22 November 2024 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही, तृतीयपंथी सुद्धा माणूसच - प्रकाश आंबेडकर

VBA Prakash Ambedkar, former MP Nilesh Rane

मुंबई, २१ मे: गुंडगिरी प्रवृत्तीची माणसं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांना खडे बोल सुनावले आहेत. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथी हे देखील माणूसच आहेत, त्यांचाही स्वीकार केला गेला पाहिजे. राजकीय नेतेमंडळींना तरी किमान याचं भान असावं अशा शब्दांत आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांचा खरपूस समाचार घेतला.

निलेश राणेने यांनी जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी असं म्हणत त्यांच्या क्तव्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितलं. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हिजडा शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करून तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखविल्या आहेत. त्याविरोधात ४९९, ५०१ अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा फैजपुर (जळगांव) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ट्विटरच्या माध्यमातून निलेश राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटरवॉर सुरु आहे. त्यातच आज पुन्हा निलेश राणे यांनी ट्विट करत चक्क शिवसेनेच्या हिमतीला दाद देत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, आमचा शिवसेनेशी अनेक वर्षाचा संघर्ष आहे. तसेच आम्ही एकमेकांना अनेकवेळा अपशब्द देखी वापरला. पण आम्ही दोघांनी लढाई मैदानाची ठेवली कधी तिसऱ्याला आमच्या लढाईत खेचले नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका कपटी आणि भित्रा निघाला की त्याने लगेच पळ काढला, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच स्वत: लढू शकत नसेल तर मैदानातही यायचंच नाही, असा टोला देखील निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

 

News English Summary: Prakash Ambedkar has slammed Nilesh Rane, saying that when people with hooliganism come into politics, they do not have social consciousness. As a human being, no one has the right to suffer.

News English Title: VBA Prakash Ambedkar demands former MP Nilesh Ranes apology on his remark using transgender community name News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x