19 April 2025 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

आत्मनिर्भर बना, १३ कोटी नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता - सविस्तर वृत्त

Covid 19, Corona crisis, Poverty, Unemployment

नवी दिल्ली, १८ मे:  जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. भारतालाही कोरोनाचा फटका बसला आहे. देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंदे ठप्प आहेत. अर्थचक्रही मंदावलं असून, अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात 13.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, अशी भीती वर्तवण्यात आली आहे. तसेच १२ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या कक्षात येऊ शकतात. महारोगराईचा परिमाण लोकांच्या उत्पन्नासह बचत, खर्चावरही होणार आहे.

कोरोना व्हायरसचं संकट अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकतं. कोरोना व्हायरसमुळे भारतातील १३.५ कोटी लोकांच्या रोजगारावर गदा येऊ शकते तसंच १२ कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात असं इंटरनॅशनल मॅनेजमेंट कंस्लटिंग फर्म ‘आर्थर डी लिटिल’च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी होणार असून जीडीपीमध्येही मोठी घरसण होणार असल्य़ाचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं पीटीआयच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार कंपनी आर्थर डी लिटिलच्या अहवालानुसार, कोरोनाचा सर्वात वाईट परिणाम देशातील लोकांच्या नोकर्‍यांवर होणार आहे. दारिद्र्य वाढणार असून, त्याचा लोकांच्या दरडोई उत्पन्नावर परिणाम होणार आहे. यामुळे सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) प्रचंड घट होईल. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपीमध्ये १०.८ टक्क्यांची घट होईल आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपीमध्ये ०.८ टक्क्यांची वाढ होईल. अहवालानुसार, देशात बेरोजगारी ७.६ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे १३.५ कोटी लोक रोजगार गमावू शकतात. तर १७.४ कोटी लोक बेरोजगार होऊ शकतात. एवढेच नव्हे तर १२ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या कक्षात येऊ शकतात आणि ४ कोटी लोक अत्यंत गरिबीत पोहोचू शकतात.

या अहवालामध्ये केंद्र सरकारनं आणि रिझर्व्ह बँकेनं उचललेल्या पावलांचं कौतुक करण्यात आलं आहे. परंतु अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्यासाठी धोरणं अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं मत आर्थर डी लिटिलचे भारत आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॅनेजिंग पार्टनर बार्निक मित्रा यांनी सांगितलं.

 

News English Summary: The country’s economic cycle has also stopped. Meanwhile, the shocking fact that the corona could put 13.5 crore people in the country at a loss is a shocking fact, according to a report.

News English Title: Covid 19 Could Cost 135 Million Jobs Push 120 Million People Into Poverty In India Lockdown Corona virus News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या