23 November 2024 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

CM Uddhav Thackeray, MLC Election 2020

मुंबई, ११ मे: कोरोनाच्या संकटकाळात विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा असतानाही काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने रविवारी दिवसभर महाविकास आघाडीत राजी-नाराजीचे नाटय़ रंगले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त के ल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीनं ५, तर भाजपानं ४ जणांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठेकरेंसोबत शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थोरातांशी संपर्क साधत निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली. शिवसेनेच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी थोरात यांचे मन वळवण्यासाठी सकाळपासूनच प्रयत्न सुरू केले होते. अखेर सायंकाळी सह्य़ाद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने एकच उमेदवार उभा करावा हे प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी मान्य केले.

 

News English Summary: After Chief Minister Uddhav Thackeray expressed his displeasure, a meeting of the leaders of the alliance was held and the Congress decided to field a single candidate, paving the way for the election to be held without any opposition.

News English Title: Story Chief Minister Uddhav Thackeray files nomination form for MLC election News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x