15 November 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मुंबईत लष्कराची गरज नाही, सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, Corona Crisis, Facebook Live

मुंबई, ८ मे: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. औरंगाबादमध्ये रेल्वेने मजुरांना चिरडलेली घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे लॉकडाऊन कधीपर्यंत ठेवायचा हे जनतेच्या हातात आहे, मुंबईत लष्कराची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाविरुद्धच्या युद्धात आपण सगळेच सैनिक आहोत. आजवर जे काही केलं ते तुम्हाला विश्वासात घेऊन गेलं. त्यानंतर, संयमाच्या, जिद्दीच्या जोरावर ही लढाई आपण लढताय. फक्त गैरसमज आणि गडबड-गोंधळ होता कामा नये. संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर वगैरे बोलावणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी राज्यवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केलं.

काल एक चांगली गोष्ट झाली, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक झाली. सगळ्यांना काय करतो आहोत त्याची कल्पना दिली गेली. त्यांच्याकडून सूचना घेण्यात आल्या. मला एका गोष्टीबद्दल समाधान आहे की सगळ्यांनी खूप चांगल्या सूचना दिल्या. काल जी बैठक झाली ते एकजुटीचं वेगळं दर्शन होतं. महाराष्ट्रातले सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी दुणावला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एक वेगळी एकजूट काल पाहायला मिळाली. असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: State Chief Minister Uddhav Thackeray once again interacted with the people through social media today. The Chief Minister said that the incident of crushing the workers by the railway in Aurangabad was very painful. On the other hand, it is up to the people to keep the lockdown for a long time, he said, adding that there is no need for army in Mumbai.

News English Title: Story Corona Is Big Trouble But Our Government Is Capable To Fight With It Says chief minister Uddhav Thackeray News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x