GK - भारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात
स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवाती बद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.
भारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात:
- वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमित्ताने पोर्तृगीज आले.
- त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले.
- या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यातुनच इंग्रज फ्रेंच संघर्षातून कर्नाटकात तीन युध्दे लढली गेली.
- त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.
- ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत आणि धोरणात विविध कायद्यांद्वारे बदल कसे होत गेले याचा उहापोह या प्रकरणात केला आहे.
- प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्या अर्थाने पाया रोवला गेला.
- लॉर्ड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे भारतीय राज्यकर्त्यामध्ये त्याविषयी जे आकर्षण निर्माण झाले त्यातुन अनेक राजे, महाराजे व नबाब यांनी या पध्दतीचा स्वीकार केला.
युरोपियनांचे भारतात आगमन:
- पूर्वी भारतातील माल इराणचे आखात कॉन्स्टॅटिनोपल इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे.
- परंतु 1453 मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला कारण तुर्कानी युरोपियन व्यापार्यांचा मार्गच अडवून धरला.
- आता युरोपियनांपुृढे एकच मार्ग होता. तो म्हणजे भारताकडे जाणार्या समुद्रमार्गाचा शोध लावणे भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसर्या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते.
- या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जायार्या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो 1492 मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला.
- वास्को-द-गामा हा पोर्तृगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून 23 मे 1498 रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला.
- या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनार्यावरील पहिले पाऊल होते.
- 1615 मध्ये इंग्रज राजाचा प्रतिनिधी सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टण, सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई इ. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारीउभारल्या नफा प्रचंड मिळत असल्यामुळे त्यांचा भारतातील व्यापार सारखा वाढत होता. काही मालाच्या बाबतीत या व्यापार्यांना 100 टक्के फायदा मिळत होता. पुढे 1717 साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फारुक सियर याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापार्यांनी घेतला व बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.
युरोपियन कंपन्यांची सत्तास्पर्धा:
- ब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्यांचा उद्देश व्यापार करणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता.
- पण भारतातही होणार्या व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन व्यापार्यांशी स्पर्धा करावी लागली.
- त्या वेळी भारतात कार्यरत असणार्या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली.
- त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय.
- भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही.
- याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले. प्लासीच्या युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला.
- सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला.
- दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता, या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते.
- इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले.
- त्याचा परिणाम असा झाली की इ.स. 1759 मध्ये डचांनी इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन त्यात इंग्लंडला विजय मिळाला.
- डच व इंग्रज यांच्यात तह होऊन डचांनी इंग्रजांवर चढाई न करण्याचे सैन्य न पाठवण्याचे व वखारींची तटबंदी न करण्याची हमी दिली.
- यांनतर बंगालमध्ये डचांनी पुन्हा डोके वर काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इंग्रजांना आता भारतातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.
भारतातील इंग्रज -फ्रेंच संघर्ष:
- व्यापार करता-करता इंग्रज व फ्रेंच कंपन्या भारतीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होत्या, या दोन्ही कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यापारातून जास्तीत जास्त फायदा करुन घेणे हा होता.
- भारतातील व्यापारातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी इंग्लंड व फ्रान्स यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती. पण त्यातूनच त्यांच्यात भारतात सत्ता मिळविण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
- 17 व्या आणि 18 व्या शतकात इंग्लड व फ्रान्स परस्परांचे कट्टर शत्रू होते, त्यामुळें त्यांच्यात युध्द सुरु झाले की जगाच्या कोणत्याही भागात त्यांच्या कंपन्या एकत्र कार्यरत असल्या म्हणजे त्यांच्यातही युध्द सुरु असे.
- ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दापासून भारतात इंग्रज फ्रेच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचचे भारतातील मुख्य केंद्र पॉडेचरी असून मछलीपट्टम, कारिकल, माहेृ सुरत व चंद्रनगर ही उपकेंद्रे होती.
- इंग्रजांनी आपले वर्चस्व मद्रास, मुंबई, व कलकत्ता या विभागावर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रस्थापित केले होते.
पहिले कर्नाटक युध्द (1746-1748)
- युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दाचा प्रारंभ झाल्यांवर त्याचाच झालेला विस्तार म्हणजे कर्नाटकाचे पाहिले युध्द होय.
- आपल्या मूळ देशांच्या आदेशाविरुध्द भारतातील इंग्रज व फ्रेंचांनी 1746 मध्ये संघर्ष सुरु केला. बारनेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली त्यामुळे पॉंडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याने मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोकडे मदत मागितली.
- डुप्लेच्या मदतीला 3000 सैन्यासह ला बोर्डो मद्रासजवळ असलेल्या कोरोमंडळ तटाकडे निघाला. मार्गात त्याने इंग्रजाच्या आरमाराचा पराभव केला.
- फ्रेंचांनी जल व स्थल अश दोन ठिकाणी मद्रासला घेरले. या युध्दात मद्रासच्या इंग्रजांचा 21 सष्टेंबर 1746 रोजी पराभव कला फ्रेंचांनी मद्रास जिंकून घेतले.
- या प्रसंगी जे इंग्रजयुध्दकैदी पकडण्यात आले त्यात रॉर्बट क्लाईव्हही होता.
- मद्रासच्या इंग्रजांपासून खंडणी घ्यावी असे ला बोर्डेनिचे मत होते. पण डुप्लेला ते मान्य नव्हते.
- शेवटी एका मोठया रकमेच्या मोबदल्यात ला बोडॅनि मद्रास पुन्हा जिंकून घेतले. पण पाँडेचरीपासून फक्त 18 मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविडचा किल्ला त्यास जिंकता आला नाही.
- अर्थात इंग्रजांनी पाॅंडेचरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला.
- कर्नाटकच्या पहिल्या युध्दातील सेंट टोमेची लढाई महत्वाची समजली जाते. ही लढाई कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यात झाली.
- मद्रास फ्रेंचांनी घेतल्यापासून हा संघर्ष सुरु झाला आपल्या प्रदेशात दोन्ही परकिय कंपन्या लढत असलेल्या पाहून हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशांची शांतता भंग न करण्याची आज्ञा नवाबाने दिली.
- त्यावर डुप्लेने आपले आश्र्वासन न पाळल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी नबाबने सैन्य पाठविले.
- या तुकडीचे नेतृत्व कॅ पॅराडइज याच्याकडे होते. आणि महफूजखानच्या नेतृत्वाखालील 10,000 भारतीय सैनिकांना अडयार नदीजवळ सेंट टोमे येथे पराभूत केले.
- या विजयामुळे असंघटिक व अप्रशिक्षित भारतीय सैन्याच्या तुलनेत प्रशिक्षित परकिय सैन्याचे श्रेष्ठत्व दिसून आले.
- परंतु एक्स-ला शापेलच्या युरोपातील युध्द बंद होताच 1748 पहिल्या कर्नाटक युध्दाचीही समाप्ती झाली. मद्रास इंग्रजांना पुन्हा परत मिळाले.
- या युध्दात फ्रेंचांचे श्रेष्ठत्व दिसून आले. डुप्लेची कूटनीती प्रदर्शित झाली. इंग्रजांना पॉंडेचरी जिंकून घेता आले नसले तरी त्यांना आरमाराचे महत्व लक्षात आले.
दुसरे कर्नाटक युध्द (1748-1754)
- कर्नाटकच्या पहिल्या युध्दामुळे डुप्लेची राजकीय महत्वाकांक्षा अधिक वाढली.
- भारतीय राजांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात भाग घेउन फ्रेंचांचा राजकीय प्रभाव वाढविण्याचा त्याने निणर्य घेतला.
- या स्थितीचे वर्णन करताना मॅलेसन म्हणतो, महत्वाकंाक्षा जागृत होऊ लागल्या, परस्पर द्वेष वाढू लागले. युरोपियनांना शांततेशी काहीच देणे घेणे नव्हते कारण आकांक्षा पूर्तीसाठी संधी दार ठोठावत होती.
- ही संधी हैद्राबाद व कर्नाटकच्या निर्वादास्पद वारसांमूळे प्राप्त झाली.
- हैद्राबादचा निजाम उल मुल्क आसफजाह याचा मे 1748 मध्ये मृत्यू झाला त्यांच्यानंतर त्याचा मुलगा नासिरजंग हैद्राबादच्या गादीवर बसला. परंतु त्याला निजाम उल मुल्काचा नातू मुझॅफ्फरजंगने आव्हान दिले.
- याच वेळी कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन आणि त्याचा मेहुण चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
- या संघर्षपूर्ण राजकीय स्थितीचा लाभ घेत मुझफ्फरजंगने दक्षिणेचा सुभेदार आणि चंदासाहेंबास कर्नाटकचा सुभेदार बनविण्यासाठी त्यांना समर्थन देण्याचे डुप्लेंने ठरवले स्वाभाविकच इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे नासिरजंग व अन्वरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला.
- एकुण डुप्लेला खूप यश मिळाले. मुझफ्फरजंग चंदासाहेब व फ्रेंच सैन्याचे ऑगस्ट 1949 मध्ये अंबूर येथे अन्वरुद्दीनचा पराभव करुन त्यास ठार मारले. तसेच डिसेंबर 1750 मध्ये झालेलया एका संघर्षात नासिरजंगसुध्दा मारला गेला. मुझफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला व आपल्या समर्थकांना त्याने फार मोठी बक्षिसे दिली.
- कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मोगल प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून डुप्लेंची नियुक्ती करण्यात आली.
- चंदासाहेब कर्नाटकचा नबाब बनला. 1751 डुप्ले या वेळी आपल्या यशाच्या व राजकीय शक्तीच्या शिखरावर होता.
- परंतु लवकरच फ्रेंचांसमोर नविन आव्हान उभे राहिले, अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अलीने त्रिचनापल्लीला आश्रय घेतला होता.
- त्यामुळे चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यास वेढा घातला त्याला शह देण्यासाठी इंग्रजांचा प्रतिनिधी रॉर्बट क्लाईव्ह याने फक्त 210 सैनिकांसह कर्नाटकची राजधानी असलेले अकराट जिंकून घेतले.
- राजधानी अकराट जिंकून घेण्यासाठी चंदासाहेबाने 4000 सैनिक पाठविले, परतु क्लाईव्हने अकराटचे योग्य पध्दतीने संरक्षण केले. त्यामुळे फ्रेंचांना अकराट जिंकता आले नाही. हा फ्रेंचांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला.
- जून 1752 मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. त्रिपनापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळे डुप्लेचे महत्व कमी झाले.
- 1754 मध्ये गॉडेव्हयूला डुूप्लेंचा उत्तराधिकारी नियुक्त करून भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली फ्रेंचांनी इंग्रजांशी पाँडेचरीचा तह करुन हे युध्द समाप्त केले.
- जमिनीवर लढल्या गेलेल्या युध्दांत इंग्रजांचे वर्चस्व राहिले. इंग्रजांनी मुहम्मदअली यास कर्नाटकाच्या नबाब पदी बसवले असे असले तरी हैद्राबाद राज्यात अजूनही फ्रेंचंाची परिस्थिती चांगली होती.
- मुझफ्फरजंग एका लहानशा संघर्षात मारला गेल्यावर हैद्राबादच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगाकडून फ्रेंचांनी बराच प्रदेश जहागीरी म्हणून पदरात पाडून घेतला.
- 30 लक्ष रु वार्षिक उत्पन्नाचा भू भाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला. थोडक्यात दुसर्या कर्नाटक फ्रेंचांची पिछेहाट झाली तर इंग्रजांची परिस्थिती अधिक दृढ झाली.
तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)
- 1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.
- फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.
- त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.
- काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.
- कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.
- दुसर्या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.
- खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.
- युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.
- कर्नाटकाच्या तिसर्या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले. 1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला. या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.
फ्रेंचांच्या भारतीय राजकारणातून झालेला अस्त:
- इ.स. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती.
- पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापेटचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीतचत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते.
- इ.स. 1798 मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकलीा तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता.
- इ.स. 1798 मध्येच लॉर्ड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.
- भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यास वेलस्ली जेवढा उत्सूक होता तेवढाच तो नाममात्र शिल्लक राहिलेल्या फ्रेंच सत्तेच्या खाणाखुणा संपुष्टात आणण्यास उतावीळ झाला होता.
- टिपू सुलतान, दौलतराव शिंदे व हैद्राबादचा निजाम यांनी कवायती सैन्य, तोफा, बंदुका व दारुगोळयाची सुसज्ज केल्या होत्या फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यामूळे आता फ्रेंचांना भारतातून हुसकावून लावून नेपोलियनच्या आफि्रका व आशियातील वाढत्या आक्रमणास पायबंद घालणे हा उद्देश लॉर्ड वेलस्लीने जाहीर केला.
- निजामाकडे चौदा हजार व शिंद्याकडे चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली.
- टिपू सुलतान फ्रेंचांच्या नादी लागला म्हणून त्याने चौथ्या इंग्रज म्हैसूर युध्दात त्याचा अंत केला.
- लॉर्ड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव शिंद्यांचाही पराभव केला.
- एवढयावर संतोष न मानता वेलस्लीने फ्रेंचांच्या बंदोवस्तासाठी भारताबाहेरही अनेक कारवाया केल्या जॉन माल्कमला त्याने इ.स. 1803 मध्ये तेहरान येथे पाठविले.
- डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला इजिप्तमध्ये याच वेळी त्याने सेनापती बेर्यडला एक फौज देऊन पाठविले परंतु वेलस्लीचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.
- वेलस्लीने केलेल्या या उठाठेवींचा एक फायदा झाला तो म्हणजे फ्रेंचांचा पार निकाल लागला आणि भारतीय राजकारणातून त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले.
Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, ias online classes, learning app, Current Affairs, current affairs quiz, gktoday, gk today, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.
Subject English Searching Title: Bharatat European Vasahatichi Suruvat study for competitive exams current affairs quiz and current affairs in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL