मुख्यमंत्र्यांकडून गोरेगाव नेस्को मैदानावरील १००० खाटांच्या कोरोना केंद्राची पाहणी
मुंबई, १५ मे: देशभरात कोरोना विषाणूने घातलेलं थैमान पाहता आता, संपूर्ण देश हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या सुरु असणारा टाळेबंदीचा तिसरा टप्पा हा अवघ्या काही दिवसांतच संपून औपचारिकरित्या देश या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. १८ मे पासून सुरु होणारा चौथा लॉकडाऊन हा काही अंशी वेगळ्या स्वरुपाचा असेल.
दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याविषयीच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. या टप्प्यात ग्रीन झोन पूर्णपणे सुरु राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, ऑरेंज झोनमध्येसुद्धा कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर भाग हा सुरु केला जाऊ शकतो. राज्यात अनेक जिल्हे आणि गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे या भागांमध्ये बऱ्याच अंशी लॉकडाऊनला शिथिलता दिली जाऊ शकते असं ते म्हणाले.
अमुक एक भाग रेड झोनचा जिल्हा असला तरीही अशा ठिकाणी कंटेन्मेंट झोन वगळता इतर सर्व भागांमद्ये व्यवसाय आणि उद्योग पूर्णपणे सुरु रहावेत असं आपलं ठाम मत असल्याचं राजेश टोपे म्हणाले. रेड झोनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना इतरत्र वावरण्याची मुभा मिळणार नाही हा अतिशय महत्त्वाच मुद्दा त्यांनी स्पष्ट केला. कोणीही उठावं कुठेही फिरावं, असं बेजबाबदार वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
विशेष म्हणजे पावसाळा तोंडावर आल्याने राज्य सरकारने जास्तीत जास्त कोरोना उपचार केंद्र तयार ठेवण्यावर भर दिला आहे. आज स्वतः शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कोरोना उपचार केंद्रांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारलेल्या १००० खाटांच्या क्षमतेच्या कोरोना काळजी केंद्राची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारलेल्या १००० खाटांच्या क्षमतेच्या कोरोना काळजी केंद्राची पाहणी केली.
CM Uddhav Balasaheb Thackeray today inspected a 1,000 bed Corona Care Centre(CCC) which has been developed at NESCO, Goregaon. pic.twitter.com/XrUG9d2C3v
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 15, 2020
News English Summary: Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray inspected the Corona treatment centers in Mumbai. On the occasion, Chief Minister Uddhav Thackeray visited the 1000 bed capacity Corona Care Center at Nesco Ground in Goregaon today.
News English Title: CM Uddhav Balasaheb Thackeray today inspected a 1000 bed Corona Care Centre which has been developed at NESCO Goregaon News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News