16 November 2024 6:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

GK - भारतीय क्रांतिकारी चळवळी आणि राष्ट्रीय आर्मी

स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे भारतीय क्रांतिकारी चळवळी आणि राष्ट्रीय आर्मी. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर भारतीय क्रांतिकारी चळवळी आणि राष्ट्रीय आर्मीबद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.

भारतीय क्रांतिकारी चळवळी आणि राष्ट्रीय आर्मी:

आझाद हिंद सेनेची कामगिरी:

  • भारतीय स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश शत्रूशी मैत्री केली.
  • जानेवारी1941 मध्ये कैदेतून सुटून जर्मनीला गेले. जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला.
  • हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली.
  • मलाया, सिंगापूर, ब्रहादेश, जिंकून जपान व जर्मनीच्या मदतीने तेथे 21 ऑक्टोबर 1943 रोजी हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले.
  • जय हिंद, चलो दिल्ली या घोषणेनूसार वाटचाल सुरु केली.
  • 1944 मध्ये अंदमान निकोबार ही बेटे मुक्त करून शहीद व स्वराज्य असे नामकरण केले.
  • जर्मनी, जपान यांचा पराभव झाला 18 ऑगस्ट 1945 राजी बॅकॉककडून टोकियोकडे जात असताना विमान अपघात झाला त्यात ते मरण पावले.

क्रांतिकारी चळवळ:

  • 1857 ला स्वातंत्र्य युध्दाच्या पराभवात भावी चळवळीची बीजे पेरली.
  • राष्ट्रवादाच्या त्यागातून, बलिदानातून नव्या पिढीने स्फुर्ती घेऊन इंग्रजांविरुध्द आक्रमक लढा सुरु केला.
  • देशप्रेमासाठी हजारो तरुणांनी आपल्या जीवनाचा होमकुंड पेटवून सर्व जीवन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी खर्ची घातले.

क्रांतिकारी चळवळीची ध्येय व मार्ग:

  • ब्रिटिश नोकरांवर दहशत बसविणे
  • प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण करणे
  • हिंदी लोकांच्या अन्यायाचा बदला घेणे
  • मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे.

क्रांतिकारी चळवळ यशस्वी करण्याचे मार्ग:

  • सरकारच्या अन्याय अत्याचार धोरण.
  • लो. टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक उत्सावातून ऐक्य व प्रेरण मिळाली
  • नैसर्गिक संकट प्रसंग सरकारचे दुर्लक्ष
  • राजकीय व आर्थिक स्वातंत्र्य व समानता प्राप्त करण्यासाठी चळवळ सुरु.

क्रांतिकारी चळवळीचे स्वरुप आणि कार्यक्रम:

महाराष्ट्र्रातील क्रांतिकारी चळवळ:

  • आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे शिरढोण (रायगड) गावचे असून सरकारी नोकरीत होते. 1876 दुष्काळाच्या वेळी जनतेला इंग्रज सरकार विरोधी चिथवले आणि बंड पुकारले त्यांना पकडून एडनच्या तुरुंगात ठेवले. तेथेच 1883 मध्ये मरण पावले.
  • 1896-97 मध्ये पुण्यात प्लेग नियंत्रणाच्या निमित्ताने रॅन्ड कमिशनरने अत्याचार केला. म्हणून चाफेकर बंधूंनी व्हिक्टोरिया राणीच्या हिरक महोत्सव प्रसंगी रॅन्ड व आयर्स्ट यांना ठार मारले पंडित द्रविडच्या फितुरीमुळे ते पकडले गेले. सरकारने त्यांना फाशिची शिक्षा दिली.
  • सेनापती बापट अभिनव भारत संघटनेतर्फे बॉम्ब विद्या शिकण्यासाठी पॅरिसला गेले. तेथे त्यांनी हेमचंद्र दास व मिर्झा अब्बास यांच्याकडून शिक्षण घेतले त्यानुसार नाशिक, पुणे, मुंबई, पनवेल इ. ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचे कारखाने सुरु केले.
  • अमेरिकेतील गदर पक्षाचे कार्यकर्ते पुणे जिल्हयात गणेश पिंगळे होते. एकाच वेळी सर्व देशात इंग्रजांच्या विरुध्द उठावाची योजना तयार केली. मीरत सैनिक छावणी उठाव केल्याने फाशी झाली.
  • वि. दा. सावरकर यांनी लोकमान्य टिळक व चाफेकर बंधू यांच्यापासून प्रेरणा घेऊन 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह 1900 मध्ये मित्रमेळा आणि 1904 मध्ये अभिनव भारत सोसायटी या संघटना स्थापन केल्या मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पेण, खानदेश, वाई, इ. ठिकाणी शाखा स्थापन केल्या शामजी वर्माच्या मदतीने 1906 ला इंग्लंडला गेले. तेथून पिस्तुले व काडतुसे पाठवली. या संघटनेच्या सभासदांनी म्हणजे अनंत कन्हेरे याने जॅक्सनला 1901 मध्ये मदनलाल धिंग्रा याने 1902 मध्ये कर्झन वायलीला ठार मारले. सावरकरांना नाशिक खटल्यासंदर्भात शिक्षा झाली. सावरकर 1937पर्यत कैदेत होते.

बंगालमधील क्रांतिकारी चळवळ युगांतर समिती:

अरविंद घोष, वीरेंद्रकूमार घोष, भुपेंद्रनाथ दत्त इ.1906 मध्ये युगांतर समितीची स्थापना केली. युगांतर व संध्या वृत्तपत्रे सुरु करुन राष्ट्रवाद निर्माण केला.

  • हेमचंद्र दास याला बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण घेण्यासाठी फ्रान्सला पाठविले.
  • त्याच्या नेतृत्वाखाली कोलकत्ता येथिल कारखाना सुरु केला 6 डिसेंबर 1907 रोजी मिदनापूर स्टेशनवर बॉम्ब टाकून ले. गव्हर्नर फुल्लला ठार मारण्याचा अपयशी प्रयत्न केला.
  • 23 डिसेंबर 1907 रोजी न्यायाधीश एलनला ठार मारले.
  • 30 एप्रिल 1908 रोजी किंग्जफोर्डला ठार मारण्याचा अपयशी प्रयत्न प्रयत्न खुदीराम बोसने केला.
  • नरेंद्र भट्टायार्च, सतीश बसू प्रथम मित्र यांनी कोलकत्ता येथे अनुशीलन समितीची 1901 मध्ये स्थापन केली.
  • या संघटनेने 64 इंग्रज अधिकारी ठार केले हेमचंद्र दास याला बॅाम्ब विद्या शिकण्यासाठी रशियाला पाठवले.
  • बंगालमध्ये क्रांतिकारकांमुळे अलीपूर खटला.
  • चितगावकर खटला गाजलारास बिहारी बोस यांनी लॉर्ड हार्डिग्जला ठार मारण्याचा प्रयत्न केला. नंतर जपानला गेले तेथे ची स्थापना केली.
  • लाहोर, बनारस, मीरत इ. उठावाची योजना केली पण त्यात त्यांना अपयश आले.

पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ:

  • सरदार व सैय्यद हैदर यांनी भारतीय देशभक्तीची सभा संघटना स्थापन केली.
  • रामप्रसाद बिस्मिल याने काकोरी स्टेशनजवळ सरकारी तिजोरी लुटली, भगतसिंग राजगुरु यांनी 17 फेब्रुवारी 1928 रोजी सॅंडर्सला ठार मारले.
  • भगतसिंग व बटुकेश्र्वर यांनी 8 एप्रिल 1929 रोजी सभागृहावर बॉम्ब टाकला.
  • चंद्रशेखर आझाद व यशपाल सिंग यांनी 23 डिसेंबर 1929 रोजी र्लॉड आयर्विनला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

मद्रासमध्यील चळवळ:

  • बिपिनचंद्र पाल याने बंगालमध्ये क्रांतिकारी संघटना स्थापन केली. व्ही. व्ही. एस आय्यरने कलेक्टर. मि. अ‍ॅशला ठार मारले.

परदेशातील चळवळीचे कार्य:

  • श्यामजी कृष्णा वर्माने इंग्लंडमध्ये इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना 1905 मध्ये केली. अनेक क्रांतिकारकांना सर्व प्रकारची मदत केली.
  • लाला हरदयाळ अमेरिकेत 1913 मध्ये गदर पक्षाची स्थापना केली. गदर म्हणजे विद्रोह/उठाव असा अर्थ होय. फ्रान्सिस्को येथून गदर ह 17 नावाचे वृतपत्र सुरु केले.

इंडियन नॅशनल आर्मी:

  • रासबिहारी बोस यांनी जपानमधील पौर्वत्य देशातील निवडक लोकांची नागासाकी येथे बैठक घेतली.
  • ज्ञानेश्र्वर देशपांडे देवनाथ दास यांनी प्रमुख कार्य केले.
  • रसबिहारी बोस यांनी हिंदी लोकांची एक परिषद 28 ते 30 मार्च 1942 मध्ये टोकियो येथे भरवली जपान, मलाया, चीन, थायलंड, या देशातून अनेक हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापना केली.
  • कोणत्याही प्रकारे परकियांचे अधिकार नसणारे स्वातंत्र्य हिंदुस्थानला प्राप्त करु देणे हा संस्थेचा उद्देश होता.
  • लीगचे पहिले अध्यक्ष म्हणून रासबिहारी बोस यांची निवड करण्याल आली रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या अनेक शाखा स्थापन केल्या.
  • स्वातंत्र्याचे ध्येय साध्य करण्यासाठी रास बिहारी बोस यांनी टोकियो येथे आझाद हिंद फौजेची इंडियन नॅशनल आर्मी स्थापना केली.
  • कॅप्टन मोहन सिंग हे सरसेनापती झाले.
  • 15 फेब्रुवारी 1942 रोजी जपानचे पंतप्रधान जनरल टोजो व रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्याची घोषणा केली.
  • आझाद हिंद फौज आणि इंडियन इंडिपेन्डन्स लीगने ऑगस्ट 1942 पर्यत सिंगापूर बॅकॉक, रंगून जिंकलीे आझाद हिंद फौजेचे आणि हिंदी स्वातंत्र्य संघाचे मुख्य ठाणे बॅकॉकहून सिंगापूरला आणले.
  • आझाद हिंद फौजेच्या अधिकारावरुन मोहन सिंगला कमी करून जगन्नाथाराव भोसले यांना मेजर जनरल आणि सुप्रीम कमांडर म्हणून नियूक्त केले.
  • सुभाषचंद्र बोस 20 जून 1943 ला टोकियोला आले. रास बिहारी यांनी त्यांचे स्वागत केले.
  • त्यांनतर सिंगापूरला गेले. आझाद हिंद फौजेच्या निरनिराळया घटकांच्या भेटी घेतल्या.
  • 5 जूलै 1943 रोजी सिंगापूर येथे नव्याने फौजेची स्थापना केली.
  • आठ दिवसातच राणी ऑफ झाशी रेजिमेंट ही स्त्री शाखा स्थापन केली.
  • 25 ऑगस्ट 1943 रोजी आझाद हिंद सेनेचे अधिकृत नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी स्वीकारले.
  • स्वातंत्र्य लढयामध्ये आझाद हिंद सेनेने सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखाली प्रभावी कामगिरी केली. परंतु अखेरीस अपयश आले.

 

Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, ias online classes, learning app, Current Affairs, current affairs quiz, gktoday, gk today, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.

Subject English Searching Title: Krantikari chalavali ani Rashtriya Army study for competitive exams current affairs quiz and current affairs in Marathi.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x