22 November 2024 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

राज ठाकरे योग्य ठरले, श्रीदेवीं पद्मश्री होत्या म्हणून तिरंगा हे 'झूट'

मुंबई : श्रीदेवी यांचा दुबई येथे आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या शवविच्छेदनात त्यांनी मध्यपान केल्याचे सुद्धा समोर आले होते. त्यांचा पार्थिव अंत्यसंस्कारावेळी तिरंग्यात लपेटण्यात आला होता आणि त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा गुढीपाडव्या दिवशीच्या सभेत पद्मश्री पुरस्कार हे ‘तिरंग्याच’ कारण म्हणजे ‘झूट’ असा शब्दप्रयोग करून टीका केली होती.

परंतु राज ठाकरे यांची टीकेतील तो ‘झूट’ शब्द अखेर खरा ठरला आहे. सर्व काही माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे. जर पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. म.के. ढवळीकर यांचे दि. २७ मार्च रोजी पुण्यात निधन झाले. त्यांना सरकारने २०११ मध्ये पद्मश्रीने गौरवले होते. पण श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांना मिळालेल्या पद्मश्रीचा दाखला देत त्यांच्या पार्थिवाला शासकीय इतमाम दिला. पण पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. म.के. ढवळीकर यांच्याकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केले. फडणवीस सरकारने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कही साधला नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या या दुजाभावावर टीका होताना दिसते.

परंतु, माहितीच्या अधिकारात वेगळीच आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. एखाद्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे श्रीदेवींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पण पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. म.के. ढवळीकर यांच्याकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केले.

माहितीच्या अधिकाराचा वापर करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी श्रीदेवी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराबाबत आणि याची परवानगी देण्याचे अधिकार कोणाला आहेत, याची माहिती महाराष्ट सरकारच्या राजशिष्टाचार विभागाला मागितली होती. राजशिष्टाचार विभाग हा सामान्य प्रशासनाच्या अंतर्गत येतो. एखाद्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्याचा असल्याचे राजशिष्टाचार विभागाने सांगितले.

दुसरं धक्कादायक याच माहितीच्या अधिकारात उघड झालं म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातून दि. २५ फेब्रुवारी रोजी ‘तोंडी आदेश’ देण्यात आले होते. तेच आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले. थोडक्यात ‘पद्मश्री पुरस्कारा’मुळे नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करता येतात, ही नवीन माहिती गलगली यांना मिळालेल्या उत्तरावरून समोर आली आहे.

याचा अर्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या दिवशीच्या सभेत पद्मश्री पुरस्कार हे ‘तिरंग्याच’ कारण म्हणजे ‘झूट’ असा केलेला शब्दप्रयोग हा योग्य असल्याचं समोर आलं आहे. सरकारने नीरव मोदी आणि बँकेतील घोटाळ्याच्या बातम्यांवरून जनतेचं लक्ष हटाव म्हणून जाणीवपूर्वक श्रीदेवी मृत्यू हे प्रकरण तापवण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी सभे दरम्यान केला होता.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x