14 December 2024 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

महाराष्ट्र पोलिसांसाठी विशेष कोविड-१९ केअर सेंटर

महाराष्ट्र पोलिसांसाठी विशेष कोविड-१९ केअर सेंटर

महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेसंदर्भात: कोविड-१९ च्या संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेअंतर्गत अधिकृत इस्पितळांची शहरांप्रमाणे यादी खाली (माहितीसाठी इस्पितळाच्या नावावर क्लिक करा) दाखविण्यात आली आहे. सदर रुग्णालयांकडे कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उपचार करून घेण्याबाबत सुविधांचा लाभ घ्यावा. याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) कृष्ण प्रकाश यांनी परिपत्रक काढून सर्व विभागांना अधिकृत माहिती दिली आहे.

मुंबई पोलिसांसाठी विशेष रुग्णवाहिका – पोलिसांसाठी रुग्णवाहिकेच्या योग्य नियोजनासाठी तसेच गंभीर रुग्णांकरिता, वेळेत रुग्णवाहिकांची सोय होण्यासाठी मुंबई पोलीस कोविड – १९ कक्ष आणि महापालिकेच्या आपत्कालीन विभागामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. याकरिता कोविड – १९ या हेल्पलाईन कक्षातील ९३२१२६२१०० आणि ९३२१२६३१०० या क्रमांकांवर तेथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आपणास सहकार्य करतील. या अधिकाऱ्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • स.पो.नि. मनोज शिंदे – ८३६९७९७५१८
  • स.पो.नि. दिपक रायवाळे – ७०२१३८८१९९
  • पो.उ.नि. संतोष पाटील – ८५५२८८९२०१

मुंबईत पोलिसांसाठी विशेष कोरोना केअर केंद्र: मुबईमधील अंधेरी पूर्वेला असलेल्या मरोळ पोलीस वसाहतीतील ‘मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात’ (Marol PTS) येथे २५६ बेड्सचं तात्पुरत्या स्वरूपातील सुसज्ज कोरोना केअर केंद्र सुरु करण्यात आलं आहे. यामध्ये केवळ पुरुष पोलिसांसाठी तरतूद करण्यात आली असून कोरोना संदर्भात कोणतीही आपत्कालीन गरज निर्माण झाल्यास खालील पत्त्यावर पोहोचण्याआधी इमारत क्रमांक B-६ मधील मदत केंद्रावर चौकशी करावी. त्यासंदर्भात संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रंमांक खालील प्रमाणे आहेत.

मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्र इमारत – PTS (नवी इमारत)
संपूर्ण पत्ता: मरोळ पोलीस कॅम्प, मरोळ मरोशी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई क्रमांक ४०००५९
लँडमार्क: मरोळ पोलीस वसाहतीतील बी-६ इमारतीच्या बाजूला
विशेष हेल्पडेस्क: बी-६ इमारतीच्या तळमजल्यावर
विशेष हेल्पडेस्क मोबाईल क्रमांक: ९३२१५९३२२३, ९३२१५८०८६०

१. कोविड हेल्पलाईन:
याद्वारे पोलीस कर्मचारी आणि कुटूंबियांच्या मदतीसाठी कोविड माहिती करीता खालील हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. येथे कोरोनाबाधित रुग्णांना उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची तसेच रुग्णालयातील उपलब्ध बेड्स संख्या यांची माहिती दिली जाते. याकरीता हेल्पलाईन कक्षामध्ये एक पोलीस अधिकारी आणि दोन पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली असून वैद्यकीय सल्ल्याकरिता एक डॉक्टर सुद्धा २४ तास त्यांच्या सोबत कार्यरत असतात.
संबंधित हेल्पलाईन नंबर खालील प्रमाणे आहेत:
9137777100
9321262100
9321263100

२. कोविड सेल:
पोलिसांसाठी पुरविण्यात येणाऱ्या साहित्याचे योग्यरीत्या समान वाटप होण्याकरिता तसेच आवश्यक ती मदत सर्व स्तरावर पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत वेळोवेळो पोहोचविण्याकरिता कोविड सेल या विभागाची पोलीस मुख्यालय येथे निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच योग्य नियोजन करण्याकरिता सहाय्यक पोलीस आयुक्त (पोलीस कल्याण विभाग) यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

३. पोलीस फिवर क्लिनिक:
पोलीस कर्मचाऱ्यांकरिता खालील ठिकाणी फिवर क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत. याबद्दलची अधिक माहिती ही संबंधित नोडल अधिकारी तसेच पोलीस कोविड १९ हेल्पलाईन येथे उपलब्ध असेल. त्याची विभाग निहाय माहिती:
दक्षिण प्रादेशिक विभाग – सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. माने : 9870383232
मध्य प्रादेशिक विभाग – पोलीस निरीक्षक श्री. गोपाळे : 9821632681
पत्ता: रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी, सर जे जे रोड, दक्षिण प्रादेशिक विभाग समोर, नागपाडा, मुंबई (वेळ ११:०० ते ०४:००)
टीप: सध्या येथे तपासणी चालू नाही.

पूर्व प्रादेशिक विभाग – पोलीस निरीक्षक श्री. पुजारी : ९८२३२२५२२६
पत्ता: कालिदास नाट्यगृह पी. के. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई, दिनांक. ९ मे २०२० पासून सुरु (वेळ ०२:०० ते ०५:००)

पश्चिम प्रादेशिक विभाग – पोलीस निरीक्षक श्री. पवार – ९८२०७९९३७३
उत्तर प्रादेशिक विभाग – पोलीस निरीक्षक श्री. म्हस्के – ९७६६३७३३७५
पत्ता: जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी, केव्हज स्टेशन रोड, आयवाय कॉलेज कॅम्पसजवळ, नटवरनगर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई (वेळ १०:०० ते ६:००)

महत्वाची टीप: वरील ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यकता असल्यास कोविड तपासणी करण्यात येत आहे.

४. कोविड केअर सेंटर:
कोविड १९ पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नवीन पोलीस इमारत, कोळे कल्याण मुख्यालय, सांताक्रूझ चेंबूर लिंकरोड, कालिना विद्यापीठ, गेट क्रमांक. २ समोर, वाकोला पीएस, मुंबई, येथे दिनांक ९ मे २०२० रोजी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आलं आहे. येथे केवळ कोरोनाबाधित, परंतु सौम्य अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांवर करण्यात येतील. सध्याच्या स्थितीत या केंद्रात २५० रुग्णाची मर्यादा आहे. आवश्यकता भासल्यास या उपचार केंद्राची क्षमता ही १००० पेक्षा जास्त वाढवली जाऊ शकते. या केंद्रावर सर्व संबंधित लोकांशी समन्वय साधण्यासाठी डेडिकेटेड कंट्रोल रूम स्थापित करण्यात आलं आहे. संबधित केंद्राशी संपर्क करण्यासाठी खालील हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आले आहे.
शिबीर अधिकारी संपर्क क्रमांक: 9321577254

 

 

राहुन गेलेल्या बातम्या

x