22 November 2024 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आत्मनिर्भर भारत हे मेक इन इंडियाचं बदललेलं नाव - शशी थरुर

Self reliant India, make in India, Shashi Tharoor

नवी दिल्ली, १३ मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशाता आत्मनिर्भर करण्यास सांगितले. आज जगभरात स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे, असेही सांगितले. यावेळी मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं हे पॅकेजची घोषणा केली. त्यासह २०२० मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्वडिटी (तरलता) आणि कायदा या सर्वांवर लक्ष दिले आहे. हे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग यांच्यासाठी करण्यात आले आहे. हे आर्थिक पॅकेज देशातील शेतकरी व श्रमिकांसाठी आहे. हे पॅकेज मध्यमवर्गींसाठी आहे, जो प्रामाणिकपणे टॅक्स देतो असं मोदींनी म्हटलं.

आर्थिक पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. आत्मनिर्भर आणि आत्मनिर्भरता या दोन शब्दांवर मोदींचा विशेष भर होता. मोदींनी त्यांच्या संबोधनात आत्मनिर्भर शब्द १९ वेळा, तर आत्मनिर्भरता शब्द ७ वेळा वापरला. यावेळी मोदींनी कोरोना संकट आणि त्यामुळे भारत करत असलेलं पीपीई आणि मास्कचं उत्पादन यांचा संदर्भ दिला. कोरोना संकटापूर्वी देशात पीपीई किट्सचं उत्पादन होत नव्हतं. एन-९५ मास्कचं उत्पादन नाममात्र होतं. मात्र आता आपण दिवसाकाठी दोन लाख पीपीई आणि एन-९५ मास्कची निर्मिती करत आहोत, असं मोदींनी सांगितलं.

मात्र या नाऱ्यावर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी टीका केली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान हे दुसरं तिसरं काहीही नसून मेक इन इंडियाचं नवं नाव आहे अशी टीका थरुर यांनी केली आहे.

यासंदर्भात थरुर यांनी एक ट्विट केला आहे. त्यात ते म्हणतात की “नए नाम से वही पुराना शेर बेच गए सपनों के वो फिर से ढ़ेरों ढ़ेर बेच गए…” या ओळी लिहित थरुर यांनी एक फोटोही ट्विट केला आहे. ज्या फोटोत मेक इन इंडियाचं चिन्ह असलेला सिंह दिसतो आहे. #MakeInIndia is now आत्मनिर्भर भारत, कुछ और भी नया था क्या? असा प्रश्न एक माणूस विचारताना दिसतो आहे.

 

News English Summary: However, Congress leader and former Union Minister Shashi Tharoor has criticized the slogan. Tharoor said that Self reliant India mission is nothing but a new name of Make in India.

News English Title: Self reliant India mission is nothing but repackaged version of make in India says congress leader Shashi Tharoor News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x