22 November 2024 5:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोनाचे मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी

Mumbai High Court, allowed the burial, corona dead bady

मुंबई, २३ मे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह दफन करु नये याबाबत अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर मृतदेह दफन करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर याबाबत मुंबई महापालिकेने नव्याने आदेश काढावेत. तसेच मृतदेह दफन करताना नातेवाईकांची पूर्ण काळजी घेण्यात यावी, असेही कोर्टाने या आदेशात म्हटले आहे.

काही धर्मांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह दफन करण्याची पद्धत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेहामार्फत कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून मुंबई महापालिकेने मृतदेहाचे दफन करु नये असे परिपत्रक 30 मार्चला काढले होते. पण त्यानंतर त्याच दिवशी ज्या दफनभूमीत मोठी जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मृतदेह दफन करु शकता, अशा आशयाचा दुसरा सुधारित आदेश पालिकेने काढला होता. या दोन्ही आदेशाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका करण्यात आली होती. यात दुसऱ्या सुधारित आदेशाविरोधात वांद्रे परिसरातील राहणारे प्रदीप गांधी यांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. दरम्यान, या दोन्ही याचिकेवर निकाल देताना कोर्टाने कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास परवानगी देत मुस्लिम कब्रस्तान विरोधातील याचिका फेटाळून लावली.

सध्या राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले. राज्यात आज ८५७ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

News English Summary: The Mumbai High Court has allowed the burial of a person who died due to corona. Several petitions were filed in the Mumbai High Court not to bury the body of the victim. An important decision has been taken by the Mumbai High Court to allow burial of the bodies.

News English Title: Mumbai High Court has allowed the burial of a person who died due to corona News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x