22 November 2024 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आत्मनिर्भर भारत! देशातील ६ विमानतळांचा लिलाव होणार - अर्थमंत्री

FM Nirmala Sitharaman, Coal India Limited

मुंबई, १६ मे : देशातील कोळसा उत्पादन वाढीवर भर दिला जाणार असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. या कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. कोळश्याच्या व्यावसायिक उत्पादनावर भर दिला जाणार असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कोळशाद्वारे गॅसनिर्मितीला प्राधान्य दिलं जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोळसा क्षेत्रातील सरकारचे एकाधिकार कमी केले जाणार असंही त्यांनी सांगितलं. कोळसा उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना संधी दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, भारतीय एअर स्पेसच्या वापरावरील निर्बंध दूर केले जातील. त्यामुळे नागरी वाहतूक अधिक सुकर होईल आणि विमान वाहतूक क्षेत्राला दरवर्षी १ हजार कोटींचा फायदा होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. शस्त्र कारखान्यांचे कामही कंपन्यांसारखे चालवणार असून, शस्त्र कारखान्यांचे खासगीकरण होणार नाही, निर्धारित वेळेतच कुठलीही शस्त्रास्त्र खरेदी करणार आहोत. काही संरक्षण साहित्याची आयात रोखणार आहोत, आयातबंदी असलेल्या संरक्षण साहित्याची यादी बनविण्यात येणार असून, यादीतील साहित्यांची देशातच खरेदी होणार आहे. औद्योगिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी लँड बँका, क्लस्टरची मदत घेतली जात आहे. आता तंत्रज्ञानाचा वापर करून, जीआयएस मॅपिंगद्वारे भविष्यात वापरासाठी ५ लाख हेक्टर जमिनीमध्ये सर्व इंडस्ट्रियल पार्कना स्थान देण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजच्या संदर्भात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सलग चौथ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. सरंक्षण क्षेत्राबाबत महत्त्वाच्या घोषणा आज करण्यात आल्या. सरंक्षण क्षेत्र ‘आत्मनिर्भर’ करण्यावर भर देण्यात आला. सरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. संरक्षण उत्पादनातील एफडीआय मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती सरंक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. आयुध निर्माण कारखान्यांचं खासगीकरण होणार नाही, तर आयुध निर्माण कारखाने कॉर्पोरेटायझेशन होणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

 

News English Summary: Nirmala Sitharaman clarified that emphasis will be laid on increasing the coal production in the country. Finance Minister Nirmala Sitharaman has announced a package of Rs 50,000 crore to improve the coal production sector.

News English Title: The Investment of 50000 Crores Is For The Evacuation Of Enhanced CIL Says Finance Minister Nirmala Sitharaman News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x