22 November 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मागील २४ तासांत ६७६७ नवे रुग्ण, एकूण रुग्णांचा आकडा १,३१,८६८

Corona virus, Covid 19

नवी दिल्ली, २४ मे : आज पुन्हा एकदा भारतात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांनी नागरिकांची चिंता आणखी वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत कोरोनाची ६७६७ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. समोर आलेल्या नवीन प्रकरणांमुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून १,३१,८६८ झाली आहे. शनिवारी कोव्हिड-19 (Covid-19) मुळे १४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील एकूण मृतांची संख्या ३,८६७ पर्यंत पोहोचली आहे. देशात ७३,५६० पॉझिटिव्ह रूग्ण आहेत तर ५४,४४० रूग्ण बरे झाले आहेत.

राज्यात शनिवारी २६०८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. तर ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली असून, एकूण १५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईमध्ये ४०, पुण्यात १४, सोलापुरात २, वसई विरारमध्ये १, साताऱ्यात १, ठाण्यात १ तर नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासांतील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत.

 

News English Summary: Today, once again, new cases of coronavirus in India have raised the concern of the citizens. According to the Ministry of Health, 6767 new cases of corona have been reported in the last 24 hours. The number of corona-infected patients in the country has risen to 1,31,868 due to new cases. Covid-19 killed 147 people on Saturday.

News English Title: Corona virus highest spike 6767 covid19 24 hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x