22 November 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

केंद्र सरकारकडून मनरेगा’साठी ४० हजार कोटींची तरतूद

FM Nirmala Sitharaman, Atmanirbhar Bharat

नवी दिल्ली, १७ मे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सलग पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेजची माहिती देत आहेत. दरम्यान आज निर्मला सितारामण यांनी आत्मनिर्भर अभियानाच्या पाचव्या पॅकजची घोषणा केली. सुरुवातीलाच त्यांनी जमिन, कामगार, लिक्विडीटी आणि कायदा संदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत.

लॉकडाउनचा कालावधी वाढल्यानंतर देशभरातून लाखो मजुरांनी घराकडे स्थलांतर सुरू केलं आहे. या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. त्याचबरोबर या मजुरांना जेवणाची व्यवस्था केली जात असून, घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या रोजगारांसाठी केंद्रानं उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याची माहिती दिली.

अर्थमंत्र्यांची ही आजची पाचवी पत्रकार परिषद आहे, यात त्यांनी सांगितले की, २० कोटी जनधन खात्यात १० हजार २५ कोटी जमा केले आहेत तर ८.१९ कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये दिलेत. त्याचसोबत १४०५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहेत. गरीबांना जेवण दिलं जात आहे. तसंच कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मदत केली जात आहे. २.२ कोटी बांधकाम मजुरांसाठी ३ हजार ९५० कोटी देण्यात आले आहेत. ६.८१ कोटी जनतेला उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस सिलेंडर दिलेत. १२ लाख ईपीएफओ धारकांना आगाऊ रक्कम ऑनलाइन काढता आली असं त्या म्हणाल्या.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi has announced a Rs 20 crore package for the country in view of the growing prevalence of corona. After that, Union Finance Minister Nirmala Sitharaman is holding a press conference and giving information about the financial package. Meanwhile, Nirmala Sitharaman today announced the fifth package of Atmanirbhar Abhiyan.

News English Title: Atmanirbhar Package 20 lack crore FM Nirmala Sitaraman Press Conference News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x