23 November 2024 6:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

‘लावा’ मोबाईल कंपनी चीनमधून भारतात येणार; ८०० कोटींची गुंतवणूक करणार

Corona Virus, Lava Mobile International, Factory, In India

नवी दिल्ली, १६ मे : मोबाईलचं उत्पादन करणारी ‘लावा’ या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

लावा मोबाईल कंपनीने मोबाईल फोन विकसित आणि निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी योजना बनविली आहे. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष हरी ओम राय यांनी सांगितले की, उत्पादन डिझाईन करण्याच्या क्षेत्रात आमचे चीनमध्ये जवळपास ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. आता हे काम आम्ही भारतात हलविले आहे. भारतातील विक्रीच्या गरजा आम्ही स्थानिक प्रकल्पांतून पूर्ण करत आहोत. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“लॉकडाउनच्या कालावधीदरम्यान आम्ही निर्यातीची मागणी चीनमधून पूर्ण केली. चीनला आता आपण मोबाईल निर्यात केली जावी हे माझं स्वप्न आहे. भारतीय कंपन्या यापूर्वीपासूनच चीनला मोबाईल चार्जरची निर्यात करतात. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना कंपनीच्या स्थितीतही बदल घडवेल. यासाठी आता संपूर्ण व्यवसाय भारतातूनच केला जाईल,” असं राय म्हणाले.

 

News English Summary: Lava, a mobile phone maker, has decided to wind down its business in China. The information was given by Lava International on Friday. Following the policy changes in India, the company has decided to bring its business to India.

News English Title: Corona virus big shock for China Lava Mobile International moving factory in India forever News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x