24 November 2024 8:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

कदाचित कोरोना व्हायरस HIV प्रमाणे कधीच नष्ट होणार नाही - WHO चा इशारा

Corona Virus, WHO Michael Ryan, HIV

नवी दिल्ली, १४ मे: कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.

त्यासाठी त्यांनी HIV च्या विषाणूचे उदहारण दिले. ‘HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे तसेच करोना व्हायरस नेमका कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही’ असे रेयान म्हणाले. “HIV चा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. आपल्याला वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. करोना व्हायरसचा आजार कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही” असे रायन म्हणाले.

दुसरीकडे कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात २ लाख ९७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ४३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग थांबवण्याचा कोणताही उपाय सापडला नाही. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे एड्सच्या पाच लाख रूग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता एका अभ्यासातून समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि यूएनएड्सच्या मॉडेलिंग अभ्यासानुसार आफ्रिकेच्या सब-सहारन भागात पुढील ६ महिन्यांत ५ लाखांहून अधिक एड्स रूग्णांचा मृत्यू होईल. असं झालं तर २००८ एड्समुळे मरण पावलेल्यांचा हा विक्रम मोडेल असं म्हटलं आहे.

२०१० पासून आफ्रिकेत लहान मुलांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी झाले होते. हे अँटीरेट्रोव्हायरल (एआरव्ही) थेरपीमुळे शक्य झालं. परंतु जर त्यांना योग्य वेळी औषध आणि थेरपी मिळाली नाही तर मोझांबिकमध्ये पुढील सहा महिन्यांत ३७ टक्के रुग्णांची संख्या वाढेल. मलावी आणि झिम्बाब्वेमध्ये प्रत्येकी ७८ टक्के आणि युगांडाच्या १०४ टक्के मुलांना एचआयव्हीची लागण होऊ शकते.

 

News English Summary: The corona virus will probably never run out. The World Health Organization warned on Wednesday that the world must now learn to live with the virus. ‘Like other viruses, corona virus can stay with you forever. It will probably never go away, “said Michael J. Ryan.

News English Title: corona virus may never go away like HIV warns WHO Michael Ryan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x