23 April 2025 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

कोरोना व्हायरसची निर्मिती, वटवाघुळ आणि खवल्या मांजर...वेगळंच संशोधन पुढे

Corona Virus, Bat, Pangolin

बीजिंग, ११ मे: संपूर्ण जगामध्ये थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसची निर्मिती वटवाघुळ आणि खवल्या मांजराच्या संमिश्रणातून झालेली असू शकते. सार्स-Cov-2 विषाणू Covid-19 च्या जगभरात होत असलेल्या फैलावाला कारणीभूत ठरला आहे. या सार्स-Cov-2 विषाणूची निर्मिती वटवाघुळ आणि खवले मांजरामध्ये आढळणाऱ्या करोना व्हायरसच्या संमिश्रणातून झालेली असू शकते, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

जीनोमच्या साखळीमधून असे लक्षात आले की, खवल्या मांजरामधील Cov सार्स-Cov-2 आणि वटवाघुळामधील सार्स-Cov RaTG13 शी समान आहे. फक्त एस जीनमध्ये फरक होता. वटवाघुळामध्ये करोना व्हायरस असतो. तिथून तो खवल्या मांजरामध्ये आला असवा. त्या संमिश्रणातून सार्स-Cov-2 विषाणूची निर्मिती होऊन मानवी संक्रमण झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

एकीकडे चीनने कोरोना संसर्गाची माहिती लपवली असल्याचा आरोप होत असताना चीनवर आणखी एक आरोप करण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना करोना हे जागतिक संकट असल्याचे जाहीर करण्याची विनंती केली असल्याचे आरोप करण्यात येत आहे.

गुप्तचर विभागाच्या हवाल्याने हे वृत्त जर्मनीतील एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आले आहे. प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, २१ जानेवारी रोजी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस यांच्याशी संपर्क साधला होता. कोरोनाचा विषाणू हा माणसांमध्ये संसर्गजन्य आजाराप्रमाणे फैलावत असल्याची माहिती लपवणे व कोरोनाच्या आजाराला महासाथीचा आजार उशिराने घोषित करण्याची विनंती जिनपिंग यांनी केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस जगभर पसरल्यानंतर चीनवर सर्वच स्तरावरून टीका होत आहे. कोरोनामुळे अमेरिका-चीनच्या नात्यातही अंतर निर्माण झालं आहे. हा वाद विकोपाला गेला आहे की, चीनने आता कोरोना व्हायरसच्या प्रकरणात अमेरिकेच्या प्रमुख नेत्यांद्वारे बोलण्यात आलेल्या २४ गोष्टी खोट्या ठरवल्या असून त्याच खंडन केलं आहे.

 

News English Summary: The corona virus, which spreads throughout the world, may have been caused by a combination of bats and scaly cats. The SARS-Cov-2 virus has caused the worldwide spread of Covid-19. A new study suggests that the SARS-Cov-2 virus may have been formed from a combination of corona viruses found in bats and scaly cats.

News English Title: Story covid 19 may have originated from recombined bat Pangolin corona virus News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या