24 November 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News
x

राज्य सरकारकडून नवीन नियमावली; मॉल्स, दुकानं, मैदानं, रिक्षा-टॅक्सीबाबत हे नियम

Maharashtra, Lockdown

मुंबई, १९ मे: देशातील कोरोनाबाधित रुग्णाने लाखाची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्र्यालयाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख एक हजार १३९ झाली आहे. मागील २४ तासांत ४९७० नवीन करोनाग्रस्त आढळले तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसातील कोरोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील कोरोना गाव खेड्यात पोहचल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे राज्यात सोमवारी करोनाचे आणखी २,०३३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३५,०५८ वर पोहोचली. राज्यात सोमवारी ५१ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १,२४९ वर पोहोचली. राज्यभरात आतापर्यंत ८,४३७ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी देशात सध्या चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कन्टेंन्मेंट झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यात धर्तीवर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही नियमावली मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती या भागांमध्ये लागू करण्यात येणार आहे. दरम्यान रात्री ७ ते सकाळी ७ दरम्यान कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.

अशी आहे नियमावली:

  • सरकारच्या वतीनं इ-कॉमर्स (ऑनलाईन) सामनासाठी आजपासून परवानगी दिली आहे.
  • रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये मैदानं, स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणं सुरू करण्यात येतील. मात्र कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
  • रेड झोनमध्ये दुकानं, मॉल्स, कारखाने खुली करण्याची परवानगी. केवळ देखभालीसाठी खुली करण्यात यावी. मात्र मॉल्समध्ये सामानांची विक्री केली जाणार नाही. ही दुकानं सकाळी ५ ते ५ पर्यंत खुली राहतील.
  • रेड झोनमध्ये टॅक्सी, रिक्षा किंवा कॅबना परवानगी नाही. बस या फक्त रेड झोन नसलेल्या परिसरात चालवल्या जातील.
  • रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये रिक्षांसाठी चालक वगळता केवळ २ लोकांना बसण्याची परवानगी असेल. तर, चारचाकीसाठी चालक वगळता २ लोकांना प्रवास करण्याची परवानगी असेल.

 

News English Summary: A fourth phase lockdown has been announced in the country to prevent corona. This lockdown includes some discounts in Red, Orange, Green and Containment Zones. On the basis of this, the Maharashtra government has also announced rules regarding lockdown.

News English Title: Maharashtra government issues revised guidelines for lockdown public transport allowed in non red zones up Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x