22 November 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

झूम एपवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत उबरने ३५०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार केलं

Zoom Video call, Uber, Unemployment

नवी दिल्ली, १६ मे : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं आहे. यानंतर जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर’वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं होतं की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.

अ‍ॅप आधारित कॅब सर्व्हिस पुरवणाऱ्या उबरने ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली होती. युएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमीशनमध्ये (एसईसी) कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली होती. “कोरोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि व्यवसायावर झालेला परिणाम, यामुळे कंपनीने खर्च कमी करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, कस्टमर सपोर्ट आणि रिक्रुटर्स टीममध्ये कपात केली जात आहे. एकूण ३ हजार ७०० फुल-टाइम कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल ” , असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. भविष्यात अजून कपात करावी लागू शकते असे संकेतही कंपनीने दिलेत.

अखेर योजनेनुसार प्रवासी टॅक्सी सेवा देणाऱ्या उबेर कंपनीने नुकतीच १४ टक्के कर्मचारी कपात केली. झूप एपवर घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉलवर कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. साधारण ३ मिनिटभर चाललेल्या या कॉलनंतर ३५०० कर्मचारी बेरोजगार झाले. उबर कस्टरमर कंपनीचे प्रमुख शेवॉलो यांनी झूम एपवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि ३५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत असल्याची माहिती दिली. मंदीचे दिवस असून कर्मचाऱ्यांसाठी ठराविक काम आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांचा आजचा कामाचा शेवटचा दिवस असल्याचे त्यांनी कॉलवर सांगितले.

सध्या कंपनीचा व्यवसाय निम्म्यावर आल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देणं शक्य नाही. उबेरला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात २.९ अरब डॉलरचे नुकसान झाले. यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले. विदेशातील कंपनीच्या गुंतवणुकीवर देखील वाईट परिणाम झाले आहेत.

 

News English Summary: Chevrolet, head of Uber Customer Company, interacted with employees from the Zoom app and informed them that 3500 employees were being laid off. There are days of recession and there is a lot of work for the employees. He also said that today is the last working day of the employees.

News English Title: Uber 3500 employees are got unemployed information gives on zoom video call News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x