21 November 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

लॉकडाउन: देशांतर्गत हवाई प्रवासाचे आत नवे नियम

Corona Virus, Lockdown

नवी दिल्ली, २१ मे: कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, भारताला त्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटापायी देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून, सर्वच उद्योगधंदे ठप्प आहेत. रेल्वे आणि विमानसेवाही बंद आहे. पण केंद्र सरकारनं आता २५ मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत विमानतळ टर्मिनल इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना थर्मल चेक मशीनमधून जाणे बंधनकारक असेल. तसेच प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून ठेवणे बंधनकारक केले आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी अशा काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाच्या आहेत.

हवाई प्रवासासाठी हे नियम असतील;

  • विमान उड्डाणाच्या नियोजितवेळेच्या दोन तास आधी प्रवाशांना विमानतळावर पोहोचावे लागेल.
  • प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्हज घालणे बंधनकारक असेल.
  • पुढच्या चार तासांनी ज्यांचे विमान आहे, त्यांनाच फक्त टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश दिला जाईल.
  • टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश देण्याआधी प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग चाचणी करण्यात येईल.
  • १४ वर्ष वयोगटाच्या आतील मुलांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक नाही. ज्यांच्या अ‍ॅपवर हिरवं चिन्ह येणार नाही, त्यांना एअर पोर्टवर प्रवेश मिळणार नाही.
  • शक्यतो ट्रॉलीचा वापर टाळण्याचा प्रयत्न असेल. पण विनंती केल्यास ट्रॉली उपलब्ध करुन दिली जाऊ शकते.
  • टर्मिनलमध्ये प्रवेश करण्याआधी सामानाचे सॅनिटायझेशन केले जाईल.
  • काऊंटरवरील स्टाफला फेस शिल्ड घालावे लागेल किंवा काच मध्ये आवश्यक आहे.
  • सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांबद्दल सातत्याने घोषणा केल्या जातील.
  • एअरपोर्ट स्टाफला पीपीई किट बंधनकारक आहे तसेच कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सॅनिटायझर ठेवावे लागेल.

नागरी उड्डयन मंत्री म्हणाले की, उड्डाणे कमी होऊ शकतात, विमानातील काही जागा रिक्त ठेवून उड्डाण करणं व्यावहारिक ठरणार नाही, कारण यामुळे तिकिटांच्या किमती वाढतील. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं असून, २५ मार्चपासून देशातील सर्व व्यावसायिक प्रवासी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.

 

News English Summary: The fourth phase of lockdown is underway in the troubled country of Corona, and all industries are at a standstill. Railways and airlines are also closed. But the central government has now decided to start domestic flights from May 25. Taking all precautions, the Airports Authority (AAI) on Thursday issued guidelines for passengers.

News English Title: Domestic Flights All Rules You Need To Know Before Flying News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x