22 November 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोनाचा अनुभव सांगणारं शिल्पा पटवर्धन यांचं मनोगत; तुमचा आत्मविश्वास वाढवेल

Covid 19, Corona virus, Shilpa Patwardhan

मुंबई, १५ मे: सध्या समाज माध्यमांवर कोरोनासंबंधित समोर येणाऱ्या गोष्टी या सामान्यांचा आत्मविश्वास ढासळवणाऱ्या आहेत हे नक्की. अशा परिस्थतीत सामान्यांचा कोरोनाविरुद्ध लढ्यात आत्मविश्वास वाढेल असा गोष्टी जवळपास नसल्यात जमा आहेत. मात्र सध्या समाज माध्यमं आणि व्हाट्सअँप’वर मुंबई दादर येथील पटवर्धन कुटुंबीयांचा व्हयरल होणारा अनुभव तुमचा कोरोनाविरुद्ध आत्मविश्वास नक्कीच वाढवेल…स्वतः पटवर्धन कुटुंबातील शिल्पा पटवर्धन यांनी सांगितलेला अनुभव अगदी जसाच्या तसा आम्ही देत आहेत.

संपूर्ण अनुभवाचं कथन पुढीलप्रमाणे;

बर झालं असं की २१ मार्च पासून आम्ही म्हणजे मी, माझे बाबा, सागर आणि समीर पूर्ण घरात होतो. सोसायटीने भाजी, फळे यांची सोय केलेली असल्याने कुठेही बाहेर पडण्याची गरज नव्हती. आणि, संजयला बँकेत जावं लागत असल्याने आम्हाला थोडी भिती वाटत होती. अगदी आमच्या समोरच्या घरातही जाणे आम्ही टाळत होतो आणि गेलो तरी कुठल्याही गोष्टीला हात न लावणे हे आम्ही पाळत होतो.

सगळं सुरळीत चालू असताना अचानक २६ एप्रिलला संजयला ताप आला. लगेच सोसायटीतील डॉ. अनघा यांचं औषध आणलं. पूर्ण काळजी घेऊन सुद्धा का ताप आला या विचाराने आधी हतबलता आली मग राग आणि चीडपण आली. पण ३ दिवसात त्याचा ताप गेला. आणि २९ ला मला ताप आला. मला रोज संध्याकाळी ६ – ६.१५ ला घड्याळ लावल्याप्रमाणे ताप येत होता अगदी ४ तारखेपर्यंत. आणि पुन्हा संजयला २ तारखेला ताप आला.

आता मात्र डॉक्टरांनी CBC, मलेरिया आणि काळजी म्हणून कोरोना टेस्ट करायला सांगितली. भिती वाटली पण घेतली करून. आणि दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि कुठेही जागा नसल्याने वाट बघून तो ३० तासांनी रहेजा हॉस्पिटल मध्ये ५ तारखेला ऍडमिट झाला. तो पॉझिटिव्ह आल्याने आमचीसुद्धा घाईने टेस्ट करावी लागली.

रुपारेलमध्ये थायरोकेअरच्या कॅम्प मध्ये ५ तास प्रतीक्षा करत टेस्टचं दिव्य पार केलं. ताप, सर्दी, खोकला काही नसल्याने रिपोर्ट निगेटिव्ह येतील असं वाटत होतं… पण दुर्दैव!! आमचे सगळ्यांचे रिपोर्ट २ दिवसांनी म्हणजे ८ तारखेला पॉझिटिव्ह आले. तो पर्यंत बाबांना ताप आला होता. वेड्यासारखं वागत होते. खाणं पिणं बंद केलं. थरथरायला लागले. आम्ही सगळे पॉझिटिव्ह लक्षण नसली तरी, आणि संजय हॉस्पिटल मध्ये!! इमर्जन्सी आलीच तर करायचं काय या विचाराने घाबरलो आणि संदीप देशपांडे यांच्या मदतीने रातोरात सेव्हेन हिल्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. वाटलं, आता हॉस्पिटलमध्ये आलो..आता दुर्दैवाचे दशावतार संपतील. पण छे!!

आम्हाला बेड मिळायला पहाटेचे ५ वाजले. ते सुद्धा एका झोपलेल्या माणसाला उठवून बाबांना आणि सागरला एका ठिकाणी जागा दिली. आणि मला दुसर्या ठिकाणी. जे बुकिंग पासून आम्ही सांगत होतो त्यातलं काही होईना. बाबा तर अजूनच वेड्यासारखं करायला लागले. हातपाय आपटायला लागले. उभे राहून तिथेच लघवी करायला लागले आणि मग मात्र सागर आणि मी गोंधळलो. काय करायचं काहीच सुचत नव्हतं. प्रायव्हेट’मध्ये कुठेच जागा नव्हती. ते हेल्पडेस्क वरचे म्हणायला लागले ४, ५ तास थांबा आम्ही ऍडजस्ट करून देतो पण काही होईना.

त्यात आमच्या विंगच्याच एका माणसाने आत्महत्या केल्याचं कळलं आणि आमची जाम वाट लागली. यातच ९ तारीख गेली, १० तारीख पुन्हा नवीन आव्हाने उभी असलेली होती. बाबांचं चालूच होते. वैतागलो होतो. बरं, ज्यासाठी हॉस्पिटलमध्ये घाईने आलो तेथे उपचार काहीच नव्हते. कारण बाबांचा ताप उतरला होता. आणि त्यांना जे काही होत होते ते मानसिक संतुलनामुळे. ज्याचा कोरोनाशी काही संबंध नव्हता. तो पर्यंत जे काही होईल ते होवो पण जिथे मदत मिळेल अशा ठिकाणी कमीत कमी बाबांना ठेवलं तर आम्ही लवकर बाहेर पडू आणि त्यांना लवकर बरं वाटेल अशी मनाची तयारी झाली.

सगळ्या मोठ्या लोकांच्या ओळखींचा वापर करूनही काही होईना. शेवटी मनाची तयारी केली की इथेच राहायचं आहे, आता १४ दिवस. ओळखिंमुळे बाबांना आराम मिळण्यासाठी एक गोळी मिळाली आणि बाबा थोडे सावरले आणि आम्हीही दोघं थोडे शांत झालो. कोरोनाची परत टेस्ट केली. हळूहळू ऍडजस्ट झालो. म्हटलं तर सोय चांगली होती. प्रत्येकाला वेगळी खाट, २ वेळा ब्रेकफास्ट, २ वेळा जेवण, सतत गरम पाणी सगळं मिळत होत. जो स्टाफ अवती भोवती यायचा तो खूप छान बोलत होता. प्रेमाने चौकशी करत होते. आम्ही निघायच्या वेळी खुर्च्यापण दिल्या प्रत्येकाला बसायला.

पण आपल्या लोकांना सुविधा कशा वापरायच्या ते कळत नाही. एवढं चांगलं मिळून सुद्धा टॉयलेट, बाथरूम साफ ठेवता येत नव्हतं. त्या सगळ्याचा कंटाळा आला. आणि अचानक हॉस्पिटल मॅनेजमेंटकडून फोन आला. तुमच्या घरात संडास बाथरूम आहे का??? किती बेडरूमचा फ्लॅट आहे. तर मी सांगितलं २ बेडरूम आहेत, २ टॉयलेट्स आहेत. मग ते म्हणाले तुम्ही तुमची घरी सोय करू शकता का? म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना आम्ही हॉस्पिटल मध्ये आणू शकू.

आत्ताच्या नवीन नियमानुसार आम्ही देऊ का डिस्चार्ज??? मी म्हणाले द्या. आणि मग आम्ही अचानक घरी आलो. कारण उपचार जवळपास काहीच नव्हते. व्हिटॅमिन गोळ्या, सी व्हिटॅमिन गोळ्या, Pan ४० एवढंच. एवढं घरी राहून पण करू शकतो. आम्ही ज्या मजल्यावर होतो तिथल्या अंदाजे १२० जणांपैकी ३ जणांना ऑक्सिजनची गरज होती. बाकी जवळ जवळ ८० जण asymptomatic होते. अगदी दहाच्या आसपास लोकं थोडे खोकत होते. बाकी काही नाही.

तेव्हा कोरोनाला घाबरु नका. गरम पाणी, लिंबू पाणी, सुंठ पावडर, काढा याचा मारा ठेवा. बातम्या बघणं बंद करा. हात धुवा. घाबरून जाऊ नका. साधं सात्विक जेवण जेवा. काळजी घ्या करू नका.

शिल्पा पटवर्धन, दादर, मुंबई.

 

News English Title: Mumbai Dadar Covid 19 Mumbai experience shared by Shilpa Patwardhan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x