मोनिअर, विल्यम्स, यांसारख्या लोकांचा समावेश होता.
  • हिंदुस्थानातील राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद, सरस्वती, डॉ, भांडारकर यांसारख्या हिंदी लोकांनी हिंदी संस्कृतीचे श्रेष्ठत्व जनतेसमोर मांडले.
  • त्यामूळे सुशिक्षित हिंदी जनतेला आपल्या प्राचीन ठेव्यांचा अभिमान वाटू लागला.

इंग्रजी भाषेद्वारे राष्ट्रीय एकात्मता:

  • इग्रजांनर जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानांत इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यास सुरुवात केली.
  • काश्मिरी, पंजाबी, गुजराती, बंगाली, मराठी, कानडी, मद्रासी, या सर्वानी भाषा भिन्न भिन्न होती ती एकमेकांस समजत नव्हती, पण इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे हे लोक एकत्र येत तेव्हा ते इंग्रजीतून विचारविनिमय करीत.
  • त्यामुळे राष्ट्रवादाची झपाटयाने वाढ होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढतच गेली, त्यातून राष्ट्रसभेची स्थापना होऊ शकली.

रेल्वे, तारायंत्रे पोस्ट या सुधारणांचा परिणाम:

  • रेल्वे, मोठे रस्ते, तारायंत्रे, पोस्ट, या भौतिक सुधारणांमुळे हिंदुस्थानातील प्रमुख शहरे एकत्र जोडली गेली.
  • महाराष्ट्रातील व्यक्तीला मद्रासमध्ये मद्रासमधील व्यक्तीला महाराष्ट्रात जाणे रेल्वेमुळे सहज शक्य झाले.
  • एका प्रांतातील लोक दुसर्या प्रांतात सहज जाऊ लागल्यामुळे त्यांच्यातील विचारविनिमय वाढला.
  • त्यामुळे राष्ट्रवादाचा उदय होण्यास हातभार लागला.
  • रेल्वेने समाजातील सर्व जातिपंथाचे लोक एकत्र बसून प्रवास करु लागले त्यामुळे जातिपंथाची बंधने शिथिल होण्यास मदत झाली.
  • त्यातून राष्ट्रीय जागृती घडून आली.

इंग्रजांचा केंदि्य राज्यकारभार:

  • 1857 पर्यत इंग्रजांनी जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थान जिंकून घेतला.
  • 1857 च्या उठावानंतर हिंदुस्थानातिल संस्थानांना जिवदान दिले, परंतु ती संस्थाने अप्रत्यक्ष इंग्रजांच्याच वर्चस्वाखाली होती.
  • हिंदुस्थानत ही जी एकछत्री राजवट इंग्रजांनी स्थापन केली.
  • त्याविषयी पं. नेहरू म्हणतात इंग्रजांनी स्थापन केलेल्या राजकीय ऐक्याने हिंदुस्थानात राजकीय जागृती राष्ट्रीय ऐक्य यांचा उदय घडवून आणला.
  • केंद्राचे प्रांतावर पूर्ण नियंत्रण होते. सरकार एक, त्याचे लष्कर एक त्याची राज्यकारभार पध्दती सर्वत्र सारखी या गोष्टीमुळे हिंदुस्थान झपाटयाने एक होऊ लागला.
  • त्यातून अप्रत्यक्षणपणे राष्ट्रीय एकात्मता वाढू लागली.

इंग्रजांनी केलेल्या आर्थिक शोषणाचे परिणाम:

  • इंग्रजाचे साम्राज्य हे व्यापारी साम्राज्य होते. रेल्वेमार्ग बांधणे, बंदरे तयार करणे, रस्ते बांधणे यांदवारे हिंदुस्थानात मोठया प्रमाणावर इंग्रजी माल खपवून त्यांना हिंदी लोकांची अप्रत्यक्ष पिळवणूकच करावयाची होती.
  • त्यामूळेच त्यांनी इंग्लडंमधून हिंदुस्थानात येणार्या मालावरील जकात माफ केली.
  • इंग्लंडमध्ये औद्योगिकीकरण झाल्यामुळे यंत्रावर तयार होणारे कापड स्वस्तात विकूनही त्यांना विक्रमी नफा होत असे. त्यामुळे हिंदुस्थानातील उद्योगधंदे हळूहळू बंद पडून कारागीर बेकार झाले.
  • खेडे पूर्वी स्वयंपूर्ण होते, पण उद्योगधंदे बुडाल्यामुळे ही स्वयंपूर्णता नष्ट झाली या अर्थिक शोषणाची जाणीव सुशिक्षित वर्गास होऊ लागली.
  • सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरुघ्द दादाभाई नौरोजींसारख्या नेत्यांनी आवाज उठवला.
  • इंग्रज अधिकार्यांचे पगार, इंग्रज भांडवलावरील व्याज, नफा, या रुपाने देशातून संपत्ती चा ओघ इंग्लंकडे वाहू लागला थोडक्यात सर्वच बाजुंनी हिंदी लोकांचे आर्थिक शोषण चालले होते हिंदी जनतेची ही दु:खे सरकारच्या कानावर घालण्यासाठी एखाद्या राष्ट्रीय व्यासपीठासी आवश्यकता होती.

लॉर्ड लिटनची दडपशाही:

  • .. 1876 ते 1880 या काळात हिंदुस्थानात आलेला व्हाईसरॉय र्लॉड लिटन याने दडपशाहीच्या धोरणाचा अवलंब केल्यामूळे हिंदी सुशिक्षित वर्गात असंतोष निर्माण झाला.
  • ब्रिटिश पार्लमेंटने खास कायदा करुन इंग्लंडच्या राणीस हिंदुस्थानची साम्रागिनी म्हणून जाहीर केले तेव्हा लिटनने दिल्लीस खास दरबार भरवला त्या निमित्ताने त्यांने हिंदी राजे, महाराजे नबाब यांना दरबारात पाचारण करण्यात आले होते.
  • दक्षिण हिंदुस्थानात या वेळी प्रचंड दुष्काळ पडून लाखो लोक अन्नाअभावी मेले होते.
  • तरी लिटनने दिल्लीला वैभवशाली दरबार भरवून लाखो रुपयांची उधळपट्टी केली होती.
  • वृत्तपत्रातून त्यांच्या या धोरणावर प्रखर टीका करण्यात आली, त्यामूळे लिटनने .. 1878 मध्ये व्हार्नाक्युलर ऍक्ट पास करून देशी भाषेतील वृत्तपत्रंाची गळचेपी केली.
  • तसेच याच सुमारास त्याने आम्र्स ऍक्ट पास करून हिंदी लोकांनी हत्यारे बाळगू नयेत असा निर्बंध घातला.

आपला वंश श्रेष्ठ असा इंग्रजांना गर्व:

  • बरेच इंग्रज अधिकारी हिंदी जनतेशी फटकून वागत असत.
  • हिंदी लोक म्हणजे दगड धोंडयाची जनावरांची पूजा करणारे रानटी लोक आहेत.
  • अर्धे निग्रो अर्धे गोरिला असे प्राणी आहेत. अशी हेटाळणी करीत हिंदी लोकांना शिव्या इंग्रज मळेवाले अधिकारी देत.
  • आपला वंश श्रेष्ठ हिंदी लोकांचा वंश कनिष्ठ असे इंग्रज मानीत असत.
  • त्यांचे खरे स्थान दाखवणे आवश्य होते.

हिंदी लोकांवर होणारे अत्याचार:

  • इंग्रज हिंदी जनतेवर काही ना काही निमिताने जूलुम जबरदस्ती करीत असत. पण हे अत्याचार बर्याच वेळा सहन केले जात असत.
  • त्यांना हिंदी जनतेच्या जीवित्वाची किंमतच नव्हती. पण ते स्वत:चे जीवन यात मौल्यवान समजत असत.
  • त्यामूळे या युरोपियनांनी केलेले जूलूम खून अनेक वेळा पचवले जात असत आणि एखाद्या गोष्टीचा किंवा गुन्हाचा फारच बोलबाला झाला तर थोडीफार शिक्षा देऊन नंतर त्या युरोपियन गुन्हेगारास सोडून दिले जात असे.
  • रेल्वेच्या पहिल्या वर्गातून प्रवास करणे ही युरोपियनांची मक्तेदारी समजली जात असे त्या वर्गातून हिंदी माणासांना प्रवास करता येत नसे इंग्रजांच्या या वागण्यामुळे सुशिक्षित हिंदी लोकांच्या ह्रदयात आपल्या गुलामगिरीच्या वेदना असहय होत असत.
  • त्यामुळे राष्ट्रीय संघटनेची आवश्यकता भासू लागली.

इलर्बट बिलाद्वारे मार्गदर्शन:

  • लॉर्ड रिपनच्या काळात सर सी. पी. इल्र्बट हा कायदामंत्री होता त्याच्या काळापर्यत हिंदी न्यायाधिशांना युरोपियन लोकांचे खटले चालविण्याची परवानगी नव्हती.
  • हा अन्याय आहे असे इल्र्बटला वाटत होते.
  • कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असाव्यात असे त्याचे मत होते.
  • त्यामूळे त्याने या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी एक विधेयक मांडले इंग्रजांनी या बिलास फार मोठा विरोध केला.
  • खूद्द त्यांनी व्हाइसरॉयविरुध्द आंदोलन केले, त्यामुळे त्या बिलात पुन्हा दुरुस्ती करण्यात आली.
  • या निमित्ताने हिंदी जनतेत जागृती निर्माण झाली. आपणही आपले हक्क संघटित होऊन सरकापासून हिसकावून घेतले पाहिजेत.
  • हा धडा हिंदी विचारवंतांनी या प्रकरणापासून घेतला. आपल्यावर होणारा अत्याचार सहन करता आपणही राष्ट्रीय स्वरुपाची संघटना अन्यायास वाचा फोडली पाहिजे अशी हिंदी जनतेत मानसिकता निर्माण झाली.

हिंदी सुशिक्षितांना पात्रतेनुसार नोकर्या देत नसत:

  • हिंदी जनतेस धर्म वंश किंवा रंग यावरून कारभारतील अधिकाराच्या जागा नाकारल्या जाणार नाहीत असे आश्र्वासन राणीच्या जाहिरनाम्यात दिले होते, पण ते आश्र्वासन सरकारे पाळले नाही.
  • झालेल्या हिंदी तरुणांना बढती दिली जात नव्हती प्रसंगी उच्च जागा देण्यात आली तर अल्पकाळातच काही तरी क्षुल्लक कारण दाखवून संबंधित हिंदी अधिकार्यास नोकरीवरुन कमी केले जात असे.
  • नोकरीस लागलेल्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना क्षुल्लक कारणावरून नोकरीवरून काढून टाकले होते.
  • हा अन्याय सहन करता सर्व हिंदी नेत्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे अनेक नेत्यांना वाटत होते.

 

Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, ias online classes, learning app, Current Affairs, current affairs quiz, gktoday, gk today, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.

Subject English Searching Title: Hindi Rashrawad udayachi karne study for competitive exams current affairs quiz and current affairs in Marathi.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x