22 November 2024 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

भाजप कुठल्या दिशेला? पक्षाला शिव्या देणाऱ्यांना संधी दिली - एकनाथ खडसे

BJP Maharashtra, Vidhan Parishad, Eknath Khadse

जळगाव, ८ मे: भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

धनगर समाजाचे नेते आणि लोकसभेत वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढले होते. तेथे त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. पडळकर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात. पडळकर यांना संधी देतानाच धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना शह देण्यात आल्याचे मानले जाते. जानकर हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

दरम्यान, विधानसभेनंतर आता विधान परिषदेची उमेदवारीही नाकारण्यात आल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे कमालीचे चिडले आहेत. ‘मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचं काम करणाऱ्यांना संधी द्यायला हवी होती. तसं झालं असतं तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या देणाऱ्यांना इथं संधी दिली गेली आहे. भाजप कुठल्या दिशेनं चाललाय,’ असा त्रागा खडसे यांनी आज व्यक्त केला.

परिषदेच्या उमेदवारीसाठी माझ्यासह पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांचे नाव दिल्लीला पाठवण्यात आल्याचे मला सांगण्यात आले होते. पण आता वेगळीच नावे समोर आली आहेत. यामध्ये धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आहेत. याच पडळकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. जवळपास पक्षाला शिव्याच घातल्या होत्या.

 

News English Summary: Senior BJP leader Eknath Khadse is extremely angry as his candidature for the Legislative Council has been rejected after the Assembly polls. ‘I didn’t want to run, I wanted to give a chance to those who have been working for the party for at least a few years. I would have been happy if that had happened. But those who insult the party have been given a chance here. Which direction is BJP going, ‘said Eknath Khadse today.

News English Title: Story senior BJP leader Eknath Khadse disappointed due to not getting chance for Vidhan Parishad election 2020 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x