पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मातोश्रीवर महत्वाची बैठक; विरोधक-सत्ताधारी बैठका

मुंबई, २६ मे: एकीकडे राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना दुसरीकडे लवकरच एक राजकीय भूकंप होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
सोमवारी सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी शरद पवार मातोश्रीवर दाखल झाले. याठिकाणी पवार-ठाकरे-राऊत अशी गुप्त बैठक पार पडली. विशेष म्हणजे अगदी राज्यातल्या सत्तास्थापनेच्या महागोंधळात देखील ज्या शरद पवारांनी मातोश्रीची पायरी चढली नव्हती, ते शरद पवार काल मातोश्रीवर बैठकीसाठी हजर झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पडद्यामागे नक्कीच काहीतरी शिजतंय ज्याची जनतेला खबर नाही, अशा चर्चा सुरू आहेत.
एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा शिक्का मारून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची भीती महाविकास आघाडी सरकारला वाटत आहे. त्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका वाढल्या असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राजभवनवरील फेर्याही वाढल्या आहेत.
सोमवारी दुपारी शरद पवार राज्यपालांना भेटले, राज्यपालांनीच त्यांना भेटीसाठी बोलवलं होतं. तर त्यानंतर सायंकाळी भाजपचे खासदार नारायण राणे राज्यपालांना भेटले आणि त्यांनी थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यापूर्वी दोन दिवस आधी संजय राऊतही राज्यपालांना भेटून आले होते. त्याआधी भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात केलेल्या आंदोलनातून महाविकास आघाडी सरकारच्या अपयशावर आरोप केले होते. तर भाजपचे नेते राजभवनवर जाऊन महाविकास आघाडी सरकारची तक्रारही करून आले होते.
News English Summary: On the one hand, the Corona crisis in the state is getting darker, on the other hand, there is talk of a political earthquake soon. Such discussions have started after a secret meeting between NCP president Sharad Pawar, state chief minister Uddhav Thackeray and Shiv Sena MP Sanjay Raut.
News English Title: Discussions have started after a secret meeting between NCP president Sharad Pawar state chief minister Uddhav Thackeray News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL