सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ८ नवे रुग्ण; तर मुंबई पोलिसदलातही आकडा वाढतोय
मुंबई, २३ मे: राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले. राज्यात आज ८५७ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने आठ रुग्ण सापडले असून जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याबाबतचे स्वॅब दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले होते, त्यामध्ये हे रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. कोरोना रुग्णांमध्ये कणकवलीतील सहा तर मालवण व वैभववाडी तालुक्यातील एक एक रुग्णाचा समावेश आहे.
याबाबतच्या माहितीला जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा चाकूरकर यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १६ झाली आहे. कणकवली तालुक्यातील डांबरे येथील ४ रुग्ण, ढालकाठी येथील २, मालवण तालुक्यातील हिवाळे येथील १ तर वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील १ रुग्णाचा यात समावेश आहे.
तर मुंबईसह राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील पोलिस दलातील कोरोनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १,६६६ इतकी झाली. दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १७ इतकी आहे.
News English Summary: The total number of corona patients in the state has reached 44,582. Today 2940 new patients have been diagnosed. A total of 27,251 patients have died in Mumbai, while 63 patients have died in the state, while 27 crore patients have died in Mumbai.
News English Title: corona virus 8 patients were found in Sindhudurg same day News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल