22 November 2024 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल

CRPF, Maharashtra, Covid 19

मुंबई, १८ मे: महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे सीआरपीएफ आणि केंद्र सरकारच्या अखात्यारीतील इतर अर्धसैनिकी दलाच्या २० तुकड्या मागविल्या होत्या. त्यापैकी ५ तुकड्या दिल्लीहून निघाल्या आहेत. आज रात्री त्या मुंबईत येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सीआरपीएफच्या ३ तुकड्या आणि सीआयएसएफ २ तुकड्यांचा समावेश आहे.

या प्रत्येक तुकडीमध्ये १२० जवान आहेत. त्यामुळे पाच तुकड्यांमध्ये ६०० जवान असतील. येत्या २५ मे रोजी साजरा होणार्‍या रमजान ईद सणाच्या वेळी महाराष्ट्रातील मुस्लीम बहुल विभागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी या केंद्रीय अर्धसैनिकी दलावर असणार आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, मालेगाव, पुणे, कोल्हापूर, नागपूर, भिवंडी, पुणे, सोलापूरसहीत मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, नागपाडा, भेंडी बाजार, वांद्रे, कुर्ला, सांताक्रुज अशा विविध भागांमध्ये या केंद्र सरकारच्या अर्ध सैनिकी दलांना तैनात ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यात लष्कराला पाचारण केलं जाईल अशी चर्चा काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाली होती. ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच फेटाळून लावली होती. पण कोरोनामुळे ताण आल्याने थकलेल्या पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या मागवल्या जातील असे संकेतही त्यांनी दिले होते. त्याचनुसार निमलष्करी दलाच्या २० कंपन्या राज्यात पाचारण करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. ज्या आधारे आता राज्यात आता हे चित्र पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: The Maharashtra government had called for 20 units of CRPF and other paramilitary forces under the central government. 5 of them have left Delhi. She is expected to arrive in Mumbai tonight. It consists of 3 pieces of CRPF and 2 pieces of CISF.

News English Title: CRPF 10 battalions posted in state Corona virus covid 19 outbreak lockdown News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x