22 November 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

BLOG - रेशनिंग दुकानदारांच्या व्यथेची कथा..!!

corona crisis, rationing food distributors

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज जीवनावश्यक सेवा देणाऱ्या सर्व घटकांचा सन्मान होत आहे.अगदी डॉक्टर,पोलीस पासून सफाई कर्मचारी यांच्या पर्यंत सर्वच लोकांचा सन्मान होतोय आणि ते योग्यही आहे.परंतु याच काळात जीव धोक्यात घालुन रोज २०० ते ४०० लोकांना धान्य वाटप करणाऱ्या रेशन दुकानदार यांना मात्र सन्मानाची वागणूक मिळताना दिसत नाही, लोकांच्या दृष्टिने अजूनही ते लुटारू असेच आहेत बहुदा त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळत नाही. परन्तु जेवढे महत्त्वाचे काम डॉक्टर आणि पोलिसांचे आहे तेवढेच महत्वपूर्ण काम रेशनिंग दुकानदार यांचे आहे कारण आज अनेकांची पोटाची भूक तो भागवत आहे.

लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की, कोरोनाने मरण्या अगोदर भुकेने मरु. अशा मरु पाहणाऱ्या लोकांचा आधार रेशन दुकानदार आहे पण त्यांना कोणीही सध्या समजून घेत नाही, सन्मानाची वागणूक नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर येऊन त्यांची काम करण्याची शक्ति क्षीण होत चालली आहे. एक वेळ अशी येईल की, महाराष्ट्र मधील सर्व ५२ हजार दुकानदार एकाच वेळी आपली दुकाने बंद ठेवतील त्यावेळी त्यांचे महत्त्व समजेल. आता तर रेशन दुकानदार या विचारात आहेत की रेशन दुकानाचे सामूहिक परवाने देऊन मुक्त व्हायचे इतका त्रास सध्या होत आहे. तो त्रास आणि रिस्क घेऊन काम करायला तो आजही तयार आहे पण त्याला सन्मानाची वागणूकीची अपेक्षा सर्वांकडूनच आहे.

आज रेशनिंग दुकान भयानक मानसिक त्रासात जीवन जगत आहे. रोज त्याला रेशनिंग अधिकारी,स्थानिक नेते आणि जनता यांच्या जाचाला फेस करावे लागत आहे.तो रात्री व्यवस्थित झोपुही शकत नाही की जेवू शकत नाही तरी लोकांना तोच शत्रु वाटत आहे.रोज सकाळी 8 ते रात्री 8 दुकाने उघड़ी ठेवायची आणि ती कामे करायला त्याचे सर्व कुटुंब खपत आहे. रेशनिंग दुकान बऱ्यापैकी त्याच्या घराजवळ असते, त्याचे कुटुंब, त्याची मुले तिथेच वावरत असतात त्यांच्या जीवाला आज कोरोनाचा खुप धोका आहे.

रोज त्यांना ५०० लोकांना सामोरे जावे लागते. त्याच त्याच प्रश्नाना तीच तीच उत्तरे द्यावी लागतात मग त्यातून चिडचिड होते, मानसिक स्वास्थ्य बिघड़ते. रेशनिंग दुकानदार त्यांनाच धान्य देऊ शकतो जे ग्राहक दरमहा धान्य घेतात.कारण अशा ग्राहकांची जोड़नी त्या दुकानदाराकड़े होते, त्याला १२ अंकी RC नंम्बर मिळतो तेंव्हा तो धान्य घेण्यास पात्र होतो आणि ही प्रोसेस पुर्ण करून घ्यायला खुप कालावधी जातो मग लोकांचे रोज हेच प्रश्न असतात की, “आमच्याकड़े रेशनकार्ड आहे मग आम्हाला धान्य का मिळत नाही”? याला सतत उत्तरे द्यावी लागतात. रेग्युलर धान्य घेणारे लोक, केशरी शीधापत्रिका असणारे लोक, पिवळे कार्डधारक, फ्री मध्ये धान्य घेणारे सर्वच एकाच वेळी येतात आणि आम्हाला का नाही म्हणून वीचारुन हैरान करतात. धान्य देखील त्याच लोकांना सतत मिळते ज्याना गरज नाही. आता फ्रीचे धान्य त्याच लोकांसाठी येते जे रेग्युलर धान्य घेतात आणि ज्याना गरज आहे त्यांना मिळत नाही.

जे लोक रेग्युलर धान्य घेत असतात असे लोक अनेकवेळा स्वस्त मध्ये घेतात आणि महाग करून दूसरीकड़े नेऊन विकतात आणि दुकानदार काळाबाजार करतात म्हणून हेच ओरडतात. अनेकांचे रेशनकार्ड वर उत्पन्न जास्त आहे तरी धान्य घेऊन जातात आणि अनेकांचे उत्पन्न प्रत्यक्षमध्ये जास्त आहे आणि कार्डवर कमी दाखवून धान्य घेतात आणि वर परत कारण सांगतात की, “मला लागत नाही, शेजारी दयायचे आहे, इडली करता लागतात, क़ुर्ड्या खारवडी मस्त होतात. अशी कारणे सांगून घेऊन जातात.

कोणीतरी नेता जागा होतो प्रेशर करतो,दुकान बंद करून टाकायची भाषा करतो तो त्रास,पोलीस येऊन सहकार्य करण्यापेक्षा दुकानदारास दम देतात, मारतात.अधिकारी येतात हिशोब विचारतात, जाब विचारतात. शासन येते धान्य वाटा म्हणते पण कोणी विचार करत नाही,त्यांना कमीशन मिळते का?मिळत असलेल्या कमीशन मध्ये भागते का? धान्य वाटप करताना काय समस्या येतात का?त्याच्याकड़े मनुष्यबळ आहे का?त्याची कोरोना टेस्ट केली आहे का? त्याचा विमा आहे का? त्याच्याकड़े साधने आहेत का? हे कोणीही विचारत नाही.

रेशनिंग दुकानाचा साधारण कमीत कमी खर्च प्रति महीना ३० ते ३५ हजार आहे आणि त्यांना कमीशन मिळते ते ७ ते१० हजार दरम्यान मग त्याने कसे भागवायचे? रेशनिंग दुकानदार प्रामाणिक रहावा असे वाटत असेल तर शासनाने त्याला दरमहा ६० हजार रुपये द्यावे मग त्याला जाब विचारावेत. आज रेशनिंग दुकानदार सारे सहन करायला तयार आहे, कारण त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव आहे,तो अडवणुक करत नाही तो फ़क्त अपेक्षा करतोय की त्याला सन्मानाची वागणुक मिळावी, सहकार्य मिळावे अन्यथा तो आता इतका अपमानित आणि मानसिक खच्ची झाला आहे की दुकान सरकार जमा करण्यास तो तयार आहे.शासनाने ठरवायचे आहे काय करायचे?लोकांनी ठरवावे कसे वागायचे? आपण आपल्या हाताने अत्यावश्यक सेवा रिस्क घेऊन देणाऱ्या एका यंत्रणेचा खून करत आहोत.

लेखक – राहुल पोकळे
रेशनिंग दूकानदार संघटना प्रतिनिधी – महाराष्ट्र
मोबाईल – 9822877792

 

News English Title: Story corona crisis rationing food distributors concerns during corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x