22 November 2024 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

देशात कोरोना रुग्णांच्या आकडा झपाट्याने वाढतोय; भारताने इराणला मागे टाकलं

Covid 19 India

नवी दिल्ली, २५ मे : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या चार हजारावर पोहोचली आहे. यामुळे अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान नंतर आता १० व्या क्रमांकावर भारत पोहोचला आहे. भारतात सध्या ७५ हजार ७०० करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्सनंतर पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरात सध्या कोरोनाचे एकूण २८ लाख ऍक्टिव्ह रुग्ण असून एकट्या अमेरिकेत ही संख्या ११ लाख आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल देशात कोरोना रुग्णांची एका दिवसातील सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत देशात सहा हजार ९७७ रुग्ण आढळले. तर या काळात १५४ जणांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात ३ हजार २८० जणांनी कोरोनावर मात केली.

दरम्यान, कोरोनामुळे महाराष्ट्रातील स्थिती अधिकच खराब झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पार पोहोचला आहे. रविवारी राज्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल ३ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. एकट्या मुंबईत कोरोनाचे ३० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे ३ हजार ४१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५० हजार २३१ वर पोहोचला. राजधानी मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार ७२५ रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोना बाधितांची संख्या ३० हजार ५४२ वर गेली. २४ तासांमध्ये मुंबईत ३८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ९८८ कोरोना बाधित मृत्यूमुखी पडले आहेत.

 

News English Summary: Corona virus outbreak in India has not been successful and the number of patients is increasing day by day. On Sunday, India overtook Iran to become the 10th worst hit country in the world. In the last 24 hours, 6566 new patients have been registered in India. This is the highest number of patients received in a single day so far. 153 deaths have been reported.

News English Title:  Corona virus Lockdown India Now Among 10 Covid Hit Nations News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x