22 November 2024 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भीषण असेल; अमेरिकी विद्यापीठातील संशोधकांचा दावा

Covid 19, Corona virus

न्यूयॉर्क, १४ मे: कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.

त्यासाठी त्यांनी HIV च्या विषाणूचे उदहारण दिले. ‘HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे तसेच करोना व्हायरस नेमका कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही’ असे रेयान म्हणाले. “HIV चा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. आपल्याला वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. करोना व्हायरसचा आजार कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही” असे रायन म्हणाले.

दुसरीकडे कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू असून दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती समोर येत आहे. एका नव्या संशोधनानुसार, कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयावह असणार असून जगातील सुमारे ७० टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेतील मिन्नेसोटा विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंफेकेशियस डिजीस रिसर्च अँड पॉलिसी’चे संचालक डॉ. मायकल ऑस्टरहोम यांनी याबाबत इशारा दिला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत त्यांनी जगातील दोन तृतीयांश लोकांना करोनाची बाधा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी एक वर्षभरात तरी कोरोनाला प्रतिबंध करेल अशी लस विकसित होईल याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले.

लोकांमध्ये कोरोनाच्या संसर्गाविरोधात लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होणार नाही तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग फैलावणार असल्याचे त्यांनी म्हटले. जगातील ६० ते ७० टक्के नागरीक कोरोनाबाधित होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. तसेच लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाल्यानंतर कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरू होईल. रोगप्रतिकारक शक्तिमुळे कोरोना संसर्गाचा नवीन वाहक राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी त्यांनी काही सकारात्मक बाबीही जुळून येण्याची शक्यता वर्तवली. सार्स आणि मर्ससारख्या आजाराला मात दिलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा संसर्ग झाला नाही. तीच गोष्ट कोरोनाबाबतही होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले.

 

News English Summary: The director of the Center for Infectious Diseases Research and Policy at the University of Minnesota in the United States, Dr. Michael Osterhome has hinted at this. According to the Daily Mail, in an interview, he said that two-thirds of the world’s population would be affected by the corona.

News English Title: corona virus will keep spreading until up to 70 percent of the population is infected said american university expert News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x